तुही मेरा… भाग 2

Written by

© शुभांगी शिंदे

तुही मेरा…

भाग 2

राघव आणि नयना दोघेही कॉलेजचे टॉपर… आणि सर्वांचे रोल मॉडेल… एक दोन मार्कांच्या फरकाने कधी राघव पुढे तर कधी नयना पुढे… या दोघांच एकदिवसही पटत नाही… हे संपूर्ण कॉलेजला माहीत आहे…..

राघव आणि त्याचे मित्र आपापल्या घरी निघून गेले…

राघव : (घरी आल्यावर) hiii आई…. खूप भूक लागलीये…. (सोफ्यावर अंग टाकतच तो म्हणाला)

आई : हात पाय धुवून घे…. मी जेवायला वाढते…

राघव : नको तु असच आण खूप भूक लागलीये….

आई : कधी सुधरणार तु??? (हलकेच हसून)

आणि आई जेवणाच ताट घेऊन आली ..

राघवने ताट पुढ्यात घेतल तस आई त्याला अडवत म्हणाली, “थांब मीच भरवते तुला ”

राघव : (आईच्या हातचा पहिला घास खाउन) I love you आई…. (आईला गळ्यात मिठी मारतो)

आई : नाटकी माहित आहे मला सगळ…. (आणि दोघेही हसायला लागतात…)

राघव : आई पुढच्या आठवड्यात आम्ही कॉलेजच्या स्टेट लेवलच्या स्पर्धेसाठी दिल्लीला जाणार आहोत…

आई : हमम… मी बॅग, पॅक करून ठेवीन… And All the best…

इथे नयना सुद्धा आपल्या घरी येते… घरी कुणीच नसत…. नॅनी सोडून….. नॅनी म्हणजे आपल्या नयनाला लहानपणापासून सांभाळणारी केअर टेकर… पण नयनासाठी खूप काही होती ती…. खूप जीव लावायची ती नयनाला… नयनाचे वडील बिझिनेस साठी सतत बाहेर असायचे, तीची आई समाजकार्यात आणि किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची…. त्यामुळे नयनाला त्या दोघांचा सहवास फार कमीच लाभला…. त्यामुळे तीला नॅनीच फार जवळची वाटायची…. आपली सगळी सुखदुःख नयना नॅनीसोबत शेअर करायची….

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नयना आपली गाडी घेऊन कॉलेजला जाते…. कॉलेजच्या गेटवर already एक गाडी उभी असते… गाडी हटत नाही म्हणून नयना हॉर्न वाजवते पण काही केल्या गाडीवाला गाडी बाजूला घेत नाही म्हटल्यावर ती अजून चीडते आणि अजून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागते…. तस तिथे राघव आणि राघवचे मित्र येतात… गाडी राघवची असते…. हे नयनाला माहित असत म्हणून ती अजून जोरात हॉर्न वाजवतच असते…

अभय : (नयनाला समजावत) अग गाडी पंक्चर झाली आहे… पंक्चरवाला आलाय आता होईल गाडी बाजूला दोन मिनिटे शांत रहा….

नयना : अशा भंगार गाड्या वापरता कशाला?? Useless… सकाळ सकाळ टाईमपास लावलाय नुसता… (चिडून)

आणि परत हॉर्न वाजवत बसते… एव्हाना तो गोंधळ ऐकून अर्ध कॉलेज तिथे जमा होत… आणि प्रिंसिपल सर पण तिथे आले…

प्रिं. सर : (गोंधळ बघून) What’s going on here??? नयना please stop it…. (तशी नयना आधीच गप्प होते).. काय लावलय सकाळी सकाळी तुम्ही दोघांनी???

राघव : सर गाडी इथेच पंक्चर झाली… हे बघा इथे कोणीतरी मुद्दाम हे खिळे टाकले आहेत…

नयना : फटिचर गाडी…. (गाडीच्या बाहेर येऊन नाक मुरडत )

प्रिं. सर : (एक कटाक्ष टाकत) नयना… Please…. आणि तुम्ही सगळे इथे काय करताय जा आपापल्या कामाला लागा…

तोपर्यंत पंक्चरवाला पंक्चर रिपेअर करतो… नयना आपल्या गाडीत जाउन बसणार तोच तिच लक्ष तिच्या गाडीच्या टायरवर जात… ते पण आता पंक्चर झाल होत ?

राघव आणि त्याचे मित्र हसायला लागतात…? तस प्रि. सर परत सगळ्यांना दम देऊन निघायला सांगतात… नयना आपल्या गाडीला लाथ मारून राग व्यक्त करते..?

प्रिं. सर : नयना आणि राघव तुम्ही नंतर मला अॉफीस रुम मध्ये भेटा… (पंक्चरवाल्याला) ए बाबा वातावरण खूप तापलय तु लवकर रिपेअर कर आणि निघ ?

राघव डोक्यावर हात मारून गाडी पार्क करायला जातो…. ?‍♂

थोड्यावेळाने नयना आणि राघव अॉफीस रूममध्ये येतात…

प्रिं. सर : (एक स्माईल देत) ? बसा…

दोघेही समोरच्या खुर्चीत बसतात….

राघव मगाजच्या गोष्टीच स्पष्टीकरण देतच असतो… पण सर त्याला मध्येच थांबवतात…

प्रिं. सर : हे बघा पुढच्या आठवड्यात स्टेटलेवलच्या स्पर्धा सुरू होत आहेत… कॉलेजला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत… So दोघेही एकत्र येऊन काम करा…

नयना : हो सर…. मी निघू आता… ?

सर पण हसतात आणि जा म्हणतात… राघव तु तुझी जबाबदारी चांगलीच संभाळशील…. लक्ष असू देत….

राघव : of course Sir… Will do our best…..

““““““““““““““““““““““““““““““`
सगळे स्पर्धेसाठी दिल्लीला पोहचले… तो पर्यंत पहाट झाली होती… हवेत छान गारवा पडला होता…सोबत त्यांचे चार शिक्षक पण होते… सर्वांना त्यांच्या रूमवर जाऊन आराम करण्यास सांगितले आणि नऊ वाजता नाश्ताला भेटू असे सांगून सगळे शिक्षक पण आपापल्या रूममध्ये निघून गेले…

दोघांना मिळुन एक रूम देण्यात आली होती… राघव आणि अभय एकत्र होते…. इथे नयना सोबत दिप्ती असते… सगळे नाश्ताच्या वेळेस कँटीनमध्ये भेटतात… तिथे काही इतर कॉलेजची पण मुल असतात… अशातच काही नवीन ओळखी व काही नवीन फ्रेंडस भेटतात…

अकरा वाजता सगळे सरावासाठी कँपसमध्ये जाण्यासाठी बस मध्ये बसतात….. कँपसमध्ये सगळेच आपापल्या सरावाला लागतात… नयनाने दोन स्पर्धेत भाग घेतला होता… एक सोलो डान्स कथक आणि दुसरा कपल डान्स सेमीक्लासिकल प्लस फ्री स्टाइल…. विरेन अजून आला नव्हता म्हणून ती आधी कथकची प्रॅक्टिस करत होती… थोड्यावेळाने विरेनही तिथे आला… नयनाने थोड रेस्ट घेऊन विरेन सोबत सरावाला सुरवात केली…

सगळ्यांची प्रॅक्टिस संपून आता संध्याकाळ झाली होती… सगळे परत बस मध्ये बसून हॉटेलला पोहचले… बसची स्टेअर ऊंच असल्यामुळे चढण्या उतरण्यासाठी लाकडी खोका मध्ये ठेवण्यात आला होता… सगळी मुल पटापट उड्या टाकून खाली उतरले… दोन तीन मुली उतरल्यावर दिप्ती उतरली आणि मागोमाग नयना उतरतच होती की विरेनने हळूच तो खोका पायाने गाडीच्या खाली सरकवला.. राघवने ते पाहीले पण नयनाच लक्ष नसल्यामुळे तिचा तोल जाऊन पाय मुरगळला… आणि ती “आई…. गं… ” ओरडतच खाली बसली…

मैत्रिणींनी तिला हात धरून उठवले…आणि आत हॉटेलच्या हॉलमध्ये नेले… मॅनेजरने डॉक्टर उपलब्ध करुन दिले… नयनाच्या पायाला बँडेज बांधले आणि हालचाल न करण्याची ताकीद दिली… सगळ्यांचेच चेहरे पडले…उद्या एवढी मोठी स्पर्धा आणि आज हे असं घडलं…नयना तर रडायचीच बाकी होती…. शिक्षकांनी तिला आधार देत समजूत घातली… पण राघवने जाऊन विरेनला जाब विचारला तस सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने पहायला लागले… राघवने घडलेला प्रकार सगळ्यांना सांगितला… त्या दिवशी नयनाने कानाखाली मारली म्हणून विरेनने अस केल हे तो कबुल झाला… शिक्षकांनी विरेनला शिक्षा आपण आपल्या कॉलेजमध्ये जाऊ तेव्हा बघू आता उद्याच्या स्पर्धेच काय ते आधी बघू…

सगळे आपापल्या खोलीत निघून जातात…. नयनाला धड चालताही येत नव्हते… दिप्ती आणि अजून एका मैत्रिणीने खांद्याचा आधार देऊन तिला खोलीत आणले…

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सकाळी सगळे स्पर्धेसाठी कँपसमध्ये दाखल झाले… नयनाला बऱ्यापैकी आराम पडला होता पायाला….. पण डान्स करण थोड कठिण होत…. त्याही परिस्थितीत ती डान्स करण्यास तयार होती कारण आता कॉलेजच्या इज्जतीचा प्रश्न होता… शिक्षकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकेल ती नयना कसली???

स्पर्धा सुरू झाली… आधी कपल डान्स होते…. नयना आणि विरेनच्या जोडीचा चौथा क्रमांक होता… पण विरेन आलाच नव्हता… तरी सुद्धा तिने तो डान्स एकटीने करायच ठरवल… शेवटी प्रयत्न करून हरलो तर चालेल पण आधीच हार पत्करायची नाही अस तिच मत होत….

Announcement झाली… नयना स्टेजवर आली आणि song play झाल… तिने नाचायला सुरुवात केली….

?? हीरे मोती मैं ना चाहूँ,
मैं तो चाहूँ संगम तेरा
मैं तो तेरी, सैयाँ, तू है मेरा
सैयाँ सैयाँ… ??

नयनाने ताल धरायला सुरुवात केली…. चार ओळीनंतर विरेन तिला जॉईन होणार होता… पण अचानक राघव स्टेजवर आला आणि त्याने नयनासोबत ताल धरला… नयना आधी आश्चर्यचकित झाली पण ती थांबली नाही… तिनेही नाचायला सुरूवात केली….

??तू जो छू ले प्यार से,
आराम से मर जाऊँ
आजा चंदा बाहों में,
तुझमे ही गुम हो जाऊँ में
तेरे नम में खो जाऊँ
सैयाँ सैयाँ ???

राघवचे मित्र आणि त्यांचे शिक्षक आश्चर्याने बघत होते पण खुशही होते…. राघवही इतका छान डान्स करू शकतो हे खरच surprising होत…. दोघेही बेभान होऊन नाचत होते…. ते एकमेकांत इतके हरवले होते की आजूबाजूचे भानच उरले नव्हते त्यांना….

??? मेरे दिन खुशी से झूमें, गाऐं रतें
पल पल मुझे डुबाएँ, जाते जाते,
तुझे जीत जीत हारू, ये प्राण प्राण वारूँ,
हाए ऐसे मैं निहारूँ, तेरी आरती उतारूँ,
तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते सैयाँ सैयाँ
बनके माला प्रेम की, तेरे तनपे झर झर जाऊँ
बैठूँ नैया प्रीत की, संसार से तर जाऊँ मैं, तेरे
प्यार से तर जाऊँ…….सैयाँ सैयाँ ????

दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून नाचत होते… ?आसपासच्या जगाचाही विसर पडला होता त्यांना… इतकच काय तर नयना पायाच दुःखणही विसरली होती….

??? ये नरम नरम नशा है, बढ़ता जाए,
कोई प्यार से घुंघटीया देता उठाए
अब बावरा हुआ मन,
जग हो गया है रोशन
ये नई नई सुहागन,
हो गई है तेरी जोगन
कोई प्रेम की पुजारन मंदिर सजाए
सैयाँ, सैयाँ, सैयाँ, सैयाँ ????

सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या…? अचानक लिफ्ट करताना तिच्या पायात कळ बसली… तिने ते चेहर्‍यावर जाणवू दिल नाही पण राघवने ते हेरल आणि डोळ्यांनीच तिला विश्वास दिला की मी आहे सांभाळून घ्यायला…..

???हीरे मोती मैं ना चाहू मैं तो चाहू संगम तेरा
मैं ना जानू, तू ही जाने, मैं तो तेरी, तू है मेरा
मैं ना जानू, तू ही जाने, मैं तो तेरी, तू है मेरा
मैं तो तेरी, तू है मेरा ??? ?

शेवटच्या ओळीवर त्याने तिला उचलून घेतले होते… तिने आपले दोन्ही हात वर पसरवले होते… आणि तो तिला घेऊन हळूहळू गोल फिरत होता… जसजस सुर कमी होत होता तसतस तो तिला हळूवार खाली उतरवत होता… आणि खाली उतरताच दोघेही एकमेकांच्या नजरेत परत हरवून गेले….? पहिल्यांदा मनातल्या भावना नजरेत व्यक्त होत होत्या….. ?

शेवटी गाण संपल आणि आजुबाजूला टाळ्यांचा कडकडाट वाजायला लागला… शिट्यांवर शिट्या वाजायला लागल्या…. तसे दोघेही भानावर आले… राघवने आपली मिठी सोडली… नयना चालायला लागली पण अडखळली…. राघवने तिला बॅक स्टेज नेले आणि खुर्चीवर बसवले…..

क्रमशः

 

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा