“तुझ सिक्रेट माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे हं “

Written by

© शुभांगी शिंदे

शंभर शब्दांची कथा..

मेघा गेली दोन वर्षे शत्रू देशात मूकबधिर बनून आपल्या देशाच्या सीक्रेट एजंटच काम करतेय.. शत्रू राष्ट्राची खडानखडा माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणेला पुरवतेय..

एक दिवस अचानक तिच्या काही हालचालींचा शत्रूला सुगावा लागला.. त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि हाल हाल करून सोडले.. तिच्याकडून आपल्याला बरीच माहिती मिळेल आणि आपण भारताची सुरक्षायंत्रणा मोडून काढू असा कपटी डाव त्यांनी आखला.. शत्रू राष्ट्राची कैद म्हणजे जिवंतपणी मरणयातना सोसण्यासारखे आहे..

मेघालाही अशा बऱ्याच नरक यातनेतून जावे लागले.. आता यातना सहनशक्तीच्याही पलीकडे गेल्या होत्या.. तिने बाजूलाच पडलेला काचेचा तुकडा उचलला आणि आपली जीभ कापून टाकली.. आता ती कायमची मुक झाली होती.. आणि देशाच सिक्रेट तिच्याकडे सुरक्षित राहिले…

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल 🙏🏻)

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा