तुही मेरा… भाग 3

Written by

© शुभांगी शिंदे

तुही मेरा…

भाग 3

राघवने तिला बॅक स्टेज नेले आणि खुर्चीवर बसवले…..

तसे सगळेच त्यांचे मित्र, मैत्रिणी आणि शिक्षक त्यांच्या भोवती गोळा झाले…

अभय : (हात मिळवत गळा भेट करून) Great man… You did such great job… And नयना!! You’re outstanding….

शिक्षक : खरच खूप छान… राघव आम्हाला माहित नव्हतं की तु यातही माहीर आहे… आणि नयना खरच अप्रतिम… पायाची दुखापत संभाळून खरच खूप छान performance दिलास….

अभय : Thank you sir. Thank you mam..

नयना : Thank you all… And special thanks to अभय….

तसा सगळा ग्रुप जोर जोरात ओरडू लागला…

ओहो हो… Woo…. oooo…..

दिप्ती : चला फायनली आता तुमची भांडण मिटणार….

नयना : (नाक उडवून) अगदीच तस नाही… ?

अभय आणि बाकीचे डोक्यावर हात मारतात ?‍♂

राघव हलकेच मान डोलावून हसतो… नयना आपल्या पुढच्या performance साठी तयार व्हायला निघून जाते… जाताना हलकेच मागे वळून राघवला क्यूटशी स्माईल देते… राघवने आपल्या डोक्यात केसांवर हात फिरवला व तो पुढे निघून गेला….

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे नयना तिच्या सोलो डान्स performance ची तयारी करत होती… Costume चेंज करुन एका चेअरवर बसली आणि पायात घुंगरू बांधत होती.. तेव्हा तिला जाणवल की कोणीतरी तिला चोरून बघत आहे… पण तेव्हा नेमकी दिप्ती येते… आणि ते घुंगरू पायात बांधायला मदत करते… निदान हि स्पर्धा तरी कटेंड नको करु अशी विनवणी ती नयनाला करते पण नयना तिच अजिबात ऐकत नाही… इथे स्टेजवर तिच्या नावाची announcement होते तशी नयना पुढे जाते… स्टेजवर पोझिशन घेताच गाण सुरू होत….

???कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था
जैसे मेरी सारी दुनिया मैं गीतों की रुत
और रंगों की बरखा है
खुशबू की आँधी है
महकी हुई सी अब सारी फिज़ायें हैं
बहकी हुई सी अब सारी हवाएँ हैं
खोयी हुई सी अब सारी दिशाएँ हैं
बदली हुई सी अब सारी अदाएँ हैं
जागी उमंगें हैं
धड़क रहा है दिल
साँसों में तूफाँ हैं, होठों पे नगमे हैं
आँखों में सपने हैं,
सपनों में बीते हुए सारे वो सारे लम्हें हैं ??

दुखऱ्या पायावर जास्त जोर न देता… नयनाने व्यवस्थित ताल धरला होता… सर्वांना तर तिचीच काळजी लागली होती आणि तिचा अभिमान ही वाटत होता…

?? जब कोई आया था, नज़रों पे छाया था
दिल में समाया था, कैसे मैं बताऊँ तुम्हें
कैसा उसे पाया था,
प्यारे से चेहरे पे बिखरी जो जुल्फें तो ऐसा लगता था
जैसे कोहरे के पीछे इक ओस मैं धुला हुआ फूल खिला है
जैसे बादल में एक चाँद छुपा है और झाँक रहा है
जैसे रात के परदे में एक सवेरा है रोशन-रोशन
आँखों में सपनों का सागर
जिसमें प्रेम सितारों की चादर जैसे झलक रही है
लहरों-लहरों बात करे तो जैसे मोती बरसे
जैसे कहीं चांदी की पायल गूंजे
जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे
जैसे कोई छिप के सितार बजाये
जैसे कोई चांदनी रात में गाए
जैसे कोई हौले से पास बुलाये???

सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होत होता… स्टेजवर पडदा पडला आणि नयना तिथेच कोसळून पडली… पाय बऱ्यापैकी सुजला होता… मुलींनी तिला चेअरवर बसवले आणि पाणी दिले….

दिप्ती : कमाल आहे तुझी…. किती हट्टीपणा करशील… पाय बघ किती सूज आली आहे… आता सक्तीचा आराम करायचा….

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे काही वेळाने बास्केटबॉल मॅच सुरू झाली… पण राघवच काही केल्या लक्ष लागत नव्हत… समोरच्या टीमचा परडा भारी पडत होता… न राहवून अभयने राघवला लक्ष केंद्रित करण्यास सांगितले… पण राघवची नजर गर्दीवर टिपली होती….

(ब्रेकच्या दरम्यान)

अभय : राघव!!! तुझी ती स्कार्फवाली इथे नाही भेटणार… ती कोणत्याच activities मध्ये नसल्याने कदाचित तिला इथे येण्याची परवानगी नाही मिळाली… ?

राघव : she’s my lucky charm ?

अभय : राघव please… आता सगळे होप्स तुझ्याकडूनच आहेत…

राघव अजूनही गर्दीच न्याहाळत होता आणि अचानक त्याची नजर एका ठिकाणी स्थिरावली… तिच ती नेहमी वाली पिंक स्कार्फ संपूर्ण चेहरा झाकलेला फक्त तिचे डोळेच दिसायचे… ती नेहमी राघवला चीअर करायला गर्दीत असायची पण जेव्हा जेव्हा राघवने तिला भेटण्याचा प्रयत्न केला ती तोपर्यंत गायब व्हायची…

त्या पिंक स्कार्फवालीला बघुन राघवला आता नवीन स्फूर्ती आली होती आणि तो नव्या जोशाने खेळायला लागला… आणि फायनली राघवची टीम जिंकली… सर्वजण जल्लोष साजरा करत होते पण राघवला आज त्या पिंक स्कार्फवालीला गाठायचेच होते…. तो तिच्या दिशेने स्टेडियमवर पळाला… राघवला आपल्या जवळ येताना पाहून तिने तिथुन पळ काढला… जाताना तिचा पाय अडखळला पण ती तिथून निघून जाण्यास सफल झाली…

गर्दीतून वाट काढेपर्यंत राघवला तिच्या पर्यंत पोहचण्यास विलंब झाला आणि नेहमीप्रमाणे यावेळेसही त्याचा अपेक्षा भंग झाला….

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इथे डान्स कॉम्पिटिशनचे निकाल सुरू झाले… सगळी टीम फिंगर क्रॉस करून उत्सुकतेने वाट पाहत होती… आणि प्रथम पारितोषिक विजेते नयना, राघवची जोडी ठरली… नयनाला स्टेजवर जाण थोड कठिण होत पण राघवने तिला आधार देत स्टेजवर नेले चालताना त्याच लक्ष तिच्या त्या सूज चढलेल्या पायावर गेल.. आता तिच्या पायावर बँडेज नव्हत… त्याने एक नजर नयनावर टाकली… तिने खुणेनेच काय झाले विचारले पण राघवने नकारार्थी मान डोलावली… दोघांनीही पहिल्यांदा हसतमुखाने शेअरिंग पारितोषिक स्विकारल…

कारण यापूर्वी त्यांची आपसातच स्पर्धा असायची आज पहिल्यांदाच दोघांनी मिळून स्पर्धा जिंकली होती… सगळे खूप खुश होते… ते दोघेही स्टेजवरून उतरनारच होते की इतक्यात परीक्षकांनी त्यांना थांबवून घेतले आणि सोलो डान्स चे पारितोषिक पण जाहीर केले त्यातही बाजी नयनानेच मारली… सगळीकडे परत टाळ्यांचा कडकडाट झाला….

सगळेजण परत हॉटेलवर जायला निघाले… सगळे फोटो काढण्यात बिझी होते… पाय दुखत असल्याने नयनाला त्यांच्यासोबत जास्तवेळ उभे राहण्यास त्रास होत होता म्हणून ती दोन तीन फोटो काढून दिप्तीला घेऊन बसमध्ये बसायला गेली….

नयनाला बसची स्टेअरकेस ऊंच असल्याने चढण्यास त्रास होत होता… राघवने ते लांबूनच ते पाहिले… आणि तिथे मदत करण्यासाठी गेला…

राघव : दिप्ती!! ! तुला सर बोलावत आहेत…. (तिला तिथून कलटवण्यासाठी) ?

दिप्ती : अरे पण.. . नयनाला बसमध्ये….

राघव : (तिच बोलन मध्येच तोडून) मी आहे इथे तु जा ना ..

नयना जरा आश्चर्यानेच बघते…. दिप्ती निघून जाते… आजूबाजूला कुणीच नाही हे बघून राघव बोलायला सुरुवात करतो…

राघव : नयना!!! जरा स्पष्टच विचारतो… (तिचा हात खांद्यावर घेऊन तिला बसमध्ये चढण्यासाठी आधार देत)

नयना : (थोडी दचकून) हममम … काय विचारायच आहे…

राघव : मला माहीत नव्हतं की माझी जादु आधीपासूनच तुझ्यावर झाली आहे… तुच त्या गर्दीत मला चिअर करायला येतेस ना?? ?

नयना : (चमकून तिथेच थांबते) काहीही काय?? ? मी कशाला ते नसते उद्योग करू?? (परत नाक मुरडत)

राघव : ? मग मला सांग तुझ्या पायाच बँडेज कुठेय???

नयना : (आपली जीभ चावत) ?‍♂ अरे ते मी मगाशी काढुन ठेवल…. ( आपली बाजू सावरत)

राघव : (स्वतःच्या खिशातून बँडेज काढून)? हे मला स्टेडियमवर मिळाल.. जिथे तू पळताना अडखळलीस… .?

आतामात्र नयनाने नजर चोरली… ? राघवने तिच संधी साधून पटकन तिला उचलून बसमध्ये चढवले..? आणि तीला सीटवर बसवले… नयना चक्क लाजली होती… आणि राघव तिला बघून मनात हसत होता…

इतक्यात बाकीचे सगळे पण बसमध्ये येऊन बसले… राघव नयनाच्या बाजूच्या रांगेत दोन सीट पुढे बसला… सगळे बसमध्ये धमाल मस्ती करू लागले… गाण्यांच्या भेंड्या खेळू लागले… नयना मात्र गालातल्या गालात हसत होती.. ? राघवही आज जाम खुश होता…

?? बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..
बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..
चाल के ख़ुशबू से जुड़ा जुड़ा जुड़ा है कहीं दूर
हादसे ये कैसे अनसुने से जैसे चूमे अंधेरों को कोई नूर

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..

सिर्फ कह जाऊं या आसमान पे लिख दूं
तेरी तारीफों में चश्में बाद्दूर

बन के तितली दिल उड़ा उड़ा उड़ा है कहीं दूर..
चाल के ख़ुशबू से जुड़ा जुड़ा जुड़ा है दूर ??

क्रमशः

 

(कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा आणि Next पेक्षा कथा कशी वाटली हे सांगितलं तर लेखिकेला अजून प्रोत्साहन मिळेल ??)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत