तुही मेरा… भाग 13

Written by

© शुभांगी शिंदे

तुही मेरा…

भाग 13

समोर प्रिंसिपल सर पोलिसांसोबत बोलत होते.. शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नक्की काय घडल हे कळेल.. प्रत्यक्षदर्शी असच वाटतय की आत्महत्या वाटतेय पण त्याच्या चेहऱ्यावरचे वळ काही वेगळच सांगत आहेत..

अभय आणि राघव हाच विचार करत होते की नक्की काय घडल असेल.. दोघेही जाऊन क्लासरुममध्ये बसतात.. रिसेस मध्ये राघव आपल्या बुकमध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवतो आणि वर्गाच्या बाहेर जाता जाता नयनाच्या डेस्कवर ते बुक ठेवून जातो.. नयना मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते.. तिच्या लक्षात येताच ती ते बुक हातात घेते आणि राघवच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत असते.. क्लासच्या बाहेर पडताच राघव इशार्याने बुक उघडून बघण्यास खूणवतो..

नयना बुक ओपन करून नोट वाचते.. “मला कॉलेजच्या मागच्या गेटवर भेट ” नयना मेसेज वाचुन खूलते.. मैत्रिणींना बाय करून बॅग घेऊन निघते.. नयना कॉलेजच्या मागच्या गेटवर पोहचते तर तिथे कोणी नसत.. थोड्यावेळात राघव बाइक घेऊन तिथे येतो..

राघव : चल बस लवकर..

नयना : अरे कुठे जायचंय?? आणि हि बाईक तर अभयची आहे ना.. ??

राघव : ( डोक्यावर हेल्मेट चढवत) सांगतो… आधी तुझा स्कार्फ बांधून घे आणि बस लवकर..

नयना रेडी होउन बाइकवर बसते.. मीनलचा राघवला मेसेज येतो की ती कॉलेजला येतेय आणि तिथून दोघे लंचला जाणार आहेत… म्हणून राघव तिथून मीनल यायच्या आत पळ काढतो…

राघव नयनाला घेऊन समुद्रकिनारी फिरायला येतो.. बाईक पार्किंगमध्ये लाऊन दोघेही समुद्राच्या दिशेने येतात.. नयना थोडा लटका राग व्यक्त करते..

नयना : बोलु नको माझ्याशी… मीनलाच घेऊन यायच होत.. (त्याच्या दंडाला चापटी मारत) आणि काय रे.. तु रात्री तिला किसपण केलस.. 😡 (नाक फुलवून)

राघव : अग बाई… तु समजून किस केल.. आता ती अचानक जवळ येइल हे थोडी माहीत होतं.. ते सोड.. आपण पहिल्यांदा अस बाहेर फिरायला आलो आहोत.. आता मूड नको ना खराब करू.. 🙈

नयना : हमम (नाक उडवून चालायला लागते)

बिचारा राघव तिच्या मागोमाग तिला मनवतोय.. त्याला काय माहीत की नयना त्याची गंमत करतेय.. 😂

🎶🎶तुम्हे पता तो होगा, तुम्ही पे मे फिदा हुँ
तुम्हे है जब से चाहा, हवाओं मैं उडता हूँ
तुम्ही मेरे हर पल मैं, तुम आज मैं, तुम कल मैं
हे शोना, हे शोना, हे शोना, हे शोना

तुम्हे पता तो होगा, के मेरे दिल में क्या है
चलो कहे देती हूं , कभी नहीं जो कहा हैं
तुम्ही मेरे हर पल मैं, तुम आज मैं, तुम कल मैं
हे शोना, हे शोना, हे शोना, हे शोना

तुम जो घुस्सा भी करो तो, मुझे प्यार लगता है , जाने क्यूँ
मैं तो जो भी कहूँ, तुम्हे इकरार लगता हैं, जाने क्यूँ
छोडोभी ये अदा, पास आके जरा ,
बात दिल की कोई, केह दो ना ..
हे शोना, हे शोना, हे शोना, हे शोना 🎶🎶

राघव एका खडकावर सावलीच्या ठिकाणी समुद्राच्या दिशेने पाय लांब करून बसतो आणि नयना त्याला टेकून त्याच्या कुशीत शिरून बसते.. राघव मागून नयनाला बाहुपाशात आवळत लटकेच चिडवतो..

राघव : शेवटी आपणही वेडेपणा करायला लागलो.. कुणीतरी बोलल होत आपल्यात अस काही होणार नाही म्हणून… 😉

नयना : हो का… मग तर आज तो मुर्खपणा केलाच पाहिजे.. 🙈

अस म्हणून राघवने घातलेल्या जॅकेटला ओपन करून ती अजून राघवला घट्ट बिलगून ते जॅकेट स्वतःभोवती घेते.. म्हणजे एकाच जॅकेटमध्ये एकमेकांना बिलगून बसले.. राघव तसाच तिच्या माथ्याच चुंबन घेतो.. नयनाही अगदी लाडिक होऊन जाते..

राघव : नयना मला खरच मीनल अस काही बोलेल, अस वाटल नव्हत.. 😥

नयना : हमम … तु तिला स्पष्ट काय ते सांगुन टाक… 😏

राघव : (नयनाला चिडवण्याच्या सुरात) पण मी काय म्हणतो नयना राहू दे ना तिलाही.. असही तु सारखी सारखी रागवत असतेस.. मग तिच्याकडे जात जाईन… उलट तिच तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्यावर … 😉

नयना : काय म्हणालास ???

आणि उठून राघवला मारायला जाते पण जॅकेटमध्ये अडकून बसल्याने तिला ते जमलं नाही.. ती राघव वरच रिटर्न आदळली.. शुsss… म्हणत राघवने तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवत, वाऱ्याच्या झुळुकाने तिच्या चेहर्‍यावर उडणारे केस अलगद बाजूला सारले… एव्हाना नयनाही शांत झाली होती.. राघवचा स्पर्श तिला शहारून टाकत होता.. त्याने अलगद आपला जॅकेट सोडावला आणि उठुन परत तिला चिडवून पळू लागला..

राघव : पण काहीही म्हण… मीनल खरच खूप सॉलिड आहे.. 😉

नयना : राघव…. थांब पळतो कुठे ?? 😡

आणि तीही त्याच्या पाठी पळू लागली.. वाळूत अडकून पडणारच होती की राघवने सावरल… दोन्ही हातांनी त्याला मारु लागली.. जा तिच्याकडेच जा. .. मला नाही बोलायच तुझ्याशी..

राघव तिचे मारणारे हात पकडतो… नयना आपली थोडी चिडलेली आणि रडवेली झालेली असते.. राघव तिला मिठीत घेतो, ” I LOVE YOU ” नयना…, तरी ती त्याच्या छातीवर डोक ठेवून एका हाताचे मुठके मारतच असते…

राघव : नयना… (अगदी प्रेमाने) माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहित आहे की तुझही माझ्यावर खूप खूप खूप प्रेम आहे… 😍

नयना : (थोड्या रडवेल्या सुरात) तु नेहमी मला सतावतो.. 😔

राघव : गंमत केली ग थोडी, तु चिडली ना की खूप गोड दिसतेस.. (तिचा चेहरा आपल्या बोटांनी वर उचलून) आणि तुला मनवायला अजून मजा येते… 🙈

नयना हलकेच लाजते.. मगाशी पळता पळता ते समुद्राच्या पाण्यात भिजत आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही.. त्याच तिला प्रेममय नजरेन पाहण, तिच नजर चोरून लाजण, कमरे इतपत समुद्राच्या पाण्यात भिजत, लाटांच्या सूरात मंत्रमुग्ध होऊन, गार वाऱ्याने स्पर्शून जाण काय योग जुळून आला होता… त्या निसर्गाच्या सौंदर्यात हरवत राघवने आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले.. आज स्वप्न नव्हते.. आणि साक्ष देण्यास कोण हवे होते.. तिही त्याच्यात वाहवत गेली.. 💏 आणि आसमंत दरवळला त्यांच्या प्रेमाने…

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळी राघवने नयनाला घरी सोडले आणि तो आपल्या घरी परतला… मीनल हॉलमध्ये बसून वाटतच पाहत होती.. राघवच्या आई सोबत गप्पा मारत होती… राघवला वाटल मीनल काही गोंधळ घालेल पण तस काहीच झालं नाही.. ती शांतच होती.. आईबाबा आज बाहेर कुठेतरी नातेवाईकांकडे जेवायला जाणार होते.. म्हणजे घरी आज फक्त मीनल आणि राघवच थांबणार होते..

रात्री आईबाबा गेल्यानंतर मीनल आणि राघव एकत्र जेवायला बसले.. मीनल जरा जास्तच राघवच्या मागे पुढे करत होती.. तीच हे जास्त जवळ येण राघवला अवघड फील करत होत.. राघवने सरळ तिला स्पष्ट सांगितले की त्याच आणि नयनाच एकमेकांवर खूप प्रेम आहे.. मीनलने त्याचा नाद सोडून द्यावा..

राघव : मीनल तु खूप चांगली आहेस.. तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल…

मीनल : (थोडी निराश होत) हमम… Actually I’m sorry… राघव मला आधी माहित असतं की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता तर.. Anyways पण मी तुझी चांगली मैत्रीण तर बणूच शकते ना…

राघव : (मीनलचा समजूतदारपणा बघून खुश होतो) Thanks मीनल.. तु माझ टेंशन हलक केलस.. आपल्यातली मैत्री कायम अशीच घट्ट राहिल.. तु खरच खुप छान आहेस…

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

असेच दोन महिन्यानंतर कॉलेजच हे शेवटच वर्ष संपल.. मीनल हे न ते कारण देऊन अजूनही इथेच स्थाईक आहे.. नयना स्पेशल कोर्ससाठी आज लंडनला रवाना होणार आहे.. राघव, अभय, दिप्ती आणि मीनल नयनाला एअरपोर्टवर सोडण्यासाठी जातात..

आता हळूहळू राघवला त्याच्या वडिलांनी बिझिनेस मध्ये लक्ष देण्यासाठी अॉफीस जॉईन करायला लावले.. मीनल इथे
आपल नवीन कोर्स सुरू करते आणि मिळेल तो वेळ राघवच्या घरच्यांबरोबर घालवते.. मीनल आणि राघवची मैत्री आता अजूनच घट्ट होत जाते.. नयनाला तिच्या अभ्यासातून आणि राघवला कामाच्या व्यापातून एकमेकांना फोन करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता.. ते आपले ईमेल द्वारे बोलत होते… एक दिवस नयनाला सरप्राईज द्यायच ठरवून तो मीनलला त्याबद्दल सांगतो…

बाबांना काही कारण सांगून दोन दिवसांची परवानगी मिळवतो… दुसर्‍या दिवशी सकाळीची फ्लाईट असल्याने राघव रात्रीच आॅफीसमध्ये उशीरापर्यंत थांबून सगळी कामं आटोपून घेत असतो…

राघव घरी उशिराने येतो.. आई आणि बाबा कधीच झोपी गेले असतात.. नेहमी जेवणासाठी आपली वाट बघणारी मीनलसुद्धा कुठे दिसत नव्हती.. त्याला वाटले ती झोपली असेल.. तो तसाच आपल्या रुममध्ये निघून गेला.. दार उघडून पाहिले तर समोर संपूर्ण बेडरूम मेणबत्तीच्या प्रकाशात उजळून निघाला होता.. मेणबत्तीच्या उष्णतेने विरघळलेल्या मेणातील लॅव्हेंडरचा सुगंध खोलीत दरवळला होता… त्याने समोर पाहिलं तर मीनल अजूनही काही मेणबत्त्या सजवत होती.. पण राघवची नजर एका क्षणासाठी मीनलवरच येऊन थांबली..

काळ्या रंगाची नेटची साडी त्यावर embroidery work, डाव्या खांद्यावरून खाली सोडलेला पदर, चकाकणारा गडद गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस डिप बॅकनेक ब्लाऊज त्यातून दिसणारी तीची गव्हाळ रंगाची पाठ त्या टिमटिमणार्या प्रकाशात अतिशय खुलून दिसत होती, रोल करून उजव्या खांद्यावर मोकळे सोडलेले केस, कानात मोठे आॅक्साइडचे स्टडस, एका हातात ब्लाऊजला मॅचिंग गुलाबी रंगाचा भरीव चुडा, डोळ्यांवर गडद आयलायनर, हलका मेकअप, ओठांवर नॅचरल पिंक कलरची लिपस्टिक… खूपच मादक दिसत होती आज मीनल…

मीनल राघवच्या पुढ्यात येऊन उभी राहिली तरी राघव तिलाच बघत होता… तीने चुटकी वाजवताच तो भानावर आला…

राघव : you looking gorgeous… 😍

मीनल : हमम (आणि हलकेच हसली) 🙂

राघव : पण हे सगळं काय आहे…

मीनल : आज माझा बर्थडे आहे..

राघव : खरच?? मग आधी का नाही सांगितलं आपण छान सेलिब्रेट केल असत.. आपण आताच जाऊयात बाहेर.. तु थांब मी फ्रेश होऊन येतो… (आणि तो पुढे वळतो तोच मीनल त्याचा हाथ पकडून त्याला थांबवते)

मीनल : आता नको.. आपण ईथेच सेलिब्रेट करू… बघ इथे सगळ रेडी आहे… (अस सांगत ती समोरच्या टेबलाकडे खुणवते)

समोरच्या टेबलवर शँपेनची बॉटल आणि केक सजवून ठेवला होता.. संपूर्ण टेबलवर गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्या मध्यावर pineapple Cake, दोन ग्लास आणि एक शँपेनची बॉटल… 🍾🥃🎂

राघव : ओहह वाउव… पण मी ड्रिंक्स नाही घेत.. 🤗

मीनल : आज सगळ माफ हं… माझा बर्थडे आहे ना… सो माझ्यासाठी… प्लीज… 🤗

राघव : OK but only one सीप…. 🙂

अस म्हणत दोघांनी मिळून बर्थडे सेलिब्रेट केला.. मीनलने केक कट केला आणि राघवने आपल्या हाताने तिला केक भरवला… ” Happy birthday मीनु ” राघव म्हणाला… मीनलने शँपेनची बॉटल ओपन केली आणि दोन ग्लास भरले..

मीनल एका घोटात संपूर्ण ग्लास संपवते.. राघव तिच्याकडे बघून अवाक होतो.. त्याला तर त्या वासानेच अवघडून जाते.. ” अरे कसा रे तु?? ” अस म्हणत मीनल तो भरलेला ग्लास त्याच्या तोंडाला लावून जबरदस्ती संपवायला लावते.. आणि हसायला लागते..

मीनल : खरच कठीण आहे.. मला अजूनही पटत नाहीए की तुझ्यासारखा यंग मुलगा ड्रिंक्स घेत नाही.. You are really great…

राघव : ग्रेट तर तु आहेस… एवढी मॉडर्न असशील कस वाटल नव्हत… (आणि तो हसतो)

अस करत दोघे मिळून ती एक बॉटल संपवतात..

मीनल : shall we dance???

राघव : आत्ता??? No music.. ( खुणेनेच सांगतो) आईबाबा पण झोपले असतील…

मीनल : म्युझिकची गरज नाही.. असच थोड चिलल करु….

असेच दोघे गप्पा मारत डान्स करायला लागतात.. राघवला ड्रिंक्स आता जरा चढायला लागली होती.. त्याला अधूनमधून गरगरत होते..

थोड्यावेळाने मीनल जायला निघते पण राघव तिचा पदर पकडून तिला आपल्या जवळ ओढतो… मीनल थोडी दचकते…

राघव : तु खूप छान आहेस.. I really miss you… I love you lot.. नयना….

मीनल : राघव….

राघव आपल्याला नयना समजतोय हे कळत असूनही मीनल काही बोलत नाही उलट त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देते..
राघव नशेत असल्याने तो मीनलला नयनाच समजत असतो.. अचानक भोवळ येऊन राघव खाली पडतो.. पण त्याही अवस्थेत तो नयना नयनाच करत असतो…

क्रमशः

(हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल 🙏🏻)

भाग 14 👇

तुही मेरा… भाग 14

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा