तुला पाहते रे..

Written by

तुला पाहते रे..

अनिकेत, तू माझा बालपणातला मित्र.. आपण एकत्र खेळलो बागडलो., कधी हसलो कधी कधी एकत्र रडलो सुद्धा.. एक निरागस मैत्री तुझ्या माझ्यात रुजलेली.. आठवत तुला.. लहानपणी दऱ्या डोंगरात आपण फिरायचो.. एकत्र शाळेत जायचो.. आणि याच इथे आपण लपाछपी खेळायचो.. हातात हात घालून नदी काठी त्या वडाच्या झाडाखाली बसायचो.. सुरपारंब्या खेळायचो.. किती छान होत ना सगळं!! फुलपाखरांचे मखमली दिवस ते..😊

बालपणीचे दिवस भुर्रकन निघून गेले.. दिवस सरत होते. आपण मोठे होत होतो.. आपलं वय वाढत होत.आणि माझं अस तुला आडोश्याला उभं राहून चोरून पाहणही वाढत चाललं होतं. हल्ली तुला पाहण्याचा मोह मला आवरता येत नाहिये रे.. माझा बालपणातला सखा तू.. पण बघ ना आपण एका शाळेत, एका वर्गात, एका आळीत राहून सुद्धा कधी अस झालं नव्हतं.. तुझी आठवण येणं. सारख तुला अस आडोश्याला उभं राहून चोरून पाहणं.. काय होतंय रे मला.. इतक्या दिवसात कधी तूझ्या बद्दल नाही जाणवलं रे. मग आता कसं जाणवतंय?? मी वयात आलेय की प्रेम वयात आलय. कळेनासं झालंय… ही मैत्री की प्रेम..??😊😊

बराच वेळ मैथिली भान हरपुन अनिकेतकडे पाहत होती. स्वतःशीच बडबडत होती.. मला आवडत तूला असं चोरून बघायला…😄😄 मैथिली मनातल्या मनात साडीचा पदर बोटानी चूरगळत लाजून स्वतःशीच पुटपुटली.. कोणी ऐकलं तर नाही ना म्हणून थोडी कावरीबावरी झाली.. हलकेच गालावर येणारी केसांची बट कानामागे घेत जराशी लाजली.

अनिकेत खिडकीत यायचा आणि तिची चाललेली लपाछुपी डोक्यावरचे ओले केस पुसत पहात राहायचा. मैथिली मग पून्हा मागे लपून राहायची. एव्हाना अनिकेतच्या ही लक्षात आलं होतं.. हे प्रेमाचं गोड वारं होतं. एक दिवस मैथिली तुळशीला पाणी घालत होती. अचानक अनिकेत तिच्या जवळ आला आणि म्हणाला,”जा पून्हा दारामागे.. मला तूला पदर चुरगळताना, मला चोरून पाहताना पाहाचय अगदी जवळून..”

मैथिली लाजली… आणि दाराच्या पायरीवर येऊन बसली… आणि अनिकेतनं हलकेच तिचा हातात हात घेतला आणि म्हणाला,” मैथु, मला माहित आहे, तू मला रोज लपून बघत असते आणि मी सुद्धा.. कारण मला सुद्धा तू आवडते खूप आवडते
पण…….. अनिकेत बोलता बोलता क्षणभर थांबला.. मैथिलीचा श्वास त्याच्या मागोमाग येऊन थांबला आणि अनिकेतचा हात अजून घट्ट झाला.

मैथिली ने विचारलं,”काय झालं?? पण काय…… ?? तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का?? अनिकेतचे डोळे भरून आले. भरल्या डोळ्यांनी म्हणाला,” माझं तुझ्यावरच प्रेम आहे दुसरी कोणी नाही पण…..मैथु मी खूप मोठ्या आजाराशी सामना करतोय ग..मला मेंदूला गाठ झालीय… रोज हॉस्पिटलमध्ये जावं लागतं..ऑपरेशन करायला सांगितलं आहे त्यानंतरसुद्धा डॉक्टरांनी जगण्याची शाश्वती नाही सांगितली.” दोघांच्याही डोळ्यातून आसवांचा पूर वाहत होता..

मैथिलीला एकदम आठवलं हल्ली त्याच्या हॉस्पिटल च्या फेऱ्या वाढल्या होत्या.. ती शांत झाली. अनिकेत हात घट्ट करत म्हणाला अनिकेतच्या जवळ आली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून धीर धरून विचारलं,” कधी आहे ऑपेरेशन?” अनिकेत म्हणाला, “दोन दिवसांनी..” मैथिली त्याचा हात अजून घट्ट पकडत म्हणाली,” काही नाही होणार राजा तूला.. मी आहे ना सोबत तुझ्या.. निर्धास्तपणे जा..”मैथिलीच्या शब्दांनी अनिकेतला धीर आला. हलकेच त्याने तिच्या गालावर आपले ओठ ठेकवले आणि तिथून निघून गेला..

मैथिली तडक घरी गेली. देव्हाऱ्यासमोर बसली. देवासमोर निरांजन लावले.. मनोभावे हात जोडून तिथेच बसून राहिली.. डोळ्यात पाणी आणि मुखातून हरिनामाचा जप सुरू होता आणि………

दिवसं जड होऊन सरत होते. अनिकेतचा श्वास मैथिली चालू ठेवत होती. ती फक्त त्याची म्हणून जगत होती. दोन दिवस जणू तिचीच सत्त्वपरीक्षा होती.. तिच्या प्रेमाची..

आठवड्यानंतर मैथिली पून्हा त्या दाराआड लपून तो यायची वाट बघत होती..आज त्याची खिडकी ओसाड वाटत होती. इतक्यात मागच्या बाजूने तिच्या कंबरेला अनिकेतनं घट्ट मिठी मारत मानेवरचे मोकळे केस बाजूला केले आणि………….
अनिकेत आणि मैथिली पून्हा त्याच पायरीवर बसले…… आणि दोघांनी हात अगदी घट्ट आवळून धरले होते.. कधीही न सोडण्यासाठी.. जन्मोजन्मीचे हे बंध कायमचे जपण्यासाठी..

निशा थोरे..💐

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा