तु टॉम माझा आणि मी तुझी जेरी❤

Written by

©® सुनीता मधुकर पाटील.

तु टॉम माझा आणि मी तुझी जेरी❤

पती पत्नीच नातं सगळ्या नात्यात गोड नातं असतं…ह्या नात्याला दुसऱ्या कोणत्याच नात्याची सर येत नाही…हे पती पत्नीचं नात एक अजबच रसायन आहे….❤
“आए हो मेरी जिंदगी मे तुम बहार बनके ” पासून सुरू झालेलं हे नात “आज ना छोडूंगी तुझे दम दमा दम , तुने क्या समझा है मुझे दम दमा दम ” पर्यंत कधी जाऊन पोहचत हे त्या दोघांनाही समजत नाही…काय ? बरोबर बोलले ना!!!😊
दोन अनोळखी , भिन्न विचारांचे जीव लग्नबांधनात बांधले जातात जन्मोजन्मीसाठी…आणि सुरुवात होते नवीन नात्याची…टॉम अँड जेरी सारख एकमेकांच्या खोड्या काढत ते दिवसेंदिवस अधिकच बहरत जातं…मुरलेल्या लोणच्यासारखं अधिकच लज्जतदार बनत जातं…
लग्न झाल्यानंतर नव्या नवलाईच्या दिवसात नवरोबाच्या हातून रोज डोक्यात माळला जाणारा मोगऱ्याचा गजरा हळूहळू काळाच्या ओघात किंवा जवाबदारीच्या ओझ्याखाली हरवत जातो…मग कधीतरी सणासुदीच्या दिवशी किंवा वाढदिवसाच्या दिवशी हळूच परत डोकावतो…आणि या नात्याला पुन्हा नव्यानं सुगंधित करून जातो…आणि जुन्या आठवणी जाग्या करून जातो…❤
टॉम अँड जेरी वरून आठवलं आमच्या शेजारची निलू तिने पिण्यासाठी पाणी उकळायला गॅस वरती ठेवलं होत…नीरज तिचा नवरा गुपचूप आला आणि त्या पाण्याच्या भांड्यात गुपचुप थोडे जिरे टाकून तिथुन पसार झाला…निलुने जेंव्हा हे पाहिलं तेंव्हा तिचा राग सातवे आसमान पर पहोंच गया…अरे यार !!!! इनका तो काम ही ऐसा है , इनसे बस उलटे पुलटे काम करवा लो । सीधे काम तो कभी कर ही नही सकते । मुझे सताना और मेरे काम बढाना यही आता है , बस !!!! निलुच्या तोंडाचा पट्टा चालूच होता…आणि नीरज तिच्याकडे बघुन हसत होता…❤
” आप हस क्या रहे हो ? कुछ काम तो करना नही है , बस परेशान करते रहते हो । “
” अरे मेरी जान जलजीरा सेहत के लिए बहोत अच्छा होता है , और इसी बहाणे आपणे हमसे बात तो कर ली , आपकी आवाज सुनने के लिए कान तरस गए थे । ” नीरज बोलला…
दोन दिवसांपूर्वी निलुचा वाढदिवस होता…आणि नेहमी प्रमाणे नीरज विसरला होता…म्हणून निलुने त्याच्याशी अबोला धरला होता…तो तिला मनवण्याचा हरसंभव प्रयत्न करत होता…पण ती ऐकायला तयार नव्हती…हा त्यातलाच एक प्रकार…काय करणार ना!!! ” तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचुन करमेना…”🤗
असेच कधी छोटे मोठे रुसवे , फुगवे , लुटूपटुची भांडणे , रुसणं – मनवण ह्या सगळ्यांनीच तर हे नातं अधिकच बहरत जातं…❤

जोडी तुझी माझी साऱ्या जगात असे न्यारी ,
तु टॉम माझा आणि मी तुझी जेरी …

आभाळभर माया उरी , मला जपतोस फुलापरी,

मग का खोड्या काढून माझी उडवतोस भांबेरी…

कधी सखा जिवाभावाचा तर कधी वाटे वैरी ,
लटक्या रुसव्या फुगव्याची गंमतच असे न्यारी…

कधी वाटे गावा तुझ्या कर्तृत्वाचा गोडवा ,
कधी वाटे एका रट्टयात करावा आडवा…

स्पदनात जपले तुला , तुझ्या मुळेच अर्थ माझ्या जीवना ,
धरता अबोला मला क्षणभर करमेना…

कोडं तुझ्या माझ्या नात्याचं विधात्यालाही सुटेना…
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…💕💕💕

©® सुनीता मधुकर पाटील

Article Categories:
विनोदी

Comments are closed.