तुळस

Written by

#तुळस

कोकणात पुरयी परतेकाच्या खळ्यात मातीन लिपलेली तुळस असायची.
पाऊसव कोकनात चिक्कार पडायचो.
त्याना काय होय? ह्या तुळशींची पडझड होय.
त्यांचे बाव्हळे पानयान झिजून कोसळायचे.

नरकचतुर्दशी झाली काय दोन तीन दिसांनी सगळे
झिलगे आपापल्या खळ्यातली तुळस मातीन लिपाक लागूचे.
ते मातीतले दगड धोंडे काढून टाकीत नी अशी निव्वळ माती पानयान चांगली मळून घेईत.
जुन्या तुळशीक ह्या मातीचा लिपाण करीत.
न्हानग्या भुरवण्यान तिका नितळ करीत.
त्या तुळशीक दोन चार मातीच्या पेढ्या चारवलेबाजून लिपलेल्या असायच्या.
खालची पेढी मोठी असायची.
तेचेवयली खालचीपरीस वायच न्हान.
असे तीन चार पेढे लिपीत नी मगे तेचेवर भरगच्च मातीची तुळस लिपीत.
आस्ते आस्ते हे मातीचे तुळशी लोप होइत गेले.

आत्ता लोकांनी नइन घरा बनवताना खळ्यात जांभ्या दगडापासून नक्षीदार असे तुळशी कारागिराकडसून बांधून घेतले हत.
त्या तुळशींका सिमेंटनी कपलात करुन आकरषक बनवतत.
तुळशीचे चारवले बाजूंक गणेश,लक्षुमी,क्रीष्णा अशा येगयेगळ्या देवतांची शिल्पा कारागीरांकडसून कोरून घेतत.
ही देवतांची शिल्पा लय देखणी दिसतत.

रोज सकाळी स्त्रिया न्हाऊन झाला की तुळशीक हळदकुंकू वहातत.
प्रदक्षिणा घालतत.
नमस्कार करतत.
तिका पानी अर्पण करतत.
फणसाच्या पानार गुळ नायतर साखरेचो नेयेद तुळशीक देखवतत.
न्हानगी पोरा मगे ह्यो नेयेद आवडीनं खातत.
तिनसाना तुळशीसमोर दिवा ठेऊन तिची पूजा करतत.

तुळशीचे लग्नाआधी चार दिस परतेक जण आपल्या दारासमोरचे तुळशीक आईल पेंटान रंगवतत.
तुळशीचे लग्नाकरता परसवातल्या दिंड्याचे काठीवयली साल काढून तिच्यार नक्षीकाम करतत.
पातीसकट चार पाच फुटाचो ऊस तुळशीत उभो करतत.
बोरा,आवळे,चिचा तुळशीत ठेयतत.
तुळशीक वटी बांधतत.
तिका नथ घालून सजवतत.
बाशिंग बांधतत.
हल्ली पोरा तुळशीभोवती लायटींग करतत.
मगे ती काय दिसता!
असा वाटता तिचा ता रुप बघितच रवाचा
नी डोळ्यात साठवून घेवचा.

तुळशीचा लग्न लावूचेसाठी वाडीतली लोका येतत.
तुळशीसमोर आंतरपाट धरून दुसरेबाजूक अविवाहित मुलाक उभो करतत.
खणखणीत आवाजात मंगलाष्टका म्हनान तुळशीचा
लगीन लावतत.
लग्नात घरमालक पोरांका चिरमुरे वाटतत.
न्हान पोरा लग्नाक येताना चिरमुरे जमा करुचेसाठी पिशे घेऊन येतत.
मगे चार पाच दिवस ते चिरमुरे चायवांगडा खाऊक
लय मजा येता.

घरात काय कार्यपरसंग आसलो काय,घरचो मालक तुळशीसमोर आंब्याची पाना ठेवून इष्टदेवतेक नमस्कार करुन आपला गाराना घालता.
गारान्यापरमान गुण इल्यार तुळशीसमोर देवाक नारळ नी जो काय नवस बोललेलो असता तो फेडतत.

घरातल्या शुभप्रसंगी प्रथम तुळशीसमोर
आंब्याची पाना ठेवून घरातला शुभकार्य निर्विघ्न
पार पडण्यासाठी देवाक गाराना घालतत.
सणादिशी तुळशीक घरात केलल्या
गोडाधोडाचा केळीच्या पानार
नेयेद देखवतत.
तेका वाडी दाखवणे म्हनतत.

हिंदू पुराणानुसार

1) धर्मराजाची चेडू तुळसा ह्या विष्णूभक्त हुता.
ता येकदा नह्यच्या काठार गेला हुता.थय श्रीगणेश ध्यानात मग्न हुते.त्यांच्या चेहऱ्यार तेज इला हुता.
तुळशेक ते लय आवाडले.

ता त्यांका साद घालूक लागला,
हे वक्रतुंडा, हे लंबोदरा!
झाला, गणेशाचा ध्यान भग्न पावला.
तेका इलो राग.
तेना इचारल्यान,”कित्याक गे माका साद घालतहस?”
तुळसा बोलला,”माका तुमी लय आवाडलास.माका तुमच्यावांगडा लगीन करुचा हा.”
गणपती बाप्पान तिका समजावल्यान,” गे माझे आवशी,
तू माका मातेच्या रुपात दिसतहस.नी मी
ब्रह्मचर्येच्या मार्गार आसय.माका काय ह्या
लग्नाच्या भानगडीत पडूक जमाचा नाय.”

ह्या आइकल्यार तुळशीक इलो राग.
तिना तेका शाप दिलो की तुझो विवाह होतलो.
गणेशाकव राग इलो.
त्याना तिका शाप दिलो,”तुझो विवाह असुरावांगडा होतलो.”

तुळस रडाक लागला नी गयावया करुक लागला.
तसा गणपतीन तिका उ:शाप दिल्यान की तिया याक
पवित्र, औषधी वनस्पती होशीत नी श्री विष्णूंवांगडा
तुझो विवाह होईत.
पुढे शंखचूदा नावाच्या राक्षसाशी त्याकाच जालंधर म्हनान ओळखतत,तेचेशी तेचा लगीन झाला.
दरवरसा शाळीग्राम स्वरुपातल्या श्री विष्णूशी देवउठनी
एकादशीदिशी तुळशेचा लगीन लावतत.

२) जालंधर नावाच्या असुरानं मॉप तप करून अपराजित होण्याचो वर मिळवलेलो.
ह्या असुरेच्या बायलेचा नाव हुता व्रुंदा.
व्रुंदा लय मर्यादाशील नी पतिव्रता हुता.

जालंधर उन्मत्त झाललो.
तो स्वर्गातले पोरींका,ऋषीकन्यांका छळी.
येकदा तेची वाईट नजर पार्वतीर पडली.
शंकराक इलो प्रचंड राग.
आपले बायलेक असो बघता म्हंजी काय.
शंकरान जालंधराशी घनघोर यूद्ध सुरू केला.
पन व्रुंदेंच्या पातिव्रताकरनान जालंधरची
शक्ती वाढत हुती.

शंकरान तेचा पातिव्रत्य भंग करुची जबाबदारी
श्नीहरी विष्णुवर सोपवल्यान.
विष्णून तेंच्या घराजवळ येक शव ठेवल्यान नी
अशी माया केल्यान की व्रुंदेक वाटला ता जालंधरचा
शव आसा.
झाला व्रुंदा रडाक लागला मोठ्यान.
थयसून साधू जाईत हुतो त्याना आपल्या
कमंडलूतला पानी मारून त्या शवाक जीवंत केल्यान.

आपलो पती जीवंत झालो ह्या आनंदात जशी
व्रुंदान त्या परपुरुषाक (जो तिका विष्णूच्या मायेमुळा
जालंधर वाटी हुतो)मिठी मारल्यान..थय
युद्धभूमीर जालंधराची शक्ती कमी झाली.
नी शिवशंकरान तेचो वध केलो.

जेंव्हा व्रुंदेक ह्या दोघांचा कटकारस्शान समाजला
तेंव्हा तिना शंकरार बहिष्कार टाकलो.म्हनान शिवपिंडीर कधी तुळशी वहात नायत.

विष्णूक तिना शाप दिलो की तुझो दगड होतलो.
मगे सगळे देवांचे इनंतीवरुन तिना तो शाप मागे घेतलो.
व्रुंदेन असोव शाप दिललो की जशी तुम्ही माझी नी
माझ्या पतीची ताटातुट केलास तसा तुमकाव पत्नीवियोग सहन करुचो लागतलो.
विष्णूक रामाचे अवतारात सीतेचो वियोग सहन
करावो लागलो.

आपले घोवाचे शवाठिकानी व्रुंदा सती गेली.
त्या जागेवर तुळस उगवली.
विष्णूक आपला क्रुत्य आवडला नाय नी
त्याना आपला येक रुप दगडात प्रकट केला.
तेका शाळीग्राम म्हनतत.
तेना व्रुंदेक ह्यो वर दिला की पुढचे युगात तुळशीचे
रुपात तु माझे पूजेत आवश्यक आसशीत नी तुळस प्रसादार ठेवल्याशिवाय मी प्रसाद खाणार नाय.

व्रुंदेचा पावित्र्य लक्षात घेऊन देवउठनी एकादशीक
म्हनजेच कार्तिक शुध्द एकादशीक तुळशीचो विवाह
श्नी विष्णू रुपातल्या शाळीग्रामाशी करतत.
असो विवाह करवून आणणार्या घरमालकास कन्या
नसली तरी कन्यादानाचा पुन्य लाभता.
मिया म्हनतय देवातनीपन तेकाळी किती राजकारन
चालत हुता नाय🤔🤔

औषधी गुणधर्म

तुळस वातावरणातली नकारात्मकता हटवता.
वातावरण शुद्ध ठेवता.
तुळशीचो रस मधातून घेयल्यार खोकलो बरो हुता.
तुळशीची पाना, मिरी,दालचिनी, गुळ यांचो काढो घैतल्यारसर्दीतापात आराम मिळता.
न्हाऊचे पानयात तुळशीची पाना घालून स्नान
केल्यार अंगातसून घाण वास येत नाय.
त्वचारोग होइत नायत.
रोज तुळशीचे पानांचा रस पियाल्यार मुतखडो
इरघळून पडता.

तुळशीचे बियांत फायबर,लोह,प्रोटीन असता.
हे बिये पान्यात टाकून तासाभरानंतर ते पानी
रोज पिला की अपचन होत नाय,
शरीरातलो थकवो कमी हुता.
मधुमेह, रक्तदाब नियंत्रित रवता.
वाईट कोलेस्टेरॉल कमी हुता.
पन गरोदर बायकांनी, न्हान मुलांनी, वयस्कर
मानसांनी तुळशीचा बी खाऊ नये.
तुळशीच्या पानार पारो असता.ती चावून खाल्ल्यार
दात खराब होतत.रस करुन पियाचो.💐💐

——–/// गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा