तूच माझी भाग ७

Written by

#तूच माझी
भाग ७

अंकुशच गौतमीकडे लक्ष गेलं..जी त्याच्याकडे एकटक बघत होती ..इतकं लागलेलं असूनपण तिच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलच प्रेम दिसत होतं…दुःखाचा लवलेशही नव्हता
अंकुश स्वतःला सावरत …एकदम दचकून : अग ! तू अशी का उठलीस ? सरळ बस ग ..भरपूर लागलंय तुला ..किती मुक्का मार आहे ..वेडी आहेस का तू ? ..उठ बर आधी ..आणि त्याने आधार देत तिला पुन्हा बेडवर नेऊन झोपवलं …
गौतमी : डोक्याला हात मारत : देवा कसला हा माझा प्रियकर ? मला लागलंय ..दुखतंय …समजतंय याला ..पण रात्रीपासून काही खाल्लं नाहीये आणि त्यावर डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेत ..आता माझ्या पोटात कशी भूक उचंबळून आली असेल …आणि हो त्याने तरी कुठे काही खाल्लय..मी निदान जखमा आणि इंजेक्शन ..औषध तरी खाल्लेत..आणि ती तिरक्या नजरेने अंकुशची प्रतिक्रिया पाहू लागली …
अंकुश : एकदम टेन्शन मध्ये : अग खरच ग हे माझ्या लक्षातच नाही आलं..त्याने स्वतःचे दोन्ही कान पकडले ..आणि स्वतःच्या गुढग्यांवर खाली मान घालून बसला ..बोला मॅडम काय खाणार तुम्ही ?
गौतमी : हसतच : बोला काय देणार तुम्ही? या भुकेल्या जीवाला तुम्ही जे द्याल ते आनंदाने खाऊ ..
अंकुशला आता प्रश्न पडला यावेळी आता हिला काय खायला द्यावं ..बर खिशात जास्त पैसे पण नाहीत आता..??
त्याच्या चेहऱ्यावरची चिंता गौतमीच्या लक्षात आली : अरे काय विचार करतोयएस? जा त्या उमाला उठव ..ती बनवेल काहीतरी खायला .
अंकुश : एकदम विचारात ..आता हिची उमा कोण? असते कुठे ही माँ ?
गौतमी : ए.. तुझा चेहरा तू काहीही न बोलता मला सगळं सांगतोय ..हे बघ या खोलीतून बाहेर गेलास की डाव्याबाजूला सरळ जा ..तिथेच उमा आणि बिरजू राहतात …आवाज दे तिला ..
अंकुश : अग पण आत्ता रात्रीचे 3 वाजलेत ..इतक्या रात्री मी उठवू त्यांना ?
गौतमी : अरे ..कसा रे तू? मी आजारी आहे ना तर ते जागेच असणार बघ …,खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर ..उमा आणि मी एकाच वयाच्या ..एकत्रच मोठ्या झालो …तिची आई होती आमच्याकडे कामाला ..त्यांनीच मला आईची माया दिली बघ, २वर्षापूर्वी गेल्या त्या देवाघरी ..तो देव आहे ना ..तो पृथ्वीवर चांगल्या लोकांना जास्त राहूच देत नाही बघ..माझ्या आईला पण असच घेऊन गेला तो ..आणि आजून एक मज्जा सांगू का तुला ? …देवाचं आणि माझं जास्त जमत नाही बघ ..त्याच काय आहे ना ..मला काही आवडल की तो लगेचच हिरावून घेतो माझ्यापासून.. तू नाही ना जाणार मला सोडून ..मग दोन मिनिटं ती शांत झाली …
अंकुश तिच्या जवळ गेला ..तिचा हात हातात घेऊन : तूच जाशील मला कंटाळून मला सोडून ..खूप वेडा आणि वेगळा आहे मी ..आपलं कस होणार तो देवच जाणे ..मी तर हा हात सोडणार नाही ..हो पण तुझंच काही सांगता येत नाही बघ
गौतमी : हसत: बर बाबा नंतर नको सोडुस हात माझा पण आत्ता सोड …आणि ना ..जा तू फक्त उमा असा आवाज दे ..धावत येईल बघ बाहेर ती ..
अंकुश : हो ..हा गेलो आणि आलोच बघ..तो बाहेर गेला ..दरवाजा उघडाच होता ..खरच ते नवरा बायको जागे होते..तो त्यांना आवाज देणार इतक्यात त्याच्या कानावर हे शब्द पडले
उमा : बाई ग हा कोण माणूस म्हणायचा हो ..ताईसोबत आला तो ..भला माणूस दिसतोय ..पण ताई बेशुद्ध आहेत आणि हा त्यांच्या खोलीत काही कमीजास्त नाही ना हो करायचा
बिरजू : नाही ग अस काही होणार नाही ..मी मागाशीपासून 3-4 वेळा जाऊन आलो ..ताई बेडवर आणि हे बिचारं सोफ्यावर बसल्या बसल्या झोपलय बघ ..आणि काही करायचं असत वेड वाकड तर त्यांनी ताईंना इथं आणलंच नसत ना..
उमा : हो ते पण खरं ..पण ताईंनी रात्री काय खाल्ल्याय की नाही काय माहीत ? शुद्धीवर आल्याना की मग पाहिला गरम गरम बदामाचा शिराच खायला घालते त्यांना …खूप आवडतो त्यांना ..
अंकुशने दरवाजा नॉक केला आणि आत गेला : वाह ! गौतमी बरोबर बोलली तुमच्याबद्दल ..चला वेळ झालीये तो शिरा करायची ..
उमा : एकदम धडपडत स्वतःला सावरत उठली : आग बाई तुम्ही ? अशे अचानक ? ताई आल्या काय शुद्धीवर ?
अंकुश : हो आणि तुमच्या ताईला भूक पण लागलीये कडकडून ..
उमा : अग बाई खर की काय ?? मला वाटलंच होत ..आलेच मी शिरा आणि गरम गरम बटाटा भजी घेऊन ..आमच्या ताईला खूप आवडतात ..आणि त्याच्या सोबत गरम गरम कॉफी..ती उठून लगबगीने किचनमध्ये निघून गेली ..आणि अंकुश गौतमीच्या रूम मध्ये आला .
अंकुश : कमालच आहे ग गौतमी ..आग ते दोघे खरच जागे होते आजून . आणि तुला भूक लागली असेल हे पण त्यांना समजलं ..ग्रेट ग ..
गौतमी : मग आमची उमा आहेच अशी ..
अंकुश : हम्म ..तुझी काळजी वाटत होती खूप म्हणून थांबलो होतो ..तुझी काळजी माझ्यापेक्षा जास्त चांगली घेणारी तुझी माणस आहेत इथे ..आता मला काळजी नाही ..चल मी निघतो ..
गौतमी : नाही तू नाही जायच ..तू पण काही खाल्लेलं नाहीयेस ..थांब खा आधी आणि मग जा ..आणि इतक्या रात्री तुला घरी जायला बस नाही मिळणार ..आणि विसरू नकोस तुला इथून चालत जायला जमणार नाहीये …बस ना असा माझ्याजवळ ..का जातोस मला सोडून ..
अंकुश : माझ्या मुळेच झाला ना तुझा अपघात ? ..नक्कीच माझा विचार करत असणार तू ..अग गौतमी ..आपल्यामध्ये खूप तफावत आहे..कस जमणार हे सगळं ? मला वाटतय मी तुझ्यासाठी योग्य नाही.. बघ ना आजच आपण जवळ आलो आणि तुझा अपघात झाला ..हा कदाचित ईश्वरी संकेत असावा ..
गौतमी : हो आज प्रथमच त्याने मला छान संकेत दिलाय..
अंकुश : आता काय छान झालंय बाई..!!
गौतमी : अरे त्या अपघाता मुळेच तर तू आणि मी माझ्या घरी ..असे एकत्र आहोत ..आपल्याला एकमेकांची कितीवेळ सोबत मिळाली आहे ..असा तू आला तरी असतास का माझ्या इतक्या जवळ..तिने उठून स्वतःचे हात अंकुशच्या गळ्यात घातले …बघ हा असा ..आणि इतक्या जवळ हवा आहेस तू मला माझ्या.. तिने त्याला घटट मिठी मारली ..आता अंकुशने पण तिला मिठीत घेतले ..किती वेळ झाला कोणास ठाऊक ..आणि दरवाजावर टक टक आवाज आला त्याने दोघे भानावर आले …
दरवाजावर उमा उभी होती …आणि दातात स्वतःचा पदर घेत उगाचच लाजत होती ..
गौतमी : आग ये ना उमा ..,काय बनवलस तू? तिचं ट्रे कडे लक्ष गेलं तर त्यात एकच प्लेट होती ..,अग हे काय एकच प्लेट आणलीस ?? जा आजून एक घेऊन ये ..,हे साहेब पण जेवलेले नाहीयेत ..
उमा : हो .. आणते लगेच ..अस म्हणत तो ट्रे तिथे एका टेबलावर ठेऊन लाजतच पळत गेली ..आणि 5 मिनिटात दुसरी प्लेट घेऊन आली ..आता अंकुश गौतमीला आणि गौतमी अंकुशला भरवत होते ..
उमा : आता ग बाई ..हे काय ओ ताई ..उगाच मला दुसरी प्लेट आणायला लावली ..आणि गौतमी चक्क लाजली
गौतमी : गप ग ..दे ती डिश इथे आणि जा बर तू ..कॉफी घेऊन ये आम्हाला दोघांना ..
उमा : हो आणते ..तुमचं चालुदेत दमान ..
गौतमी : उमा sss जातेस का आता ? …
उमा पुन्हा पळून गेली ..आता दोघांनी पुन्हा एकमेकांना भरवायला सुरवात केली ..आणि परत दरवाजावर टकटक झाली …
गौतमी : हो ये ग उमा किती वेळा दरवाजा वाजवणारे तू?
आणि दरवाजातून आबासाहेब घसा खाकरत आत आले …आता दोघांची भीतीने घाबरगुंडी उडाली होती ..

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा