तूच माझी भाग ५

Written by

#तूच माझी
भाग ५
गौतमीला अस वाटलंच नव्हतं की तो असा अचानक तिच्या समोर येऊन उभा राहील..गौतमीला आस घाबरलेली आणि घामात भिजलेली पाहून अंकुशला वाटलं तिला बर वाटत नाहीये
अंकुश : काय झालं मॅडम ?तुमची तब्येत ठीक नाही का ? हे बोलत बोलत तो तिच्या टेबल जवळ जाऊ लागला
गौतमी: एकदम घाबरून, एक हाताने तिथेच थांब असा इशारा करत , नाही काही नाही ..म..मी ..ठीक आहे ..तुमचं झालं असेल तर जा तुम्ही..
अंकुश : नाही मला आजून वेळ लागेल मी तेच तुम्हाला सांगायला आलो होतो ..तुम्ही जावा मी लॉक आणि ते सिल करून जाईन.. खुप उशीर झाला आहे आता ९वाजून गेलेत..
गौतमी : नाही ..मला वेळ लागले ..तुम्ही न सांगता गेलात तरी चालेल..मी माझं काम झाल्यावर जाईन
अंकुशला काही कळतच नव्हतं ..तो मनात विचार करून हसत होत ..आयला काय पोरगी आहे ही..AC मध्ये बसून हिला घामाच्या धारा लागल्यात..आमच्या सारख्यांच्या घरी आली कधी तर काय करेल कोण जाणे? आणि ही आज इतकी घाबरून काय बोलते.. मला पाहून घाबरली?? अरे तिला मी काय असा तसा वाटलो की काय? म्हणून तर मला परत येऊ नका इथे अस बोलली.. छे हिला मी असा वाटतो ?..आहे दिसायला सुंदर ही ..खरतर मला खूप आवडते ..पण ती कुठे ..मी कुठे ..अस उंदीर कधी आकाशात उडायच स्वप्न पाहू शकतो का? मी आपला जमिनीवर जाऊन रोजच्या गरजा भागविण्यासाठी धावपळ करणारा ..आणि ही आकाशात मस्त होऊन उडणारी परी ..एक राजकन्या.. साहेबांचा तर खूपच जीव आहे हिच्यावर..आणि तिला मी कसला आवडतोय..चला अंकुश साहेब ..जो नही तेरे नसिब में ,उसके पिछे मत भाग । वो एक तारा हें असमानका ..उसके ख्वाब मत देख .. आणि स्वतःवरच खुश होत ..वाह वाह शायर अंकुश ..काय जमलीये शायरी ..चला आता लागा आपल्या कामाला ..पण मला वाटतय इतक्या रात्री ही बया इथे थांबली आहे .. तिच्या सेफ्टी च काही आहे की नाही हिला ? ते काही नाही ती गेल्यावरच मी जाईन घरी ..असपन मला काय करायचं असत घरी जाऊन ?आणि तो आपल्या कामाला लागला
इकडे गौतमी स्वतःलाच शिव्या घालत होती : काय बावळटपणा केलाय मी? काय वाटलं असेल त्याला? उगाच रुबाब दाखवल्यासारखं वाटलं असणार त्याला ..इतके दिवस या मोक्याची मी वाट पहात होते..तो माझ्याशी बोलावा म्हणून धडपड करत होते ..आणि आज तो समोर आला तर मी त्याचा खरतर अपमान केला ..ओहहह गॉड !!! प्लिज प्लिज हेल्प मी …मी आता काय करू ? मला काहीच समजत नाहीये…ती थोडावेळ असाच विचार करत कॉम्पुटरकडे बघत बसली होती …आणि तिच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली ..ती धावतच ऑफिसच्या किचनकडे गेली ..कॉफी फिल्टर मशीन बँद केलेली होती ती तिने चालू केली … दोन मग घेतले आणि त्यामध्ये मस्त वाफळणारी स्ट्रॉंग कॉफी बनवली ..एका डिश मध्ये तिचे फेवरेट गुड डे ..आणि डार्क फॅन्टसी बिस्कीट घेतले ..आणि मॅडम जरा लाजत ..घाबरतच अंकुशच्या मागे अवतरल्या…
अंकूश त्याच्या कामात मग्न होता …आणि या बाईने एकदम मागून आवाज दिला अंकुश..त्याच्या हातातला माऊसच सटकला आणि खुर्चीवरून तो पडता पडता वाचला ..गौतमी जोरजोरात हसायला लागली.., ” अरे घाबरलास की काय ?”
अंकुश : कावराबावरा होत ..तस नाही हो मॅडम ..म्हणजे अस काही अपेक्षित नव्हतं ना तुम्ही येऊन आवाज द्याल वैगरे ..आणि ते पण अस हातात कॉफी वैगरे घेऊन..मी जरा कामात गुंतलो होतो ..आणि तुम्ही अचानक मागून आवाज दिला ..मला वाटलं..मला वाटलं की ..आणि तो गप्प बसला
गौतम: तुला वाटलं कोणी हडळ आली की काय ..होना आणि ती जोर जोरात हसू लागली ..
अंकुशपण हसायला लागला
गौतमी : बर आता कॉफी घेऊया ? नाहीतर ती गार होऊन जाईल.. आणि मग तिला प्यायची मजा पण निघून जाईल.. कस आहे ना ..काही गोष्टी वेळेवरच करायला हव्या ..नाहीतर त्यातला आनंद निघून जातो ..
अंकुश : असा एकदम गोंधळून तिच्याकडे बघत होता …मनातल्या मनात ,”अरे देवा ! कॉफ़ी साठी पण योग्य वेळ असते . मला तर नव्हतं माहीत ..आणि ही कॉफीचा इतका विचार करते ? आजच समजलं मला तर “, आता गौतमीला : अहो मॅडम तुम्ही कशाला उगाच त्रास घेतलात मी घेतली असती कॉफी ..नंतर..
गौतमी : आता आणली आहे घे मुकाट्याने . मी घरी कधी कोणाला पाणी पण देत नाही ..आणि तुला तर कॉफी आणि बिस्कीट देतीये ..उगाच भाव नको खाऊस ..कॉफी आणि बिस्कीट खा . ती एकदम गुलाबी गुलाबी झाली होती ..लाजत होती . हसत होती ..अंकुशची तर विकेटच उडाली होती
अंकुश : मनातच . या बाईचा विचार तरी काय आहे . लगता है आज इसकी नियत ठीक नाही ..अंकुश ..भागो भागो ..बचाव ..गौतमीला : म्हणजे . मग मला का आणली तुम्ही कॉफी आणि बिस्कीट?
गौतमी : तू खरच इतका मूर्ख आहेस? की नाटकं करतोएस? तुला माझ्या बोलण्यातला अर्थ ..माझी नजर ..काहीच समजत नाहीये का?
अंकुश : मनातच . अहो मका तर आता खतऱ्याची घंटी ऐकू येतीये ..काय भरोसा तुमच्या सारख्या श्रीमंत मुलींचा …आमच्या सारख्या गरीब मुलांचा फायदा घेणार वाटत तुम्ही ..गौतमीकडे पाहत : घाबरतच.. मॅडम मी कॉफी नाही घेत ..म ..मी..जातो आता..
गौतमी : ए बावळट ..घाबरतोस काय? ऐक आपण दोघे एकाच वर्गात होतो हे तरी आठवत का तुला ?
अंकुश : हो ..
गौतमी : तू मला तेव्हापासून खूप आवडतोस
अंकुश : एकदम धक्का बसून जोरात , काय? (मेलो आता ही काय सोडत नाही मला )
गौतमी : हो ..मी नेहमी तुला बघायचे ..तुझ्याशी बोलण्यासाठी धडपडायचे.. याला काय म्हणतात ?
अंकुश : मनातच “लस्ट म्हणतात ग बाई याला आजून काय?”
गौतमी : याला प्रेम म्हणतात. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर.. मला तू खूप खूप आवडतोस
अंकुश: ,मनात- आग बाई मी खेळणं नाहीये ..आवडलं खेळणं की खेळा.. मन भरलं की सोडा ..
गौतमी : अरे बोल ना काहितरी …मी मुलगी असून बोलतीये आणि तू ..??
अंकुश : तुम्ही सांगा काय बोलू? मी बोलतो..
गौतमी : व्हॉट???तू काय बोलतोय ? तुला समजतंय का मी काय बोलतीये ..आणि ते मॅडम ,तुम्ही , पहीलं बंद . आपण दोघे असताना गौतमी बोलायचस.. अरे हो ..आत्ता समजलं मला तू आवडतोस ..पण मी तुला आवडत नाही वाटत ?म्हणून तू असा करत आहेस ..सॉरी.. पण एक सांगते माझ्या मनात फक्त तू आणि तूच आहेस …आणि ती जागा आता इतर कोणालाही मिळू शकणार नाही . तिचे डोळे पाण्याने भरले होते ..ती पळत आणि रडतच तिच्या केबिनमध्ये निघून गेली..
अंकुश : त्याने स्वतःला चिमटा काढला ..आयला हे काही स्वप्न तर नाही ना ? मी हिला काय समजत होतो ? आरे यार ही तर मनापासून प्रेम करते माझ्यावर.. मी असा फाटका माणूस काय सुख देणार हिला ? पण ती दुखवलीये माझ्यामुळे.. तो पण तिच्या मागोमाग केबिनमध्ये गेला ..त्याने तिला आवाज दिला ..आणि तिने रडतच येऊन अंकुशला मिठी मारली ..प्लिज अंकुश मी तुझ्याशिवाय नाहिरे जगू शकत..ती खूप रडत होती …अंकुशला काहीच सुचत नव्हतं ..पण आता त्याने पण तिला मिठीत घेतलं ..तिचे डोळे पुसले ..
अंकुश : ए वेडे . अशी रडतेस काय ? अग मला पण तू खूप आवडतेस ..पण मी असा फाटका माणूस ग . माझा ना कोणी आगा ना पिछा.. खूप गरिबीतून शिक्षण केलंय ग मी ..दोन महिन्यापूर्वी वडील सोडून गेले मला ..देवाचं बोलवण आलं त्यांना . गेल्याच आठवड्यात आईपण गेली ..मी एक दिवस नव्हतो बघ ऑफिसला ते या साठीच.. बाबा गेल्या गेल्या ही नोकरी मिळाली..बर झालं ..मला माझ अंथरून माहीत आहे ग . मी तेवढेच पाय पसरतो.. कस बोलणार तुला ? तू मला आवडतेस? शिवाय तुझ्या घरचे न तयार होणार नाहीत . तू अशी लाडात , सुखात वाढलेली ..मी काय सुख देणार तुला ? हे सगळं पिक्चर मध्ये सोपं असत ग ..पण खरं आयुष्य मी स्वतः जगलोय . आणि ते तस कधी होत नसत
गौतमी ने आता अजूनच जास्त घटट मिठी मारली अंकुशला …:अरे मला तू असाच आवडतोस ..तू सगळ्यांसारखा नाहीस ..आणि माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहेस …आणि तिने अचानकच त्याच्या गालावर ..आणि ओठांवर तिचे ओठ टेकवले …दोघे बराचवेळ तसेच होते ..
अंकुश : एकदम भानावर येत . गौतमी हे योग्य नाही ..चल निघुया आपण आता ..गौतमीला पण आता लाज वाटू लागली ..
गौतमी : हो चल निघुया आपण ..
दोघे सर्व बंद करून निघाले ..गौतमी सतत त्यालाच बघत होती ..
खाली आल्यावर गौतमी : चल मी सोडते तुला बस माझ्या गाडीत
अंकुश : नको तू जा ..मी जातो बसने
गौतमी : अंकुश .तुला शपथ आहे माझी ये बस लवकर
अंकुश गाडीत बसला ..पुन्हा एकदा गौतमाने त्याला मिठी मारून एक हलकासा किस केला ..अंकुश तू मला कधीही अंतर देऊ नकोस.. नाहीतर मरून जाईन मी..
अंकुशची अवस्था खूपच वाईट होती ..त्याला ती हवी पण होती ..पण मन ..ऐकत नव्हतं..

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा