तुला कशाला पाहिजे…?

Written by

तुला कशाला पाहिजे…?

त्या दिवशीच तुला दिले होते ना…?? सारखे सारखे काय नुसते पैसे मागत असतेस ग… चढत्या स्वरात मीना चा नवरा तिला बोलतो… अहो… ते पैसे रोहित ने collage ला जाताना घेतले… तो म्हटला तुला कशाला लागतात ग घरी पैसे… घरीच तर असतेच… बरोबर तर बोलला काय चुकीचे बोलला मग… असे बोलून नवरा ऑफिस ला जातो… अग आई मला जरा पैसे देतेस का…? Notes xrox करायच्या आहेत…रोहिणी बोलते… अग पैसे नाहीत ग माझ्याकडे.. तुला दादाला द्यायला बरोबर पैसे असतात ग… मला द्यायलाच नसतात तुझ्याइथकडे… बोलून रागातच collage ला निघून जाते…
मीना आपल्या लेकीचे बोल मनाला लावून न घेता तिच्या कामाला सुरूवात करते… पण राहून राहून तिच्या मनात येते की आपल्याकडे साधे मुलांना द्यायला सुद्धा पैसे नाहीत… पण ती काय करणार नवरा तर तिला कशालाच पैसे लागत नसतील असे समजून कधीच पैसे देत नाही…

अश्या माणसांना बायको म्हणजे फक्त आपल्या घरासाठी राबणारी बाई असते… त्यांच्याकरता तिची हौसमौज, तिचे personal असे काहीच नसते… साधी भाजी किंवा काही किरकोळ वस्तु आणायचे असल्यास तिला नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात… नवरा पण पैसे देऊन तिच्यावर खुप मोठे उपकार करत असल्याचे दाखवतो… जस काही ती भिकच मागत आहे… पण घरातही पैसे लागतात… पेपर, दुध, cylinder, किरणा, फुलवाला, मुलांना पैसे द्यायला, देणग्या अश्या कितीतरी जणांना पैसे द्यायला लागतात…

पण पैसे मागितले की नवरा बोलतो तुला काय कमी पडत ग… तुला सगळ तर घरात घर बसल्या सगळ आणून देतो… मग अजून कशाला पैसे लागतात… तुला काय घरी बसुन पैसे मागायला… काम आम्हाला करावे लागते… तुला काय माहित किती काम असते… किती करावे लागते तेव्हा जावून कुठे पैसे मिळतात… तु काय आरामच तर करत असतेस दिवसभर… जरा बाहेर जाऊन काम करून बघ… मग कळेल…

मी एक पाहिलेल उदा. सांगते…

अशीच एका बाईची तब्बेत ठिक नसते… तिच्या नवऱ्याकडे दवाखान्यात जाण्यासाठी पैसे मागते… तो पैसे देत नाही असे नाही… तो तिला फक्त २०० रुपये देतो आणि जा बोलतो… ती बोलते एवढेच पूरणार नाहीत… अजून लागतील… अजून काय करायचेत तुला हे खुप झाले… नुसती उधळपट्टी करायला हवी… असे बोलतो… त्यावर तो असही बोलतो की… डॉक्टर ची फीस १०० रुपये आणि १०० रुपये ची भाजी आण… आणि गोळया दिल्याच तर मी आणेन आल्यावर… त्यावर ती फक्त हो चालेल असे बोलली… आणि तिचा नवरा लगेच कामावर निघून जातो…

हे पाहून म्हटल बाप रे खरच अजून अशी लोक आहेत… आणि कधी सुधारणार हो ही लोक… बायकोलाही हौसमौज असते… तिला पण तिच आयुष्य आहे की…

©®प्रीती बडे ❤

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.