तूच माझी भाग 15

Written by

#तूच माझी
भाग -१५
उत्तम गाडी चालवत होता ..पण त्याच सगळं लक्ष उर्वशी कडेच होत ..तो मधेच हसत होता , गाणी गात होता ..आणि अंकुश त्याच निरीक्षण करत होता
अंकुश : अरे वाह ! आज स्वारी भलतीच खूश आहे..काही विशेष
उत्तम : नाही ..नाही हो अस काही नाही ..कसलं काय विशेष ..पण तुम्हाला अस का वाटल?
अंकुश : लेका बाप आहे मी तुझा …तुझ्या त वरून ताक ओळखतो मी ..किती लपवशील आजून??
उत्तम : एकदम चोरी पकडली गेली आशा सुरात- क..क…काय लपवल मी? काहीच नाही ..हो ..काहीच नाही लपवल मी
अंकुश : हो का ? खर खर बोलतोयस.. काहीच नाही लपवत तू?
उत्तम : तुम्हाला काय बोलायचंय ते स्पष्ट बोला हो..मला काहीच समजत नाहीये
अंकुश : बर आता स्पष्टच बोलतो .. तुला उर्वशी आवडते ना ?
उत्तम : ह्या ..काहीपण काय पप्पा …ती कुठे मी कुठे …तुमचं आपलं काहीपण हा ..
अंकुश : अच्छा तर तस काही नाही तर ? …बर मग तात्याला त्या आलेल्या स्थळाला हो बोलायला सांगतो ..चांगला आहे मुलगा तो सुखात ठेवेल पोरीला .
उत्तम : what ??? कोण मुलगा ? कसला मुलगा ?
अंकुश : अरे जाऊदेत रे तू कुठे …ती कुठे …जाईल ना ती तिच्यासारख्याच मुलासोबत..
उत्तम : आता खूप टेन्शन मध्ये आला ..- म्हणजे तीच लग्न ठरतंय का? पण तिने तर आत्ताच जॉब जॉईन केलाय आपल्याकडे ..मग तिला ट्रेनिंग देऊन काय उपयोग ..उगाच वेस्टेज ऑफ टाइम.. मग तिला सांगा उद्यापासून नको येऊस ..
अंकुश : अरे अस कस ती लग्नानंतर पण जॉब करणार आहे …तिच्या तोलामोलाचच आहे रे स्थळ ..इतका चांगला जॉब सोडून नाही जाणार रे ती
उत्तम : हम्म मग ठीक आहे
अंकुश त्याच्याकडे टक लावून त्याचे reaction पहात होता ..त्याची खूप चलबिचल झाली होती ..तो बोलत एक होता ….पण मनात काहीतरी वादळ चालू होतं ..अंकुश : माझी इच्छा होती ती आपल्या घरी यावी आपली काळजी घ्यावी तिने पण तुला तर ती पसंत …
उत्तम : पप्पा अस काही नाही मी तुमच्या शब्दाबाहेर का आहे ..तुम्हाला हवं असेल तर करेन मी तिच्याशी लग्न
अंकुश : नाही नको रे ..हा आयुष्यभराचा प्रश्न आहे ..जर तुला ती आवडतच नाहींतर तुमचं लग्न करून काय उपयोग ..नको बाबा
उत्तम : पप्पा ..तुम्ही माझं वाईट थोडी ना करणार …बोला तुम्ही तात्यांना उद्याच ..करेन मी लग्न ..
अंकुश : नाही नको नको ..जाऊदेत
उत्तम : अगदी व्याकुळ होऊन – पप्पा मला आवडते हो ती
अंकुश : जोरजोरात हसू लागले …अरे मी बाप आहे तुझा ..तुला केव्हाच पकडलय मी …आणि ती उर्वशी तिचे पण डोळे सांगतात ..पण पोरगी खूप चांगली आहे ..स्वतः कधीच बोलणार नाही
उत्तम : होना ..खरच काहीच बोलत नाही
अंकुश : हम्मम बघ तुलाच माहीत सगळं ..बोलत बोलत दोघे घरी पोहोचले …जेवताना पण दोघांचा तोच विषय चालू होता ..आणि अंकुशने आज वचन दिल की उत्तम आणि उर्वशी च लवकरच लग्न होणार
उत्तमतर आता अगदी तिचीच स्वप्न बघू लागला होता ..रात्रीपण त्याच्या स्वप्नात तीच होती …
सकाळी तात्या ड्युटीवर आले..,अंकुशने त्याला घरात बोलावलं..आजपर्यंत अस कधीच झालं नव्हतं …तात्या जरा विचारातच आत गेला
अंकुश हसतच हॉल मध्ये आले ..अरे तात्या ये बस..तात्या खूप गोंधळून गेला होता
तात्या : साहेब काही चुकलय का माझं ? आज इतक्या वर्षात प्रथमच बोलवलत तुम्ही मला असं आत .
अंकुश : हो खूप मोठी चूक झाली तुझी
तात्या : अरे देवा ! काय झालं मालक
अंकुश : इतक्या सुंदर आणि शालीन मुलीला जन्म दिलास आणि तिला आमच्या ऑफिसमध्ये कामाला पण आणलस..
तात्या : म्हणजे माझ्या मुलीच काही चुकलं काय
अंकुश : हो …तिने चोरी केलीये
तात्या : नाही ..ते शक्य नाही माझी मुलगी अस करणारच नाही
अंकुश : तिने माझ्या पोराचं हृदय चोरी केलंय …आणि त्या बदल्यात त्याला तीच हृदय हवं आहे
तात्या नि नीट ऐकलच नाही : असं नाही होणार साहेब …तुम्ही घरात नीट शोधा ..घरातच असेल कुठेतरी नाहीतर ऑफिसमध्ये असेल ..
अंकुश : अरे तात्या नीट ऎकतर काय चोरलंय तिने ते
तात्या : काय चोरलंय?
अंकुश : माझ्या मुलाचं हृदय..
तात्या : काय ? अहो साहेब अस कस होईल ..अहो आम्ही कुठे ..तुम्ही कुठे ..नाही नाही ..हे नाही जमायचं
अंकुश : तात्या मला तुझी मुलगी माझ्या घरचीलक्ष्मी म्हणून यायला हवी आहे ..तुला काय अडचण आहे का ?
तात्या : अहो पण लोक काय म्हणतील ..खूप अंतर आहे आपल्यात .
अंकुश : ते सगळं सोड तू ..आपण पुढच्या महिन्यातील तारीख नक्की करूया ..,
तात्याला काय बोलावे तेच समजत नव्हतं
तात्या : जस तुम्हाला योग्य वाटेल ते करा साहेब ..म्हणजे त्याचा होकार होताच तर.
अंकूश : एकदा उर्वशीला पण विचार ..,तिचा काय विचार आहे
पटकन उत्तम : ,ती काही बोलणार नाही ..हो ना तात्या ?
अंकुश : ते पण तूच ठरवणार का? बरं आपण ऑफिस मध्ये गेल्यावर बोलू तिच्याशी ..तात्या तोपर्यंत तू तिच्याशी या विषयावर काहीही बोलू नकोस
तात्या : बर साहेब जस तुम्हाला योग्य वाटेल तसच होऊद्या
अंकुश : तात्या चल गाडी काढ निघुयात आपण …
उत्तम : हो चला मी पण येतो ..
अंकुश : काय रे तुझी गाडी घे की
उत्तम : अहो ती काल ऑफिसलाच नाही का ठेवली पप्पा
अंकुश : अरे हो ..खरच की …चला मग निघुया आपण …आणि सगळे ऑफिसला आले
तात्याने नेहमीप्रमाणे बॅग , डब्बा ऑफिसमध्ये आणून ठेवला…जाता जाता केबिनमध्ये बसलेल्या उर्वशीला अगदी भरल्या डोळ्याने पाहिलं . .. आणि जाऊन गाडीत बसला.
उर्वशी : सर आज तुमची त्या कॉर्पोरेट साहेबांसोबत अपॉइंटमेंट आहे दुपारी 2 वाजता ..मग ते अंगणवाडीची मीटिंग आहे 5 वाजता …आणि उत्तम सर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आज त्या बाळाला सोडणार आहेत सो ते सगळं फायनल बिल भराव लागणार आहे ..मगाशीच फोन आला होता हॉस्पिटलमधून..
अंकुश : वाह ग उर्वशी !…सगळं अगदी व्यवस्थित करतीयेस की ग तू ..आणि किती घाबरत होतीस ..,मला नाही जमणार वैगरे …ताशीपण माझी पारख कधी चुकत नाहीच म्हणा ..बर आता 11वाजलेत मी 1वाजता जेवून निघेल मिटींगला …तुम्ही दोघे पण तेव्हाच जेवून जावा हॉस्पिटलमध्ये
उर्वशी : तुम्ही माझं खूपच कौतुक करता सर …मी प्रयत्न करतीये सगळी काम समजून वेळेवर करायचा ..बघूया कस जमतंय ते ..माझ्यामुळे तुमचं काही नुकसान नको व्हायला इतकंच ..आणि सर मी कशाला जाऊ हॉस्पिटलमध्ये? ..त्यापेक्षा इथली बाकीची काम घेते ना उरकून मी …
अंकुश : आग मुली तू खरच खूप छान करतीयेस सगळी काम …त्यामुळे बोललो मी …आणि हॉस्पिटलमध्ये तुला जावं लागले आग ती बाळाची आई आणि बाळ यांना तूच व्यवस्थित सांभाळून घेऊ शकतेस ते उत्तमला नाही जमणार
उर्वशी : पण सर आज सांभाळायचा काही प्रश्नच नाही येणार ..फक्त बिल भरून यायचय ..आणि ते तर उत्तमसर एकटे पण करू शकतात ..
अंकुश : ऐक पोरी माझं …,जा तू पण त्याच्यासोबत
उर्वशी : एकदम शांत झाली …
अंकुश : काय झालं ग तुला ? तुला नाही आवडत का उत्तम आमचा ?नाही जायचं का तुला सोबत त्याच्या ? बर मग राहुदेत
उर्वशी ला हा प्रश्न अनपेक्षित होता ..तिने एकदम दचकून अंकुशकडे पाहिलं …आणि अडखळत ..न..ना ..नाही म्हणजे ..तस नाsss ही ..पण उगीच कशाला जाऊ अस वाटलं
अंकुश : मी का तुला उगाच पाठवू ? ते गरजेचं आहे..म्हणून जा बोललो ..पण तुला उत्तमसोबत जाण्यात जर गैर वाटत असेल तर ठीक आहे नको जाऊस ..मी त्या राधाबाईन पाठवतो …त्यांनी महिला कामगार हेड राधाबाईना बोलावलं
( उत्तम मनातल्या मनात ..ओह नो या राधाबाईला मी नाही नेणार सोबत ..छे काय करतायेत पप्पा हे .. ओहह गॉड हेल्प मी ..प्लिज उर्वशी नाही आली तरी चालेल पण ही राधाबाई ? नो ..नेव्हर ) .
अंकुश : राधाबाई तुम्ही उत्तमसोबत जा आणि त्या बाळाला डिस्चार्ज आहे आज हॉस्पिटलमध्ये ..,तिच्या घरी तिला व्यवस्थित सोडवा …तिची सगळी सोय बघा आहे का घरी नीट ..
राधाबाई : साहेब.. अहो ते उद्या साहेब येणार आहेत ना Inspection ला ..मी तर सगळी साफसफाई आणि बाकीची काम बघत होते ..उगाच प्रॉब्लेम नको उदयाला म्हणून
अंकुश : अरे हो ते पण महत्वाचं ….बर जा मग तुम्ही ..तुमची काम चालुद्या
उर्वशी : सर ..मी।जाते हॉस्पिटलमध्ये नका काळजी करू तुम्ही
अंकुश आणि उत्तम एकमेकांकडे पाहून गालातल्या मस्त हसले

पूनम पिंगळे
क्रमशः

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा