तूच माझी भाग १०

Written by

#AD_कथा

# तूच माझी
भाग १०
गौतमीला एका सुंदर रूम मध्ये राहायला दिल होत ..,तिथला नजरा जबरदस्त होता ..,बाहेर एकदम स्वच्छ निळं निळं पाणी दिसत होतं …त्या पाण्यात काठांवर असणाऱ्या झाडांचं हुबेहुब प्रतिबिंब दिसत होतं ..जितकं दूर पाहावं तिकडे झाडे …बदक..राजहंस दिसत होते ..इतरपन खूप छान छान कधीही न पाहिलेले पक्षी होते तिथे ..आजूबाजूला छोटे छोटे धबधबे होते ..त्याच्याखाली बदके मस्ती करत होते ..तिला आता प्रकर्षाने अंकुशची आठवण येत होती …वातावरणातील थंड हवा अंगावर शहारे आणत होती …आणि त्यात तिला अंकुशचा उबदार स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता ..ती स्वतःशीच बडबडत होती ..किती अरसिक आहे नवरा माझा …कर्तृत्ववान आहे ..हँडसम आहे ..,प्रेमळ पण खूप आहे ..पण माझ्या मनाच त्याला काहीच नसत ..काय करू आता किती वर्ष झालेत आम्ही एकत्रच आलेलो नाही आहोत …आज मला तो स्मार्ट लोबेन खूप आवडला ..म्हणजे मला असं वाटत आहे की अंकुश नंतर या फिलिग्ज मला फक्त याच्यासाठीच वाटल्या ..काय चूक आहे त्यात ? आता मी इकडे असते कोणास ठाऊक अंकुशपण इतर कोणासोबत…??
आणि मग एकदम शांत बसली ..त्या विचारात तिथे पडलेली व्हिस्कीची बाटली तिने उघडली ..मस्त ग्लासमध्ये ओतून प्यायला सुरुवात केली …त्या विचारात तिने किती पेग रिचवले ते तीच तिलाच माहिती ..पण आता बोटलमधते काही बाकी असेल असं वाटतं नव्हतं ..पुन्हा 5 मिनिटांनी ती विचार करू लागली ..खरच का ? अंकुशच असेल कोणी ? कोण बर असेल ? अअअअ ती त्याची सेक्रेटरी सिमी …? भलतीच मॉडर्न आहे ती ..,तीच राहणीमान ..तीच फाडफाड इंग्लिश ..ते शॉर्ट स्कर्ट ..त्या मोठ्या मोठ्या हिल्स ..धडपडली तर सगळ्या हाडाचा चुरा व्हायचा तिचा ..आणि जोरात हसू लागली ..ती हसत असतानाच तिथे लोबेन आला ..
लोबेन : hi मिस गौतमी ..is ऑल वेल? Do you like my resort?
गौतमी त्याच्या आशा अचानक येण्याने जरा बावचळली ..ओहहहह हाय मिस्टर लोबेन …yesss sollid रिसॉर्ट …अँड हॅन्डसम you.. आणि स्वतःची जीभ चावत तिने स्वतःलाच शिव्या घातल्या : बावळट काही समजत का तुला काहीपण बोलतीयेस ..
मग लोबेनला : I am shoooo sorry ..means ..I don’t mean to that ..
लोबेन : ohh it’s ok .. you mean to say ..it’s not like that.. that means I’m not handsome ..is it so?
आता झाली का पंचायत काय बोलायचं याला ? काय हे गौतमी तुला ना चांगलं छडीने चोपून काढलं पाहिजे ..एकतर पूर्ण बाटली खाली केली आहेस ..काय बोलेल तो ? ठेवली होती १५ दिवसांसाठी आणि बाईनी आजच खाली केली बाटली ..
गौतमी : actully i drink sooo much ..hope you can understand ..
लोबेन : Yes ..I do understand.. i came to invite you for a dinner.. and after this much drink ofcourse you are feeling hungry..
गौतमीला जाणवलं खरच की आता मला खूप भूक लागली आहे ..,:ohh yes actually I am hungry now ..let’s go for dinner ..
ती चालता चालता तिचा सारखा तोल जात होता ..तिची नुकतीच चाळीशी सुरू झाली होती ..खूप सुंदर दिसत होती ती ..त्यात अस म्हणतत् चाळीशीतली स्त्री जरा जास्तच सुंदर दिसते ..,तसच काहीस हीच होत ..तिचे कुरळे मोकळे केस हवेत उडत होते …ओठांवर गुलाबी शेडची लिपस्टिक तिच्या सौंदर्यात आजूनच भर घालत होती ..तिने सॅटीनचा काळ्या रंगाचा नाईट ड्रेस घेतला होता ..गोरी गोरी गौतमी आणि त्यात काळा रंग …दारूमुळे नाशिले झालेले तिचे डोळे ..ती खूपच आकर्षक दिसत होती ..अहो अशी सुंदर अप्सरा समोर असेल यर कोणाची नियत खराब नाही होणार ?? जे नको तेच झालं ..लोबेनला पण ती खूप आवडली होती..

गौतमीला पडताना सांभाळता सांभाळता लोबेनचा स्पर्श तिला कुठेही होऊ लागला ..त्याने ती आजूनच जास्त बेभान होत होती ..दोघे जेवायला बसले ..कसबस खाऊन ती परत निघाली ..दोघांचं जेवण झालंच होत ..आणि उठताना तीचा तोल गेला ..लोबेनने तिला उचलून घेतलं आणि तिच्या रूम मध्ये घेऊन आला ..तिला उचलल तेव्हा तिने तिचे दोन्ही हात त्याच्या मानेभोवती घातले होते ..आता खरतर लोबेनला पण रहावत नव्हतं पण त्याने तिला बेडवर ठेवलं आणि तो निघाला ..,इतक्यात गौतमीने त्याचा हात पकडला ..प्लिज नको जाऊस मला असं सोडून प्लिज..लोबेनला काहीच समजत नव्हतं ती काय बडबड करतीये ..मग त्याने गुगल ट्रान्सलेटर रेकॉर्डिंग चालू केल ..आणि त्याला समजलं की तिला तो हवा आहे ..
मग काय जे नको ते सगळं झालंच दोघांमध्ये..लोबेन रात्री तिच्याच रूममध्ये होता ..सकाळी गौतमीला जाग आली ..तिचं डोकं खूप जड झालं होतं ..उठावस वाटत नव्हतं तिला ..,ती पुन्हा झोपली आणि झोपता झोपता तिला जाणवलं आपल्या बेडवर इतर पण कोणीतरी आहे ..तिने पाहिलं तर लोबेन इथे काय करतोय ..आणि ते पण naked ..मग तिने स्वतःकडे पाहिलं omg हे काय ? म्हणजे रात्री मी आणि लोबेन ?? नाही नाही हे शक्य नाही ..इतक्यात लोबेनला जाग आली ..Hi sweetheart!! you are so pretty and lovely.. I like you so much ..अस बोलत त्यानें तिला जवळ ओढलं ..आणि तिच्या दुसऱ्या मनाने तिला जे होतय ते होऊदेत ..असा इशारा केला ..रात्री नशेत काय झालं ते तिला काहीच आठवत नव्हतं आणि आता तिला तो अनुभव हवा हवासा वाटू लागला ..तिने त्याला आजिबात अडवलं नाही ..आणि रात्री जी चूक नशेत झाली होती ती पुन्हा शुद्धीत असताना झाली होती ..
दोघे जवळ जवळ असेच 2-3 तास एकत्र होते ..त्यांनतर एकत्रच अंघोळ करून दोघे बाहेर गेले ..दिवसभरपण कामामुळे ते एकत्रच होते ..मध्येच एकमेकांना जवळ घेत होते ..मिठी मारत होते ..किस करत होते ..गौतमीला हेच सगळं अंकुशकडून हवं होतं ..पण ते तिला मिळालंच नव्हतं ..आज 15 दिवस होत आले होते ..सगळं काम संपत आला होत..गौतमी आणि लोबेन एकमेकांच्या प्रेमात पडले होते ..आजून दोन दिवसांत तिला तिथून निघून पुन्हा आपल्या रोजच्या आयुष्यात यावं लागणार होतं ..पण तिचं मन तिला त्याची परवानगी देत नव्हतं ..
आता उत्तम 18 वर्षाचा झाला होता उच्च शिक्षणासाठी तो लंडनला होता …त्याच रोजअंकुश आणि गौतमीशी बोलणं होत असे ..पण इथे आल्यापासून गौतमीने एकदापण उत्तमला किंवा अंकुशला फोन केलेला नव्हता ..तिला लोबेनपुढे काहीच नकोस वाटत होतं ..
आज रात्री ती निघणार होती ..आणि लोबेन ने तिला घट्ट मिठी मारली ..please डोन्ट go …please I need you baby .., I can’t live without you … be mine wife ..will you marry me?
आणि गौतमी तिथेच थबकली ..एखाद्या तरुणाईचं प्रेम असावं असच वाटत होतं सगळं ..तिने तिथेच थांबायचा निर्णय घेतला ..लोबेनला तर सगळं जगच ठेंगण वाटायला लागलं ..दुसऱ्या दिवशीच त्यांनी चर्च मध्ये जाऊन लग्न केलं..तिचा डिओर्स नव्हता झाला पण वेगवेगळ्या देशात असल्याने तीच भारतातील लग्न इथे मान्य नव्हत..दोघेजण एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते ..गौतमीला तिचा मुलगा , नवरा , सगळ्याचा विसर पडला होता ..आता जवळ जवळ एक महिना होत आला होता अंकूशला तिची काळजी वाटू लागली ..त्याने काळजीपोटी गौतमीला फोन केला ..तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं तिने तो फोन तसाच वाजू दिला …अंकुशने दिवसभरात जवळपास 100 वेळा तिला फोन केला आणि गौतमीने एकही फोन उचलला नाही ..आता मात्र अंकुशला तिची खुप काळजी वाटू लागली त्याने सिमीला फोन केला आणि लगेचच स्वतःच तिकीट बुक करायला सांगितल..रात्रीच्या फ्लाईट ने तो सकाळी सकाळी तिथे पोहोचला ..बेटावरील त्या रिसॉर्टमध्ये गेल्यावर त्याला समजलं की गौतमी इथेच आहे आणि सुखरूप आहे
त्याच समोर लक्ष गेलं तर हातात हात घालून गौतमी आणि लोबेन समोरून येत होते ..गौतमीने अंकुशला पाहिलं ..तिला एकदम मेल्याहून मेल्यासारखं झालं ..आता याला मी काय सांगू ?
अंकुश : काय ग गौतमी कशी आहेस तू? आणि हे कसले ग कपडे घातलेस ? माझे फोन का उचलले नाहीस ? मी किती घाबरलो होतो ..
लोबेन : गौतमी who is this gentlemen?
गौतमी : this is my husband ..I told you before ..
लोबेनने त्याला shakehand केला ..hey hi !nice to meeting you ..what would you like to have? tea ? coffee? take anything आणि त्याने वेटरला त्याच्यासाठी नाश्ता आणि चहा मागवला ..अंकुशने तो घेतला ..
अंकुश : thank you for your delicious breakfast.. now I want to talk to gautmi my lovely wife
लोबेन: you can talk to her … but not as your wife …sorry to say but now गौतमी is my wife ..my love..
अंकुशला हा खूप मोठा धक्का होता ..तो छातीला धरून खाली कोसळला.. अटॅक आला होता त्याला ..लोबेनने अंबुलन्स बोलावली ..अंकुशला हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं पूर्ण दिवस तो शुद्धीवर आला नाही ..लोबेन आणि गौतमी तिथेच थांबले होते ..दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुशला जाग आली ..त्याने समोर सोफ्यावर लोबेनच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपलेली गौतमी पहिली ..किती सुंदर आणि खुश दिसत होती ती ..अंकुश काहीही न बोलता तिथून निघून इंडीया मध्ये आला..
त्याने सगळ्यांना सांगितले गौतमीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे …मी तिचे अंत्यसंस्कार करून आलो आहे ..आणि तिची तिकडची संपत्ती पण एका अनाथ आश्रमाला दान करून आलो आहे ..त्याने हाच निरोप उत्तमला पण दिला ..
संध्याकाळी त्याने गौतमीला फोन केला : माफ कर मला ..तुझ्या मनातल्या भावनांची मी कधी कदरच नाही केली ..खूप खुश आणि सुखी आहेस तू तिथे तशीच रहा ..मी इथे सर्वांना सांगितले आहे की तू आता परत कधीच येणार नाहीस ..देवाघरी गेलीस तू अस..माझ्या आयुष्यातील तुझी जागा इतर कोणीही घेऊ शकणार नाही ..पण तू आता सुखी रहा ..परत कधीच तुला मी फोन करणार नाही ..आज हा माझा शेवटचा फोन होता तुला ..चल ग बाय ..आणि त्याने फोन खाली ठेवला..खूप रडला तो खूप रडला ..पण ते शेवटचच..
का त्याने कोणाला खर सांगितलं नाही …कारण लोकांनी तिच्यावर शिंतोडे उडवले असते ..कोणीच तिला समजून नसत घेतलं ..त्यापेक्षा असा तिच्यासाठीचा आदर असाच राहील ..उत्तम पण आला होता घरी ..त्याला जवळ घेऊन दोघेपण खूप रडले ..त्यानंतर अंकुशने उत्तमला त्याच्या आईची उणीव कधीच भासू दिली नाही

©पूनम पिंगळे
क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा