तु खंबीर रहा…..

Written by

तु खंबीर रहा….

काल परत घरात जोरदार भांडण झाले…. भांडणाचा राग परत नव्या सूनेवर निघाला …. तिला तर कळतही नव्हते की सगळ्या गोष्टींचा शेवट तिच्यावरच येऊन का थांबतो…. सहाच महिने झाले होते लग्नाला…. शेवटी वैतागली ती…. सगळ संपवायच या हेतूने उठली आणि जीव द्यायला निघाली …. पण त्या आधी लोकांना कारण कळाव म्हणून कागद पेन घेऊन लिहू लागली….

प्रिय सासर…….

प्रिय यासाठी की, अजूनही हे सासर माझं आहे… मला यात रमायचय.. . आपला सुंदर संसार थाटायचा आहे… .जसा माझ्या आईबाबांनी केला… माझ्या माहेरी 15 जणांच एकत्र कुटुंब सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहतात … कधी कोणाच भांडण नाही तर कसले रुसवेफुगवे नाही…. सासरी मोजून चार माणसे तरी रोज भांडण??? रोज शिवीगाळ ?? आणि कारण काय??? तर मी ???
मी काय केलय???? लग्न करून सासरी आली… काही दिवसाने या घरची माहेरवाशीन तिच्या सासरी भांडण झाले म्हणून घर सोडून इथे आली…. दोष मला लागला. .. मी मनात म्हटलं टेंशन मध्ये माझ्यावर राग निघाला असेल…. मी लक्ष नाही दिले… ती परत गेली….. दोन महिन्यांनी परत आली ती कायमची….. नवरा देवाघरी गेला म्हणून…. पाच वर्षाचा संसार अर्धवट सोडून निघून गेला तो कायमचा….. ऐन तारुण्यात पोरीच्या नशिबी वैधव्य आल…. घरात सगळेच काळजीत पडले….
आपल्या मुलीच मन रमाव तिला तिच दुःख विसरायला मदत व्हावी म्हणून आईने तिला घरच्या कामात जूंपल…. मी नको म्हणत असतानाही घरची कामे तिच्यावर लादली…. तर मला मोलकरीण म्हणून राबवताय हा दोष तिने मला लावला.. यावेळेस आईंनी समजूत न घालता माजावरतीच उलटवल…. आईंचा तो स्वभावच होता… मी शांत रहिले…. मग सुरुवात झाली ती संसार कसा करायचा या विषयावरून.. .मग तु आॅफिसमधून उशीराच येते, तु मोजकीच कामे करतेस?? तुझा सगळा पगार घरीच द्यायला हवा…. ककशी भाजी निवडते…. असे एक ना अनेक विषय रोजच्या भांडणाचे….. तिला वैधव आले म्हणून मीही शृंगार करु नये??? का??? तर तिला वाइट वाटेल….
काल तर अतीच झाले… भाव भावजय स्वतःच्याच आयुष्यात मश्गुल आहात… माझ्यासाठी भावजयला नवरा शोधावा अस वाटत नाही…. माझ दुसर लग्न लावून द्याव असा कोणाला वाटत नाही…. मला मोलकरीण म्हणून राबवायची आहे हिला हे नवीन आरोप….

या घरात वयाने सर्वात लहान आहे मी आणि माझा नवरा…. त्याची तर फारच गोची होतेय…. तो तरी माझी बाजू किती मांडणार???
मी लहान असून जर तिच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला असता तरी मलाच बोल लागला असता…. अहो वंस!! मी तर नवीनच आहे या घरी …. अजून खूप काही शिकायच आहे मला…. जिथे तुमच्या आईवडिलांनी अजून तुमच्या दुसऱ्या लग्नाचा विषय नाही काढला तिथे मी बोलण, माझा आगाऊपणा ठरला असता…. बास झालं आता .. . थकलीये मी … वैताग आलाय ..

एवढ लिहून तिचा हात थांबला….. तिच्या आईची शिकवण आठवली….. पोरी आयुष्यात चढ उतार येतच असतात…. पण हरायच नाही… जिद्दीने लढायच आणि एक नवराची साथ असेल ना तर सगळ्या अडचणी आपोआप सुटतात….. तु खंबीर रहा बसस

तीने तो लिहीलेला कागद घेतला एक नजर आपल्या लग्नाच्या फोटोवर टाकली आणि पेपर फाडून टाकला…..

निघाली परत नव्या जोमाने ……

कथा आवडल्यास Like, share, comment नक्की करा…..

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा