तुमची अशी विणा व्हायला नकोय…

Written by

@ योगिता विजय टवलारे✍️

आज पुन्हा आईशी फोनवर बोलताना विणा रडत होती..? पंधरा दिवसांनी तिच्या भाचीच लग्न होतं.. विणाच्या बहिणी,त्यांचे मिस्टर, मुलं ,सगळेच लग्नाच्या ५ दिवस आधीच जाणार होते..एकच भाऊ आणि त्याची एकुलती एक मुलगी! लग्न एकदम थाटात होणार होतं..?

लग्नाची तयारी जोरदार सुरू होती..विणाच्या बहिणी माहेरी जाऊन ,येऊन असायच्या..आईच्या , वहिनीच्या मदतीला तत्पर असायच्या..लग्नाचे कपडे, दागिने घ्यायला सुद्धा त्या हजर होत्या..भाचीसाठी present पण आधीच त्यांनी बुक केलेलं होत..तेही होणाऱ्या नवं वधूच्या आवडीने..?

लग्न घरात सुखं – समाधानाची हलकीशी झुळूक स्पर्शून जायची..

पण इकडे विणा माहेरी होणाऱ्या आपल्या लाडक्या भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार नव्हती..आणि म्हणूनच जेव्हाही तिच्या आईचा फोन यायचा तेव्हा प्रत्येक वेळेला ती ह्याच कारणामुळे दुःखी होऊन रडायची..तिची आई समजूत घालायचा प्रयत्न करायची..पणं त्यांचही मन लेकीसाठी तुटायच..?

लग्नाला सगळेच येतील पण आपली लाडकी लेक विणा येणार नाही , ह्याची खंत त्यांच्या मनात कायम राहिलं..केवळ आईच नाहीतर भाऊ, बहिणी,वहिनी, बाबा ह्यांच्याही मनात ती न येण्याची हुरहूर होतीच..? पणं त्यांना त्यांच्या जावयाचा स्वभाव चांगलाच माहीत होता..त्यामुळे सगळ्यांनी तिला लग्नासाठी यायला बळजबरी केली नाही..?

अश्याच एका सायंकाळी विणा बाल्कनी मध्ये कॉफी पित बसली होती.. (तेवढाच काय तिला स्वतः साठी निवांत वेळ मिळायचा..नाहीतर सतत ती घरकामात आकंठ बुडालेली असायची..)तिला आठवलं , जेव्हा ती ह्या घरात श्रीकांतची बायको बनून ह्या घरात आली होती..?

तेव्हा सुखांनी अक्षरशः तिच्या पायथ्याशी लोळण घातली होती..तिला तिच्या नशिबावर सुद्धा विश्वास बसायचा नाही..सासूबाई सुरुवातीला एकही कामाला हात लावू द्यायच्या नाहीत..?अगदी राज्याच्या राणी सारखी राज्य करायची ती घरावर.. ननंद अगदी बहिणीसारखी माया लावायची..नवरा तर तिच्या मागे मागे फिरायचा..तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करायचा..☺️

सासूने काम करायला नाही म्हणलं तरी ती त्या घरची सून होती..तिला कामं करण भागच हो ….मग तिच्या कामात श्रीकांत हातभार लावायचा.. विणाला वाटायचं, इतक चांगल सासर आणि खूप खूप प्रेम करणारा नवरा प्रत्येक मुलीला मिळू देत..?

पण तिला कुठे ठाऊक होत?? ते सगळ सुख किती क्षणभंगुर असणार आहे?? तिचा दृष्ट लागण्या सारखा संसार एका क्षणात संपुष्टात आला..तिचे नव्या नवलाईचे दिवस एका महिन्यातच कुठच्या कुठे पळाले..सगळाच दिखावा..सासूने घरकामातुन निवृत्ती घेतली..? नणंद तिच्या मूळपदावर आली..आणि नवऱ्याने एका क्षणात तिला आकाशातून जमिनीवर आणून सोडले..?

तिचा मात्र अपेक्षाभंग झाला..घरही तेच, घरातली माणसंही तीच! पण सगळ्यांचे स्वभाव मात्र बदलले..म्हणजे तो सगळा दिखवाच होता तर..हे कळायला तिला थोडा उशीर झाला होता..तिला सगळ्याचा खूप मनःस्ताप झाला..पणं हळू हळू ती परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकली..?

तिला तसा मानसिक त्रास नव्हता..पणं घरात सगळ्यांना प्रत्येक वस्तू हातात लागायची..घरकामात कुणीच तिला हातभार लावायचे नाही..श्रीकांतचे बुट पॉलिश करण्यापासून तर ऑफिसच्या फाईल्स नीट ठेवणे,पहाटे पेपर वाचतांना कॉफीचा मग हातात देणे, टूथ पेस्ट लाऊन हातात ब्रश देणे, भाजी आवडली नाही की वेळेवर दुसरी भाजी बनऊन देणे, रात्री कितीही उशिराने ऑफिस मधून आल्यावर गरम गरम चपात्या करून देणे..अश्या अनेक सवई ( वाईट ) विणाच्या अंगवळणी पडल्या होत्या …?

लग्नाच्या २ वर्षानंतर तिला मुलगा झाला..तोही अगदी लाडोबा ! अगदी श्रीकांतच्या वळणावर गेलेला..जस जसा मोठा होत गेला , तसं तसा हट्टी होत गेला..त्यालाही सगळ हातातच लागायचं..घरचे सगळे त्याचा हट्ट पूर्ण करायचे..चुकून एखादा हट्ट पूर्ण केला नाही तर घरात सगळीकडे पसारा करत ,रडून रडून घर डोक्यावर घ्यायचा..?

रोजचं काही बाही उद्योग करून ठेवायचा..नको तितका पसारा काढून ठेवायचा..सतत टीव्ही नाहीतर मोबाईल हातात लागायचा..

अशावेळेस वीणाला खूप राग यायचा..ती त्याला रागवायची कारण तो अतीलाडाणे बिघडत चालला होता..पणं सासूबाई , श्रीकांत विणावरचं चिडायचे..मग ती मात्र हतबल व्हायची..मुलगा ( वेद ) ५ वर्षाचा असताना पुन्हा तिला दिवस गेलेत..मुलगी झाली..पणं ह्यावेळेस तिने मनाशीच ठरवले ,जी चूक वेदच्या बाबतीत केली तिचं चूक पुन्हा होणे शक्य नाही..?

मुलीच्या रुपात तिला एक मैत्रीण मिळाली..तिचं संगोपन ती तिच्याच मनानुसार करायची..नावही तिच्याच आवडीच, सखी !

पण इथे सुद्धा तेच झालं..सखी सुद्धा वेदच्या वळणावर गेली..मुलांना असं लाडाने वाया जाताना पाहून तीच मन तीळ तीळ तुटायचं..आता ती १५ वर्षांची झाली होती, तरीही तिची कामात मदत तर नाहीच पण तिचंच सगळ वििणाला कराव लागायचं..

प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते..विणा करून करून किती कामे करणार ? तिलाही विसावा हवाच ना?? प्रेमाचे दोन बोल , मायेची फुंकर आणि घरच्यांचा पाठिंबा स्त्रीसाठी खुप महत्वाचा असतो..☺️

कारण तिच्या एकटीचा संसार नसतो..संसार दोघांचा असतो..घरकामात दोघांचाही सहभाग महत्वाचा असतो..आणि मुलांना सुद्धा इतर नाही पणं निदान स्वतःचे कामे करण्याचं वळण लावणे खुप गरजेचे आहे..☺️

जेणेकरून मुलं कुणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांना जडं सुद्धा जाणार नाही..आणि आई बाहेर गावी गेली की त्यांचं तिच्या वाचून अडणार नाही..

आईच्या माघारी मुलं घर सांभाळू शकतात, ह्यापेक्षा आणखी काय हवे असते तिला?? ☺️बरं विणा तरी हाऊस वाइफ आहे, पणं मग नोकरी करणाऱ्या आईचं काय?? तिचा जीव किती मेटाकुटीला येत असेल वेद आणि सखी सारखे मुलं असतील तर??

विणा ह्या सगळ्या विचारात असताना गाडीचा हॉर्न वाजला आणि ती भानावर आली..तिने घड्याळं बघितली, ८ वाजत आलेले..म्हणजे श्रीकांत ऑफिस मधून आला होता..ती मनाशी काहीतरी ठरऊन उठली व श्रीकांतच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.. तशीच आईला फोन लावायला वळली.. भाचीच्या लग्नाला ४ दिवस बाकी होते..तिने आईला सांगितलं, आई !मी उद्याचं लग्नाला येतेय..?

फोन ठेऊन सरळ रूम मध्ये गेली.. श्रीकांत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत राहिला..☺️

मुलांचे लाड करण्यात व अती लाड करण्यात खूप फरक असतो.. वीणाने योग्य त्यावेळी बंड पुकारला असता तर तिच्यावर ही वेळच आली नसती..प्रत्येकाची पर्सनल अशी एक स्पेस असते.. ती स्पेस जपायला शिका.. जगायला शिका..

विणावर तिच्या घरचे इतके डीपेंड होते की तिला चार दिवस माहेरी सुद्धा जाता यायचं नाही..तुमची अशी विणा व्हायला नकोय..जर तुमच्यात असेल अशी एखादी विणा?? तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा..?

? योगिता विजय?

शेअर करा पण माझ्या नावासकट !

धन्यवाद!

३/७/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा