तुही मेरा (प्रेम कथा) भाग 1

Written by

© शुभांगी शिंदे

तुही मेरा…

भाग 1

college ची बास्केटबॉल प्रॅक्टिस मॅच सुरू आहे…. सगळीकडे फक्त राघव…. राघव… 👏
राघव… राघव…. जल्लोष सुरू आहे…
बाॅल विरूद्ध टीमच्या खेळाडूच्या हातात आहे ते एकमेकांना बॉल पास करत असल्याचे भासवत होते पण बॉल काही हातातून सुटत नव्हता त्यांच्या… अचानक राघवने त्याचा गेम खेळत समोरच्या खेळाडूच्या हातून बॉल आपल्या ताब्यात घेतला आणि मग काय पहिल्याला धक्का, दुसर्याला हुलकावणी, तिसर्याच्या दोन पायांमधून बॉल पास करत परत आपल्या ताब्यात घेऊन, चौथा आणि पाचव्याला रडकुंडीला आणून फानयली he jump over the sixth player…. And it’s a basket…. Wo ho ooooo….

सगळीकडे परत एकच जल्लोष सुरू झाला … राघव ….. राघव…
मुली तर अक्षरशः त्याच्यासाठी वेड्या होत्या…. त्याची एक नजरभेट आणि स्माईल पाहण्यासाठी सतत त्याच्या अवतीभोवती असायच्या…. सगळे खेळाडू गेम चांगला झाल्याबद्दल एकमेकांची पाठ थोपटत होते… गर्दीचा जल्लोष बघून राघवने गर्दीकडे बघून एक flying kiss 😘 केल तस गर्दीतल्या मुली तर अगदी वेडावल्या…

राघव देशमुख कॉलेज टॉपर आणि बास्केटबॉल चॅम्पियन… उंच धिप्पाड, गोरापान, सरळ नाक, कर्ली ब्राऊन हेअर.. एकदम स्टायलिश लुक… एक श्रीमंत घरातील एकुलता एक मुलगा… Attitude अगदी ठासून भरलेला पण सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा आमचा राघव… दिसण्याचा गर्व नाही की श्रीमंतीचा माज नाही असा हा कॉलेजचा सर्वांचा लाडका राघव…

प्रॅक्टिस संपवून राघव आणि त्याचे मित्र कँपसच्या बाहेर पडत होते… तस त्यांच्यातल्या एकाने सगळ्यांना एका क्लास रूम बाहेर थांबवले… वाकून पाहिल तर तिथे डान्स प्रॅक्टिस सुरु होती…

अभय : Hey look…. नयना… (excited होऊन)

राघव : come on अभय… Please… आता इथे नको…

अभय : काय यार साल्या तुझ नेहमीच आहे…अरे नयना आहे ती… सगळे मुल हिच्या मागे मागे आणि तु??? तुलाच ठाउक….

राघव : ok ok आता तु परत सुरू होऊ नकोस… मी थांबतो इथे तुम्ही जा आत आणि बघा प्रॅक्टिस…

अभय आणि त्याचे बाकी मित्र पुढे गर्दीत मिसळून नयनाची प्रॅक्टिस बघत बसतात…

नयना कारखानीस…. उंच, देखणी, बोल्ड आणि ब्युटीफूल… कारखानीस जे एक बिझनेसमन आहेत त्यांची एकुलती एक मुलगी… अतिशय रागीट … पण मनाने हळवी… हिलाही attitude ठासून भरलेला पण सगळ्यांच्या मदतीला नेहमी हजर… कथकमध्ये well trained… कॉलेजच्या मुलांच्या दिलाची धडकन…

नयना आणि तिच्या पार्टनरने चांगलाच ठेका धरला होता पण अचानक एका ठिकाणी येऊन तिच्या पार्टनरची पकड सैल झाली आणि नयना खाली पडली… तस गर्दीतून एकाचा खळखळून हसण्याचा आवाज ऐकू आला… आता पर्यंत बाहेर बसलेला राघव आत येऊन कधी प्रॅक्टिस बघायला लागला हे त्याच्या मित्रांणापण कळल नाही… आणि तो नयनाच्या पडण्यावर हसत होता… गंमत समजून तिथे उभे असलेले काही नवीन स्टुडंट तेही राघवला शामिल झाले पण अभय आणि जे लोक नयनाला चांगले ओळखत होते त्यांनी शांतच रहाण पसंत केलं कारण नयना अजून शांतच होती… अशा परिस्थितीत नयनाच शांत राहण म्हणजे वादळापूर्वीची शांतता….

नयनाने एक नजर राघवकडे पाहिल 😡 तो अजूनही पोट धरून हसत होता… तिच्या पार्टनरने तिला उठण्यासाठी मदतीचा हात दिला पण ती स्वतःहून उठली आणि उठल्याबरोबर आपल्या पार्टनरच्या एक कानशिलात लगावली… तस सगळीकडे भयाण शांतता पसरली…

नयना : (आपल्या पार्टनरला) एक महिना झाला प्रॅक्टिस सुरू आहे… लक्ष कुठे असत तुझ…???

विरेन जो नयनाचा पार्टनर आहे तिला सॉरी बोलुन परत प्रॅक्टिसला सुरूवात करतो… पण नयना आता अजूनही भडकलेलीच होती…

नयना : कितीदा सांगितले आहे प्रॅक्टिस सुरू असताना क्लासरूमच दार बंद करत जा म्हणून…. आणि ती गर्दीवर एक कटाक्ष टाकते… 😡

तिचा राग बघताच सगळेच हळूहळू तिथून सटकतात…

राघव : (त्याच्या मित्रांना) तुमच झाल असेल तर आपण निघायच का??? फालतू मध्ये टाईम वेस्ट केला… नाचता येईना आंगण वाकडे…. 😂

नयना : Hey you mind your tongue हा… 😡

तसा राघव तिला प्रत्युत्तर देणार इतक्यात राघवचे मित्र
आता यांच इथे भांडण जुंपणार हे ओळखून त्याला घेऊन बाहेर जातात…

राघव आणि नयना दोघेही कॉलेजचे टॉपर… आणि सर्वांचे रोल मॉडेल… एक दोन मार्कांच्या फरकाने कधी राघव पुढे तर कधी नयना पुढे… या दोघांच एकदिवसही पटत नाही… हे संपूर्ण कॉलेजला माहीत आहे…..

 

क्रमशः

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल 🙏🏻)

फोटो साभार गूगल

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत