तुही मेरा… भाग 14

Written by

© शुभांगी शिंदे

तुही मेरा…

भाग 14

राघव आपल्याला नयना समजतोय हे कळत असूनही मीनल काही बोलत नाही उलट त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देते..
राघव नशेत असल्याने तो मीनलला नयनाच समजत असतो.. अचानक भोवळ येऊन राघव खाली पडतो.. पण त्याही अवस्थेत तो नयना नयनाच करत असतो…

सकाळी जेव्हा राघवला जाग येते तेव्हा त्याच डोक खूप दुखत असत, तो तसाच डोक चोळत आजूबाजूला नजर फिरवतो… मीनल त्याच्या बाजूला उपडी झोपलेली असते.. राघव तिला बघून बेडवरून उठून दूर जातो.. आसपास पाहतो तर दोघांचेही कपडे अस्ताव्यस्त पसरलेले होते…

मीनल नुकतीच आळस झटकून उठून बसते.. राघवला समोर शाॅर्टस वर बघून नजर चोरत दुसरीकडे वळते.. राघव अजूनही शॉक मध्येच आहे, एकतर डोक दुखतय, रात्री नेमक काय झालं हे सुद्धा आठवत नाही आणि मीनल??? (त्याला कळेनासं झालं होतं) तरी त्याने मीनलला विचारलच..

राघव : मीनल खर सांग रात्री नेमक काय झालं आपल्यात..

मीनल : (लाजून) तुला खरच आठवत नाही की मुद्दाम विचारतोयस???

राघव : (थोड दचकून) म्हणजे???

मीनल : राघव कालची रात्र मी कधीच नाही विसरु शकत.. रात्रभर होणारा तुझ्या प्रेमाचा वर्षाव अजूनही माझ्या अंगावर शहारे आणतोय.. तुझा तो स्पर्ष… उफफ!!! तु चक्क मला प्रपोज सुद्धा केलस.. I love you मीनल… म्हणत मला आपल्या मिठीत घेतलस.. अजून काय काय सांगू…

राघव : (रागात) shut up मीनल… मला रात्री चक्कर आली इथपर्यंत आठवतय… बस… त्या पुढे काहीही झालेले नाही…

मीनल : (राघवला घट्ट मिठी मारत) मस्करी करतोयस ना??

राघव : तीला दूर लोटत.. नाही मी मस्करी करत नाहीए… माझ फक्त आणि फक्त नयनावर प्रेम आहे…

आणि राघव बाहेर बाल्कनीत जाउन उभा राहतो.. तो हाच विचार करतो की नेमक रात्री काय झालं.. त्याच्याकडून अस घडूच शकत नाही…

मीनल मात्र रडत रडत बाहेर निघून जाते.. यासगळ्या टेंशनमध्ये त्याची फ्लाईट मीसस् होते.. सकाळी नाश्त्याला सगळे हजर होतात.. मीनल आणि राघव शांतच असतात.. राघवच तर कुठेच लक्ष नसत… तो नाश्ता अर्धवट सोडून आॅफीसला निघून जातो.. मीनलही गप गप असते.. दुपारून मीनल राघवला भेटायला त्याच्या आॅफीसमध्ये जाते.. राघव तिला भेटण्यासाठी नकार देतो.. ती हिरमसून घरी निघून जाते…

दोन दिवस असेच निघून जातात.. मीनल राघव सोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण राघव नजरसुद्धा मिळवत नाही.. त्याला आता स्वतःचीच लाज वाटू लागते.. तिच्या नजरेत नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही त्याची.. एक दिवस दुपारी राघवला आॅफीसमध्ये आईचा फोन येतो..

राघव आणि राघवचे बाबा ताबडतोब घरी येतात.. तेव्हा त्यांना कळत मीनलने झोपेच्या गोळ्या खाऊन घेतल्या.. पण ती थोडक्यात बचावते… आईबाबा मीनलला असे करण्याचे कारण विचारतात.. ती काहीच बोलत नाही.. शेवटी ते विचारण्याची जबाबदारी राघववर सोपवून रूमच्या बाहेर निघून जातात..

राघव : (खाली मान घालून) I am sorry… मीनल हे सगळं माझ्यामुळे झालं.. मी तुझा दोषी आहे.. पण मी तरी कस एक्सेप्ट करू मला काहीच आठवत नाहीये..

मीनल : राघव… Don’t be sorry.. Actually I’m sorry.. मी तर फक्त माझ्या आईबाबांची शेवटची इच्छा पूर्ण नाही करू शकले म्हणून हे केल…

राघव : शेवटची ईच्छा म्हणजे??? मीनल तु काय बोलतेस??

मीनल : त्या दिवशी माझे आईबाबा तुला लग्नाची मागणी घालण्यासाठी मुंबईत यायला निघाले पण एअरपोर्टवर जाण्याआधी त्यांच्या कारचा अपघात झाला आणि ते दोघेही गेले.. माझ तुझ्यासोबत लग्न व्हाव हीच त्यांची शेवटची इच्छा होती… तीच पूर्ण करण्यासाठी मी इथे आले.. तुला आणि तुझ्या घरच्यांच मन जिंकण्यासाठी प्रयत्न करत राहिले..

राघव : पण मग अंकल आन्टी बद्दल आम्हाला आधी का नाही सांगितलं???

मीनल : मला सहानुभूती नको होती राघव… मला तुला प्रेमाने जिंकायच होत.. पण बघ ना आपल सर्वस्व देऊन सुद्धा मी हरले.. नाही करू शकले तुला आपलस.. आपल्या आईवडिलांची शेवटची इच्छा पण पूर्ण नाही करू शकले.. (आणि ती रडायला लागते)

राघव : तु रडू नकोस मीनल… Please मीनल… मला खूप गिल्टी वाटतय… (तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेऊन)

मीनल : I am sorry राघव… त्या रात्री मी स्वतःला सावरायला हव होत.. त्यात तुझ्या एकट्याचा दोष नाही.. काय करू सांग ना माझ लहानपणापासून तुझ्यावर प्रेम आहे.. नाही रोखू शकले स्वतःला… (त्याचा हात पकडून रडायला लागते) मॉम डॅड असते तर कधीच निघून गेले असते त्यांच्याकडे पण तेही या जगात नाही…

राघवची आई मीनलसाठी कॉफी घेऊन येत असते तेव्हा दारातूनच मीनलच राघववर प्रेम असल्याचे ऐकते.. आणि तिच्या आईवडीलांबद्दल सुद्धा त्यांना कळत.. मीनलची अशी अवस्था आपल्यामुळे झाली याच त्याला फार वाईट वाटत… राघव आपल्या आईवडीलांना सांगून मीनलसोबत लग्नाची इच्छा व्यक्त करतो.. राघवचे आईवडील हसीखुशी तयार होतात.. असही मीनलच या जगात कोणी नाही आपल्या शिवाय तिला दुसरा आधार नाही.. आपली सून म्हणून आलीच तर चांगलच आहे..

अगदी रीतसर राघव आणि मीनलच लग्न पार पडत.. राघव स्वतःला कामात व्यस्त करुन घेतो.. मीनल आता खूपच खूश असते.. राघव नवरा म्हणून मीनलची सगळी जबाबदारी पार पाडत असतो पण नयनाची जागा त्याने मीनलला दिली नव्हती.. लग्नाला दोन महिने झाले तरी राघव आणि मीनलच नवराबायकोच नात वरवरच होत.. त्या रात्रीनंतर राघव आणि मीनल शरीराने एकत्र कधीच नाही आले.. मीनलला या गोष्टीच खूप वाईट वाटत होतं.. राघव तिला सतत टाळत होता…

एक दिवस अचानक राघवच्या आईची तब्येत बिघडली.. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल.. डॉक्टरांनी अर्धांगवायूचा झटका बसल्याचे सांगितले.. चुकीची औषध घेतल्यामुळे बीपी अनकंट्रोल होउन हा झटका बसला.. त्या दरम्यान मीनलने घराची संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित सांभाळली.. राघवच्या आईची योग्य ती काळजी घेतली.. आईला त्या अवस्थेत बघून राघव मीनलच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडला..

मीनलने एक पत्नी आणि सून म्हणून सगळी जबाबदारी नीट सांभाळली आणि आपण मीनलला काहीच देऊ शकलो नाही… आता मीनल आपली पत्नी आहे.. आता तीच आपल सर्वस्व आहे.. आपल्या आयुष्यात आपण पुढे जायला हव…

मीनल आणि राघवचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला.. दोघेही एकमेकांसोबत खुश होते.. दोघांमधली दरी आता नाहीशी झाली होती..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नयनाचा दिड वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि ती भारतात परतली.. इथे येताच तिने अभयला फोन केला आणि राघवला सरप्राइज देण्याच कळवल पण तिला कुठे माहित होते की तीच सरप्राइज होणार आहे ते.. अभयला तर काहिच सुचत नव्हते की नयनाला नक्की काय आणि कसे सांगायचे.. तो फक्त हो म्हणतो..

आज मीनल आणि राघवच्या लग्नाचा वाढदिवस होता… एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती.. अभय नयनाला त्या पार्टीसाठी खोट कारण सांगून आमंत्रण देतो… नयना राघवला भेटणार म्हणून खूप खुश असते.. छान पीच कलरचा ड्रेस, त्यावर साजेसा दुपट्टा, कानात मोत्याचे स्टडस् , हातात मॅचिंग बांगड्या, कपाळावर नाजूक मोत्याची टिकली.. आज खास राघवची नजर तिच्यावरच खिळून राहावी म्हणून ती सतत आरश्यात स्वतःला न्याहाळत होती…

नयना हॉटेलमध्ये पोहचली तेव्हा पार्टी बऱ्यापैकी सुरू झाली होती.. हातात फुलांचा गुच्छ घेऊन ती राघवलाच शोधत होती.. त्याला भेटण्यासाठी खूपच आतूर झाली होती.. शेवटी तिला राघव दिसला तिने परत एकदा स्वतः नीट असल्याची खात्री करून घेतली आणि ती राघवच्या दिशेने निघाली…

समोर काही लोकांच्या घोळक्यात राघव गप्पा मारत उभा होता.. छान नेव्ही ब्लु कलरचा पठाणी सुट, त्यावर खड्यांचे ब्रृच, पायात मोजडी आणि त्याचा नेहमीचा चार्मिग लूक नयनाला नव्याने घायाळ करत होता.. नयना त्याच्या जवळ उभी राहिली तेव्हा तो तिच्या दिशेने पाठमोरा उभा होता…
नयनाने हाक देताच तो मागे वळला तर नयनाला बघून तो शॉकच झाला.. नयनाने राघवला सगळ्यांसमोर घट्ट मिठी मारली पण राघव?? तो तर शून्यात हरवला होता…

नयाना : (आनंदाने ओरडून) सरप्राईज… I miss you lot…. राघव… (डोळ्यात आनंदाश्रू होते) आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही… (आणि परत एकदा त्याला मिठी मारते)

इतक्यात राघवचा एक क्लाएंट राघवला बुके देऊन शुभेच्छा देतो..

क्लाएंट : Happy wedding anniversary Mr. राघव.. तुमच्या मिसेस दिसत नाही कुठे???

नयना : wedding anniversary ??? (तिच्या हातातला बुके तसाच निसटला आणि ती राघवकडे बघते)

तेवढ्यात मीनल तिथे येते.. गोल्डन रंगाची साडी, साजेसा गेटअप, गळ्यात डायमंडच मंगळसूत्र…

मीनल : (क्लाएंटला ओळखत असल्याने ) thank you Mr. साठे… Please enjoy the party..

नयनाची तर पायाखालची जमीनच सरकते.. ती फक्त आवाचून राघवकडे बघत असते.. तेवढ्यात मीनलच लक्ष नयनाकडे जात…

मीनल : अय्यो नयना what a pleasant surprise… कशी आहेस?? बर झालं राघव तु नयनाला आमंत्रण दिलस.. कधी आलीस तु नयना.. Anyways please excuse me.. काही गेस्ट माझी वाट बघत आहेत.. राघव please take care of her…

नयना : राघव (पाणावलेल्या डोळ्यांनी फक्त एवढंच बोलली)

राघव : नयना माझ आधी ऐकुन घे.. ( तिचा हात हातात घेऊन)

मीनल : (हातात हात घालून) राघव चल केक कट करूयात.. सगळे वाट बघत आहेत.. नयना राघवचा हात सोडशील please…

आणि ती स्वतःच राघव नयनाचा हात सोडवून त्याला घेऊन जाते… समोर छान तीन लेअरचा केक सजवला होता.. मीनलने राघवचा हात पकडत केक कट केला आणि पहिला घास राघवला भरवला… रागवच लक्ष नयनावर होत.. मीनलच्या खूणवन्यामुळे भानावर येऊन त्याने मीनलला घास भरवला…

नयना फक्त भरल्या डोळ्यांनी समोरच दृश्य पाहत होती.. तिला ते सहन नाही झाल आणि ती रडत रडतच हॉटेलच्या बाहेर निघून गेली.. पार्किंगमध्ये गाडीजवळ येऊन उभी राहिली.. तिथे अभय आणि दिप्ती तिला भेटले.. नयना त्यांच काहिच ऐकुन घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. तिने रडत रडतच गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघाली…

🎶🎶 रब्बा मेरे इश्क़ किसी को
ऐसे ना तडपाये… होय
दिल की बात रहे इस दिल में
होठों तक ना आए

तुझे याद ना मेरी आई
किसी से अब क्या कहना
दिल रोया की अँख भर आई
किसी से अब क्या कहना

तुझे हर खुशी दे दी
लबों की हँसी दे दी
जुल्फों की घटा लहराई
पैगाम वफ़ा के लाई
तूने अच्छी प्रीत निभाई
किसी से अब क्या कहना…

वो चाँद मेरे घर-आँगन
अब तो आएगा
तेरे सूने इस आँचल को
वो भर जाएगा
तेरी कर दी गोद भराई
किसी से अब क्या कहना…

ख़ता हो गयी मुझसे
कहा कुछ नहीं तुमसे
इकरार जो तुम कर पाते
तो दूर कभी ना जाते
कोई समझे ना प्रीत पराई
किसी से अब क्या कहना… 🎶🎶

क्रमशः

(हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.. काही त्रुटी असल्यास तेही कळवा.. कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल, फोटो साभार गूगल 🙏🏻)

भाग 15 👇

तुही मेरा… भाग 15

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा