तूच माझी भाग६

Written by

#तूच माझी

भाग ६

अंकुशला त्याच्या घराजवळ सोडून गौतमी घरी गेली ..गौतमीला गाडी चालवताना पण फक्त आणि फक्त अंकुसचाच विचार येत होता.. त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता ..त्याच्या विचारात ती इतकी मग्न होती की मागून कितीतरी वेळ हॉर्न देणाऱ्या ट्रक कडे पण तीच लक्ष नव्हतं ..आणि त्या ट्रकची धडक हिच्या गाडीला बसलीच ..रात्रीचे 12.30 झालेले होते या वेळेला हे ट्रक ड्राइवर असेच पिऊन कशीपण गाडी चालवत असतात ..पण नशिबाने साथ दिली होती ..धडक काही खूप जोरात बसली नव्हती ..पण गौतमी च डोकं स्टेअरिंग वर आपटलं होत आणि गाडीचा हॉर्न सतत चालू होता ..ती जरी बेशुद्ध होती तरी हॉर्न त्याच काम करत होता …,ट्रक ड्रायव्हर ने खाली उतरून पहायचीपण तसदी घेतली नव्हती …तो जास्तच भरधाव वेगाने निघून गेला होता …रस्त्याच्या कडेला एक छोटंसं घर होत …त्या गाडीच्या हॉर्न ने त्याला जाग आली ..तो गाडीजवळ आला ..दरवाजा उघडला ..गौतमीला उचलून घरी घेऊन गेला …
आता याला प्रेम नाहीतर काय म्हणावं? मोबाइलवर 10 मिस कॉल होते गौतमीच्या …जेव्हा संपत म्हणजे त्या बाजूच्या घरातल्या माणसाने ..गौतमीला घरी नेले त्याला काहीच कळत नव्हतं आता हिच्या घरच्यांना कस कळवाव?..कोण आहे ही ? इतक्यात त्याच लक्ष तिच्या पँटच्या खिशातून येणाऱ्या प्रकाशाकडे गेलं ..हम्म तो फोन होता गौतमीचा …सायलेंट मोड वर असल्याने आवाज येत नव्हता .. संपतं ने तो फोन खिशातून काढेपर्यंत फोन बंद झाला होता..त्याने त्याच नंबर ला कॉल केला …फोन होता अंकुशचा…
गौतमी अंकुशला सोडून गेली तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला होता..त्याला पुन्हा पुन्हा तिची आठवण येत होती..शिवाय इतक्या रात्री ती सुखरूप गेली असेल ना ? तिला आई नाही शिवाय वडील पण दुसऱ्या गावाला मीटिंग साठी गेलेत..या काळजीने त्याने 10 कॉल केले होते..संपतने कॉल केला आणि अंकुशने एक रिंग मधेच उचलला
अंकुश : समोरचा आवाज पण न ऐकताच : अग तू पोहोचलीस कस घरी ? मला किती काळजी लागली होती तुझी आता 1 वाजत आलाय आणि तू आत्ता कॉल करतीएस..मे किती कॉल केलेत तुला तू पाहिले नाहीस का?
इकडे संपत आपला साहेब ऐका ना ..ओ साहेब अहो ऐका तर ..अहो मॅडम चा ..अहो ..साहेब .. ऐका तर पण अंकुश काही ऐकेना त्याच आपल चालूच ..मग काय संपत ने फोनच कट केला ..आणि पुन्हा लावला आणि केल्या केल्या ..साहेब माझं ऐका
अंकुश : दचकून अरे तू कोण ? गौतमीचा फोन तुझ्याकडे कसा ? गौतमी कुठे आहे? तिला दे फोन…तू काय अपहरण केलंस काय तीच? तिला काही केलंस ना साल्या सोडणार नाही तुला ..
संपत : ओ भाऊ ..अहो ऐका तर ..आता अंकुश ऐकू लागला
संपत : अहो त्यांचा अपघात झालाय जास्त लागलं नाही ..बेशुद्ध आहेत त्या ..मी तिथेच बाजूला राहतो त्यांना गाडीतून काढून घरी आणलं आणि मोबाईलवर तुमचा कॉल आला म्हणून तुम्हाला कॉल केला …माझा ऍड्रेस घ्या आणि इथे येऊन तुमचं हे पार्सल घेऊन जा …च्यायला भालाईचा जमानाच नाही राहिलाय.
अंकुश : माफ करा हो मला ..तुम्ही राग नका मानू ..सांगा ऍड्रेस तुमचा येऊनच बोलू तिथे ..त्याने ऍड्रेस घेतला ..पाकिटात पाहिलं तर फक्त 500 ची एक नोट होती ..परिस्थिती नसताना पण आता रिक्षा शिवाय पर्याय नव्हता …त्याने रिक्षा केली ..रिक्षावाल्याला थांबायला सांगून संपतकडे गेला ..गेल्या गेल्या त्याने संपतला मिठीच मारली ..त्याच्या पाया पडला ..भाऊ तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही ..जेव्हा मोका मिळेल नक्कीच त्याची फेड करेन मी ..त्याचा नंबर घेतला आणि तिथून तो निघाला …त्याने गौतमीला उचलून रिक्षात ठेवलं आणि हॉस्पिटलमध्ये गेला ..
डॉक्टर : काही जास्त नाही लागलंय ..पण घाबरून बेशुद्ध झाल्यात त्या ..त्यांनी इंजेक्शन आणि औषधे लिहून दिली …हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्या कंपनीच्या बोर्ड ऑफ मेंबर मध्ये होते ..त्यामुळे नशिबाने फीस नाही द्यावी लागली …शिवाय त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या गाडीमध्ये दोघांना सोडायला आला ..नशीब अस मनाशीच बोलत अंकुश हसला ..आणि देवाला बोलला : तुलाच काळजी रे बाबा ..काय केलं असत मी …कस नेलं असत हिला घरी ..तूच बुद्धी दिलीस या हॉस्पिटलमध्ये आणायची ..
डॉक्टरांनी लगेचच गौतमीच्या वडिलांना पण फोन करून सांगितलं होतं ..एका गॅरेजला कॉल करून तिची गाडी पण रिपेअर साठी पाठवली होती ..बिचारा अंकुश स्वतःला खूपच लाचार समजत होता ..ना पैसे , ना ओळख काय केलं असत मी आज?
ही बातमी मिळताच आबासाहेब लगेचच तिथून निघाले ..पण आता रात्री हिच्याजवळ कोणीच नाही ..हिची काळजी कोण घेणार? नोकर चाकर होते पण ..नाही मी थांबतोच साहेब आले की जातो ..असा विचार करून अंकुश तिच्याच रम मध्ये एका सोफ्यावर बसून राहिला ..मधेच त्याला डुलकी लागून गेली …आणि गौतमीला शुद्ध आली ..तिचं डोकं आणि अंग खुओ दुखत होत. आणि तिला तो अपघात आठवला तिने दचकून बाजूला बघितलं ती तिच्या बेडवर आणि समोर सोफ्यावर अंकुश होता ..
गौतमीने उठायचा प्रयत्न केला पण तिला पटकन उठता येत नव्हतं ..हाताला आणि पाठीला मुक्का मार लागला होता ..डोकं तर भयंकर ठणकत होत ..आता तिला भूकपण लागली होती ..रात्री ती कॉफीपन तशीच राहिली होती ना..मग कसा बसा पलंगाचा आधार घेत ती उठली..अंकुशच्या बाजूला जाऊन बसली ..त्याच्या छातीवर स्वतःच डोकं ठेवलं ..आणि त्याला एकटक पाहू लागली ..
अंकुश दचकून जागा झाला ..दोन मिनिटं त्याला काही समजलच नाही ..आणि त्याला रात्रीचा प्रसंग आठवला …

© पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा