तूच माझी भाग ९

Written by

#तूच माझी

#भाग 9

अचानक सकाळी सकाळी बाळासाहेबांना दरवाज्यात बघून अंकुश थबकला .
त्याला असं वाटलं नव्हतं की असे अचानक पणे आबासाहेब आपल्या घरी येतील त्याने घाई घाई मध्ये घरातली तुटकी खुर्ची पुढे गेली आणि त्यांना बसायला बोलला …आबासाहेब खूपच रागात होते ते तावातावाने त्याच्या घराकडे बघत होते.. त्याच्या घराची हालत खूपच खराब होती ..खिडकीचे गज तूटलेले होते ..काचा फुटक्या होत्या.त्याचा पलंग तुटलेला होता ..त्याला खाली एका डब्याचा आधार दिलेला होता ..त्यावर एक फाटलेली चादर होती ..हो फाटकी पण स्वच्छ चादर होती त्याच्यावरती उशा पण तशाच होत्या फाटके कव्हर घातलेल्या पण स्वच्छ.. आबासाहेब त्यांच्या मुलीला मनातल्या मनात शिव्या घालत होते की माझ्या मुलीला हेच ध्यान आवडलं आता काय करावं …कांही वेळेस परिस्थिती पुढे काही चालत नाही ना.. आबासाहेब तर खूप काही बोलणार होते त्याला पण त्यांना असं वाटलं की मुलगा गरीब असला तरी चांगला आहे ..कर्तृत्ववान आहे ..इतक्यात अंकुश गरम गरम चहा घेऊन आला… आबासाहेबाना त्याचा कॉन्फिडन्स खूप आवडला , मी याच्या घरात चहा घेईन अस कस वाटलं याला ?..हो पण पोरामध्ये पाहुणचार आहे …त्यांनी त्याच्या हातातला कप थोडा राग आणि थोडा हसत संमिश्र एक्सप्रेशन मध्ये घेतला.
अंकुशला तर काहीच समजत नव्हतं ..तसं पाहायला गेलं तर त्याला साहेबांच्या बोलल्यामुळे खूपच राग आला होता त्यांनी ठरवलं होतं आता आपण तिकडे जायचं नाही ..तिच्याकडे पाहायचं पण नाही..झाला तो अपमान खूप झाला ..
आता पण दोघे समोरा समोर बसले होते . पण एकमेकांशी काहीही न बोलता बरंच काही बोलत होते थोड्यावेळाने
आबासाहेब : हे बघ तुमच्या दोघात काय झालं मला माहित नाही …पण तुझ्यासारख्या फाटक्या मुलाने माझ्या मुलीचं स्वप्न पाहावं ? अरे तुझ्या घराची अवस्था बघ..या घरात आणणार का तू गौतमी ला ? हे बघ तिच्यापासून दूर रहा ..बोल तुला किती पैसे देऊ ? दुसऱ्या शहरात जा मी तुला इतके पैसे देतो की तू हे घर सोड दुसरं घर घे . एखादा व्यवसाय सुरू कर ..पण या शहरात नाही ..
अंकुश : आबासाहेब मी तुमची खुप इज्जत करतो ..तुमचा खूप अभिमान वाटतो मला ज्या पद्धतीने तुम्ही ही इतकी मोठी कंपनी चालवता ..प्रत्येकाला मदत करता ..तुम्ही गौतमी ची आई नसतानाही खूप छान वाढवलं तिला ..आई आणि बाप दोघांचं प्रेम दिलंत तिला.. ..तिचं खूप प्रेम आहे तुमच्यावर ..मला काही नको तुमचं ..मी जातो हे घर ..हे शहर सोडून …फक्त माझ्या गौतमीची काळजी घ्या ..खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर ..,तिला काहीतरी वाईट सांगा माझ्याबद्दल ..म्हणजे ती मला विसरेन आणि तुमच्या आवडीच्या ..तोलमोलच्या मुलाशी तीच लग्न लावून द्या . तुम्ही निश्चिन्त मनाने जावा ..मी पुन्हा तुम्हाला कुठेच दिसणार नाही ..
आबासाहेबांनी सुटकेचा श्वास घेतला आणि चहा न पिताच तो कप तसाच ठेऊन निघाले ..चालत चालत गाडीजवळ आले …तिथे छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळे गाडी घरापासून बरीच लांब लावावी लागली होती ..गाडीत बसून गाडी चालू करताना त्यांना एकदम त्याच बोलणं आठवलं ..जे त्यांना खटकलं ..आणि ते माघारी फिरून अंकुशच्या घरी आले ..अरे हे काय अंकुशच्या घरातून आगीचे लोळ बाहेर येत होते ..
त्यानी लगेचच अग्निशमन दलाला फोन केला ..गल्ली बोळात त्यांना तो आगीचा बंब आणायला जमत नव्हतं शेवटी 5 मिनिटांच्या प्रयत्नाने ते त्यांना जमलं ..अग्निशमन च्या लोकांनी आत जाऊन पाहिलं तर एका कोपऱ्यात अंकुश बेशुद्ध पडला होता ..त्याच्या अंगावर छताचा एक मोठा भाग पडला होता …पण तो कुठेही भाजला गेला नव्हता ..अगदी थोडाफार हाताला आणि पायाला चटके होते ..,आता हे नशीब होत की काय ..कोणास ठाऊक ?
अंकुशला हॉस्पिटलमध्ये आणलं त्याच पायाच आणि खांद्याच हाड मोडलं होत ..तो आता प्लास्टर मध्ये होता ..आबासाहेब स्वतःलाच दोष देत होते ..काय करत होतो मी हे ? किती प्रेम करतो हा माझ्या मुलीवर ..शिवाय माझ्या आदरासाठी याने स्वतःचा जीवच द्यायचा प्रयत्न केला ..असा जावई मला नक्कीच कुठे मिळणार नाही ..माझ्या मुलीची निवड अगदी योग्य आहे .अरे पैसे तर कोणीही कमवत ..पण अस व्यक्तिमत्व ..असे विचार मुळातच असावे लागतात ..आता हाच माझा जावई ..जे काही माझं आहे ते या दोघांचंच तर आहे ..
अंकुश आजून बेशुद्धच होता.. आता गौतमीला बर वाटत होतं.. तिला समजलं आबासाहेब घरात नाहीत ..तिने ड्रायव्हरला विचारलं त्याने सांगितलं माहीत नाही मी माझ्या खोलीत झोपलो होतो ..साहेब स्वतःच गाडी घेऊन गेले ..
गौतमीने अंकुशला फोन लावला तर तो लागतच नव्हता ..मग तिने आबांना कॉल केला ..
गौतमी : आबा कुठे आहात तुम्ही ? माफ करा मला पण लवकर घरी या ..आपण बोलू
आबा : पोरी माफ कर मला ..तुझी पारख मला समजली नाही ..
गौतमी : म्हणजे ? तुम्ही कुठे आहात ? अस का बोलताय ?
आबा : मी हॉस्पिटलमध्ये आहे.
गौतमी : धपकन खाली बसली : काय झालं आबा तुम्हाला ? तिचा आवाज रडवेला झाला होता ..ती थरथर कापत होती . आबा सांगा काय झालंय तुम्हाला ? कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे तुम्ही ? मी आलेच
आबा : मला काही झालेलं नाही ..पण माझ्यामुळे अंकुश…
गौतमी : काय ? अंकुश काय आबा ? अंकुश ने काय केलं
आबा : मग त्यांनी तिला सर्व घटना सांगितली …पण तो ठीक आहे हे पण सांगितलं..
गौतमीने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली ..अर्ध्या तासात ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली ..आबासाहेब बाहेर एका बाकड्यावर बसले होते
गौतमी पळताना पडली ती सरळ आबांच्या पायात ..कालच्या मारामुळे तिला नीट चलता येत नव्हतं आणि मॅडम पाळायला बघत होत्या ..हे तर होणारच होत .. आबांनी तिला खांद्याला धरून उठवलं ..
आबा : अग बरा आहे आता तो..किती काळजी ही ..तू पण जखमी आहेस पोरी विसरू नकोस .त्यानी तिचा हात धरला आणि अंकुशच्या रुम मध्ये घेऊन गेले ..अंकुशची अशी अवस्था पाहून गौतमी रडु लागली ..तिने जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला ..
गौतमी : काय रे एकटाच चालला होतास होय ? आणि मग मी काय केलं असत ?
अंकुश : बाजूला डोळे भरून त्यातून घळाघळा पाणी वाहणाऱ्या आबांच्या डोळ्यांकडे पहात ..: आग वेडे जर मी जायचा प्रयत्न नसता केला तर हे असं गुपचूप प्रेम करणारे आबासाहेब कसे भेटले असते मला ..होना हो आबा
आबा फक्त हसले ..15 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळाला ..त्याच घर तर पूर्ण जळून खाक झालं होतं ..त्याच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च अर्थातच आबांनी केला होता ..अंकुश विचार करत होता आता मी राहायचं कुठे ..डिस्चार्ज घेऊन तो निघाला तेव्हा गौतमी तिथे आली
गौतमी : काय रे असा दुःखी का तू ? जास्त दुखतंय का तुला ? आजून प्लास्टर काढायला वेळ आहे ..हाड जुळलं नाही ये ..निदान एक महिना तरी लागेल ..
अंकुश : हो ग आता मी जायचं कुठे तोच विचार करत होतो .
गौतमी : मूर्ख ! अस बोलताना तुला लाज नाही का वाटली …आता जे माझं ते सगळं आपलंच आहे ..तू आपल्या घरी येतोयस .
अंकुश : नाही नाही नको ..
गौतमी : ए उगाच नाटक नाही हा करायची ..मुकाट्याने घरी यायच
दोघे घरी आले ..त्याच्यासाठी एक खोली तयार ठेवली होती तिथे सर्व व्यवस्था होती ..एक काठी ..जिच्या आधाराने तो चालेल ..त्याची औषधे ..कॉटवरच जेवता यावं म्हणून बेडला तशी व्यवस्था ..
अंकुश हे सगळं पाहून भारावून गेला : आग हे इतकं सगळं कशासाठी ? खरच किती ग काळजी तुला माझी
गौतमी : हे सगळं मी नाही ..आबांनी केलंय
अंकुश : काय ? मला आज माझा बाप मिळाला ग ..
थोड्याच दिवसांत अंकुशला बर वाटू लागल ..रात्रीच जेवण सगळे सोबतच करत ..कधी चुकून ठसका लागला तरी आबा अंकुशच्या पाठीवर हाथ थोपटून पाणी द्यायचे ..त्याची औषधांची आठवण करायचे ..खूप काळजी घेत होते ते ..त्यांच्या भावी जावयाची ..
2 महिन्यातच त्यांच्या लग्नाची तारीख पक्की झाली ..मोठ्या थाटामाटात लग्न झालं दोघांचं …,आता अंकुश आणि गौतमी पण आबासाहेबांच्या व्यवसायात त्यांना सोबत करत होते …तसा अंकुश खूपच हुशार होता ..त्याने परदेशी जाऊन आजून ऍडव्हान्स technology चा अभ्यास केला आणि त्यांच्या व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होऊ लागली ..आता एक कंपनीची ग्रुप ऑफ कंपनी झाली होती
असेच 5 वर्ष निघून गेले …आजूनपन या दोघांना मुलबाळ होत नव्हतं ..प्रयत्न सगळे चालू होते ..पण काही समजत नव्हतं ..आबांना पण त्यांच्या नातवंडाच तोंड पहायची घाई होती ..दोष कोणात आहे काहीच समजत नव्हतं ..आणि एकदिवस एका डॉक्टर ची मात्रा लागू झाली आणि त्यांच्या घरात या उत्तमच आगमन झालं सगळे खूप खुश होते …सगळं खूप छान छान चालू होतं …
आता उत्तम 7 वर्षाचा झाला होता ..तो सगळ्याचा लाडका कन्हैया होता ..सगळं छान छान चालू असतानाच अचानक आबा सगळ्यांना सोडून गेले ..त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात दोघांना समसमान इस्टेट वाटली होती ..,नातवासाठी परदेशात काही इस्टेट ठेवली होती …आणि काही परदेशी संपत्ती गौतमीला पण दिली होती ..आता गौतमीला कित्येकदा ते व्यवहार पाहण्यासाठी परदेशी जावे लागत होते ..अंकुश पण भारतातील व्यवसाय सांभाळण्यात व्यस्त होता ..दोघांची दोन दोन आठवडे भेट होत नसायची . फोन वर भरपूर बोलायचे दोघे पण प्रत्यक्ष भेट होतच नव्हती …अंकुश ला अस पण आधीपासूनच तिच्या शरीरात जास्त रस नव्हताच ..आता व्यक्ती तितक्या प्रकृती …हा दुरावा गौतमीला आजिबात सहन होत नव्हता ..ती नेहमी अंकुशला आग्रह करायची आपण दोघे सोबत जाऊ या म्हणजे आपल्याला वेळ मिळेल एकमेकांसाठी ..पण अंकुशला ते शक्य होत नव्हतं
आज त्यांचा एकदाचा प्लॅन ठरला सोबत जायचा ..पण ऐनवेळी अंकुशने तो रद्द केला ..गौतमीच्या भावनांचा अगदीच चुराडा झाला होता ..त्यांचं प्रेम आता कुठे गेल होत कुणास ठाऊक ..यावेळी पण ती एकटीच गेली होती ..
यावेळी तिची मीटिंग एका बेटावर होती ..तिथे एक मोठं हॉटेल होत ..मिस्टर लोबेन यांच…त्याच्यासाठी काही सामान त्यांना यांच्याकडून नेहमी लागणार होतं .तसच तिथलं काही इंटेरिअर पण करायचं होतं …म्हणजे यावेळी तिला किमान 15 दिवस तरी थांबावं लागणार होत तिथे..मिस्टर लोबेन म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व होत ..त्यांना पाहताच आमची गौतमी त्यांच्यावर फिदा झाली ..होतेच ते तसे 6 फूट उंच ..निळे निळे डोळे …सतत मस्करी करणारे ..नेहमी हसतमुख ..जिम मध्ये जाऊन मस्त बनवलेलं पिळदार शरीर ..त्यांचा रुबाबच काही वेगळा होता ..ती एकटक त्यांच्याकडे पाहत होती …पण तिला जाणीव झाली शी मी हा काय विचार करतीये ? आणि ती स्वतःशीच लाजली ..

© पूनम पिंगळे
क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा