तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

Written by

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं,..?
©स्वप्ना मुळे(मायी)
पाणी प्यायला ग्लास घेताना त्याने हळूच तिच्या गोऱ्यापान कमनिय कमरेला चिमटा घेतला,…तिने नेहमीप्रमाणे तिरपा कटाक्ष टाकून डोळे वटारले,..त्याला माहित होतं,…आई पलीकडेच पूजा करतीये त्यामुळे हि काही बोलु शकणार नाही आणि ओरडणार तर मुळीच नाही,…ओठांचा चंबू करून एक डोळा मारत तिला इशारा केला आता तर तिने लाटणंच उगारलं,… आणि तेवढयात आई आली,… काय चाललंय सुनबाई,…ती गडबडली ,…काही नाही हो आई,…तो साळसूदपणे तोंडाला ग्लास लावून पाणी पित तिच्याकडे मिश्किलपपणे बघत राहिला,…थांब बघते तुला आज अशी उगाच पोकळ धमकी तिने दिली,…तो पण डोळे मिचकावत गेला,… पोळ्या करताना मघाची घटना आठवून तिलाच हसू यायला लागलं,…काय करावं ह्याच्या खोड्या काही कमी होत नाही,….आठ वर्षे झाली आहेत लग्नाला पण हा अजुनही आहे तसाच,….लेकराची हौस त्याला आणि आपल्याला आहे पण आपलं पहिलं मुल पोटात गेलं आणि आपण तर बदलूनच गेलो,… अगदी हरवून गेलो होतो ,…नुसतं कोपऱ्यात बसून मुळूमुळू रडणं,…आपल्या एवढंच दुःख त्यालाही झालं होतं,…पण त्याने किती चटकन सावरलं स्वतःला,…म्हंटला सगळंच जर आपल्या मनासारखं झालं तर जीवन जगण्यात मजा नाही येणार,…नियतीचे डावपेच स्वीकारावेच लागतात,…प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते,…त्यानंतरही लोकांचे बोलणे,…आपली ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टीत त्याची साथ होती म्हणून तर आपण मरगळलो नाही,…सतत आपलं बालमन आंनदी ठेवत तो आपल्यालाही अगदी आनंदी ठेवतो,…घरात वातावरण हलकं फुलक ठेवण्यात त्याचा खरा सहभाग आहे,…खरंतर त्याला नोकरी,…घराचे हप्ते सगळे टेन्शन काय कमी आहेत का पण तो हसत स्वीकारतो आणि लढतो पॉझिटिव्ह मनाने म्हणून तर आंनदी राहतो,…आपलं नातंही तसं हिरवगार ठेवण्यात त्याचाच खरा वाटा आहे,…नाहीतर आपण तर कधीच रडत बसलो होतो,…आता परवा आपल्याला सुमी भेटली तिची कंडिशन सेम आपल्यासारखी आहे,… मुल होत नाही,…तर सगळे तिलाच बोलतात अगदी नवरा सुद्धा,…कधी प्रेमाने जवळ घेत नाही,…दुःखावर फुंकर घालत नाही,…फक्त प्राण्यासारखं गरज असली की जवळ घेणार आणि मग हड हड करणार,…हे सांगताना तर किती रडली सुमी,…बाकी लोकांचं जाऊ दे ग पण ज्याच्या सोबत आयुष्य काढायचं त्या जोडीदाराला जर किंमत नसेल आपली तर आपलं जगणं मातीमोल होतं ग,…कधी छान दिसतायेस असं तोंडभरून म्हणणं नाही,…कधी अलगद हळुवार स्पर्श नाही,…कधी बसुन प्रेमाने गप्पा मारणं,… हातात हात घेऊन बसणं नाही,…सतत धुसफूस ,…असं वाटतं लग्नच का करतो आपण,…जर जोडीदाराला आपली किंमत नाही तर,…पण परत वाटतं नियतीला असंच काही मान्य असेल असं म्हणायच आणि चालू दयायचं,… सुमीच्या ह्या गप्पा आणि आपल्या नवऱ्याचं हे वागणं बघितलं की खरंच आपण खुप सुखी आहोत,…भलेही सुमीच्या नवऱ्यापेक्षा आपल्या नवऱ्याच शिक्षण,नोकरी,पगार सगळं खूप कमी आहे,…पण त्याच आपल्यासोबत जगण्याची पद्धत,…जोडीदार म्हणून आपल्या विचारांची,मताची घेतलेली काळजी,…आपल्याला सतत आंनदी ठेवण्यासाठी असलेली त्याची धडपड ह्या सगळ्यात आपण सुमिपेक्षा वरचढ आहोत,…विचारात पोळ्या करूनही झाल्या,…तिने त्याचा डबा भरला,…डबा देताना परत त्याने मनगटच धरलं तिचं,… इकडे सासुबाई हाका मारत होत्या,…त्याला दरवाजबाहेर ढकलत ती कशीबशी घरात अली मनात हसतच,…सासुबाईंनी हे हेरलं म्हणाल्या सुनबाई,…मला समाधान वाटतं तुमचा संसार पाहून,…लेकरं बाळ तर होतील ग पण दोघांची मन एकमेकांत गुंतल्या जाण आजकाल महत्वाच आहे ग,…एकदा का एकमेकांची सवय झाली कि मग आयुष्यभर आंनदी सहवासाची खात्री नाहीतर मग धुसफूसत जगणं,…एकमेकांच्या विचारांचा आदर करून चालणार संसार सुखाचाच असतो बरं,… तिला नकळत त्याच्या खोड्या आणि त्याचा हसरा चेहरा आठवून उगाच शहरल्यासारखं झालं,…😊
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा