तुला जपणार आहे

Written by

 

©सरिता सावंत भोसले

तुझं रागावणं, कडू बोलणं

माहीत आहे क्षणिक सारा

खेळ असणार आहे

तुझं माझ्यावर माझं तुझ्यावर

निरंतर प्रेम राहणार आहे

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे

तुझ्या काटेरी वाटेत फुलांची

बरसात करणार आहे

वावटळीच्या भोवऱ्यात, सुखाच्या सरींत

साथ माझी असणार आहे

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे

या बंद पापण्यांत,मनाच्या खोल डोहात

तुला कैद करणार आहे

हृदयातील स्पंदनात, माझ्या आज अन उद्यात

तूच वसणार आहेस

मी सारी जिंदगी तुला जपणार आहे

©सरिता सावंतभोसले

 

Article Categories:
प्रेम

Comments are closed.