तूच माझी भाग 18 अंतिम भाग

Written by

#तूच माझी
#अंतिम भाग
#भाग – १८
त्याच विचारात उर्वशी घरी आली …सकाळ झाली पण तिच्या डोक्यातून काही गौतमी जात नव्हती ..त्याच विचारात तीच कशातच लक्ष लागत नव्हत.. शेवटी उत्तमला नाही राहवलं
उत्तम : ए उर्वशी अग काय झालंय तुला ? तू इतक्या टेन्शन मध्ये आहेस ? तुला इतकं टेन्शन मध्ये मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं …प्लिज डिअर बोल …तुझी तब्येत बरी नाही का ? काही झालय का फ्रान्सला ? आग तू इतकं छान प्रेझेंटेशन दिलंस ..सगळ्यांना मात देऊन तू दोन्ही काँट्रॅक्टस घेऊन आलीस …I am so proud of You dear!…तुला अस टेन्शन मध्ये नाही पाहू शकत ग तुला …तुझ्या मनात नक्की काहीतरी चालू आहे …प्लिज बोल..
उर्वशीला एकदम रडूच आलं …तिने उत्तमला कडकडून मिठी मारली ..उत्तम …मी …मी ..फ्रान्स मध्ये …आईंना भेटले रे …
उत्तम : काय ? काहीही काय बोलतेस ? आग हे कसं शक्य आहे?
उर्वशी : मी पण खूप शॉक झाले होते त्यांना पाहून …त्या पण या कॉन्फरन्स ला होत्या रे..आम्ही दोघी नेमक्या एकाच गाडीतून सेम हॉटेलमध्ये गेलो …मी त्यांना ओळखलं …अरे त्या तुम्हा दोघांबद्दल चौकशी करत होत्या…त्यांचे डोळे भरून आले होते …आणि ते डोळे मला ओरडून ओरडून सांगत होते …मला माझ्या मुलाला ..माझ्या अंकुशला भेटायचं आहे…त्यांना खूप आठवण येते रे तुमची …पण त्यांनी ते कबूल नाही केलं …त्त्यांना त्यांच्या चुकीचा पण खूप पस्तावा होत आहे ..
उत्तम : चूक ? कसली चूक? आग उर्वशी तू काय वेड्यासारखी बडबडतीयेस? नक्की कोणाला भेटलीस तू ?? आग आईला जाऊन खूप वर्ष झालीत आता ..आणि ती भेटणं कधीच शक्य नाही …
उर्वशी : अरे मला काहीही झालेलं नाहीये …मी ठीक आहे ..आणि मी ज्यांना पाहिलं त्या तुझ्या आईच होत्या …थांब मी तुला दाखवते..अस म्हणत तिने फोन घेतला ..त्यात फेसबुक ओपन केलं आणि नाव सर्च केलं लिसा लोबेन …
इतक्यात घाई घाई मध्ये उत्तम : आग वेडे माझ्या आईच नाव गौतमी लवाटे तू हे काय सर्च करतीयेस ..प्लिज उर्वशी मी तुला अस वागताना नाही पाहू शकत ..मला आता तुझी खूप काळजी वाटायला लागलीये…प्लिज ग ..मी जगू नाही शकत तुझ्याशिवाय..I LOVE YOU!. मला तुझी खूप गरज आहे ..आणि तुला अस काही झाल तर मी नाही सहन करू शकणार …बोलता बोलता त्याने उर्वशीला छातीशी कवटाळल…
उर्वशी इतकी वर्षे झाली त्या एका शब्दासाठी आतुर होती …तिनेही तितक्याच आवेशाने उत्तमला मिठी मारली …तिच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वहात होते.
उत्तम : गोंधळून : ए बाई आता काय झालं तुला ? तू का रडतीयेस?
उर्वशी : अरे हे आनंदाचे अश्रू आहेत …तुझ्या तोंडून हे शब्द ऐकण्याच्या इच्छेत इतकी वर्षे निघून गेली बघ …आणि आज अगदी अनपेक्षित पणे तू माझी ईच्छा पूर्ण केलीस… I Love You too रे..
इतक्यात स्वतःला सावरत उर्वशीने पुन्हा स्वतःचा फोन उचलला आणि उत्तमला ते अकाउंट दाखवलं.. प्रोफाइल फोटो पाहून उत्तम पण गोंधळून गेला…omg ! हे काय ग ? अग ही तर हुबेहूब माझ्या आईसारखी दिसतीये ..
उर्वशी : अरे या आईच आहेत …त्यांनी तिकडे लोबेन नावाच्या माणसाशी लग्न केलं…त्यांनी सांगितलं पप्पा त्यांना पुरेसा वेळ देत नव्हते …त्यांना एकट वाटू लागलं होतं ..आणि त्याच वेळी लोबेन त्यांच्या आयुष्यात आले …पप्पांना सगळं माहीत होतं …आणि इतकी वर्षे ते एकटेच मनातल्या मनात झुरत असणार …त्यांनी इथे कोणालाच काहीच सांगितलं नाही बघ …20 वर्षांपूर्वी लोबेन हे जग सोडून गेले ..तिकडे त्या आणि इकडे पप्पा ..दोघेपण एकटेच जगत राहिले …आपल्याला पप्पांनी जवळ आणलं …आणि स्वतः फक्त आईच्या आठवणीत झुरत राहिलेत..आपल्याला काहीतरी करायला हवं उत्तम ..त्या दोघांना एकत्र आणायला हवं ..
उत्तम उर्वशी जे सांगत होती ..ते अगदी शांतपणे ऐकत होता …त्याला आजूनपन विश्वास बसत नव्हता …खरच का माझ्या आईने अस केलं असेल? माझ्या पप्पांच मन मला कधीच समजलं नाही ..
उत्तम : बर तू आईचा ऍड्रेस आणला आहेस का ?
उर्वशी : नाहीना ..अरे त्या सकाळी सकाळी निघून गेल्या रे …हो पण मी त्यांचा मोबाइल नंबर घेतला आहे ..थांब मी लावते फोन..उर्वशीने फोन लावला ..पूर्ण रिंग होऊन फोन बंद झाला पण गौतमीने तो उचलला नाही …उर्वशीने पुन्हा फोन केला अस सलग ५-६ वेळा रिंग केल्यावर गौतमीने फोन उचलला
गौतमी: हॅलो !! अग का कॉल करून त्रास देतेस मला ? माझं आयुष्य मला सुखाने जगू देना ग …नको त्या जुन्या आठवणी…
उर्वशी : मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा …पण मुलासोबत बोलायचं सुख नक्कीच द्यायचं आहे ..आणि म्हणूनच फोन केला आहे मी..
गौतमी ला एकदम भरून आलं : उत्तम …उत्तम आहे का तिथे? देना ग फोन त्याला ..मी बोलते
उर्वशीने फोनचा स्पिकर चालू केला
गौतमी : माझ्या बाळा …उत्तम …कसा आहेस रे तू? खूप आठवण येते रे तुझी …माफ कर बाळा मला …मी तुला अस मधेच सोडलं …तुझ्या वडिलांना तुला खूप त्रास दिला रे मी …मला माफ कर …खरच मी आई म्हणून घ्यायला लायक नाही …
उत्तम : रडतच …अग आई ..तू अस नको बोलुस ग …तुझी काहीही चूक नाही …जे झालं ते झालं …आम्हाला गरज आहे ग तुझी …ये ना तू इकडे …लहानपणी नाही आता तरी येऊन माझे हट्ट कर ना पूर्ण …
गौतमी : नाही बाळा मी नाही येऊ शकत …अंकुशला कस तोंड दाखवू मी …बिचारा एक शब्दाने नाही बोलला मला …त्याला खूप मोठा हार्ट अटॅक आला होता तेव्हा …त्यातून तो बरा झाला आणि लगेच इंडियाला परत आला ..मला सांगितलं तू सुखी रहा आणि परत इंडियाला येऊ नकोस …माझं नाव खराब नको व्हायला …पापांना वाईट नको वाटायला म्हणून त्यांनी कोणालाच काहीच नाही सांगितलं …फक्त इतकंच बोलले तिचा अपघात झाला आहे ..आशा देवमाणसाल मी कस तोंड दाखवू ? नाही नको बाळा मी नाही येऊ शकत.
इतक्यात उर्वशीच लक्ष दरवाजाकडे गेलं तिथे अंकुश उभा होता आणि सर्वकाही ऐकून एखाद्या लहानमुलासारखा रडत होता …आधारासाठी त्याने दरवाजा घट्ट पकडला होता …उर्वशी पळतच दरवाजाकडे धावली …तिने अंकुशला पकडलं आणि आणून सोफ्यावर बसवलं …पाणी पाजलं
उर्वशी : पप्पा …तुम्ही कधी आलात? तुम्ही प्लिज सांभाळा स्वतःला …
अंकुश : तो फोन इकडे आन ग पोरी …मला बोलुदेत तिच्याशी ..
उर्वशीने फोन अंकुशच्या जवळ आणला.. उत्तमपण अंकुशजवळ येऊन बसला …
अंकुश : गौतमी ….ए गौतमी …कशी आहेस ग तू? सुखी होतीस ना ग …म्हणून सोडून आलो …पण आता अस एकट नाही सोडू शकत तुला …तेव्हा चूक फक्त तुझी नव्हती ग …या सगळ्याला मी पण तेवढाच जबाबदार होतो …माझ्या मनात आजपर्यंत तुझ्याशिवाय इतर कोणालाही जागा नाही बघ …तू लगेच जी फ्लाईट मिळेल ना ती पकडून ये …माझे डोळे तुला पाहण्यासाठी खूप आतुर झालेत बघ …आता वेळ घालवू नकोस …मी तुझाच आहे …
गौतमी : फोनवरच रडू लागली ….अंकुश माफ कर मला ..मी चुकले
अंकुश : आता माफी तेव्हाच मिळेल जेव्हा तू येऊन मला तुझ्या मिठीत घेशील ..आणि लाजत त्याने उत्तमकडे पाहिलं …काय रे मुलांनो बरोबर ना …
उर्वशी आणि उत्तम अगदी एका सुरात …होओओ…
गौतमीने फोन ठेवून लगेचच तिकीट बुक केलं ..दुसऱ्या दिवशी सकाळी ती घरी आली ..तिने बेल वाजवली ..तर दरवाज्यात अंकुश उभा …त्याने तिला कडकडून मिठी मारली …इतकी वर्षे जे प्रेम मी तुला देऊ शकलो नाही ना ..ते सगळं आता तुला देणार बघ …
गौतमी : चल चावट …आता हे का आपलं वय आहे प्रेम करायच?
अंकुश : अरे …त्यात काय? मॅडम अभी तो मे जवान हु …
गौतमी : हसू लागली …काय रे अचानक इतका रोमँटिक कसा काय झालास तू ?
अंकुश : ‘तेरी जुदाईने सिखा दिया डिअर…
गौतमीला आता हसूच आवरत नव्हतं ..:ए बाबा तू आता नॉर्मल हो रे ..मूल काय म्हणतील आपल्याला? काहीतरी लाज ठेव रे..
अंकुश : गौतमी …माफ कर ग मला ..मी तुझ्या भावना कधी समजू नाही शकलो ..
गौतमी : तूच माफ कर मला ..मी क्षणिक सुखासाठी सोडलं तुला ..पण तू का नाही केलंस दुसरं लग्न?
अंकुश: नाही ते कधीच शक्य नव्हतं कारण मझी फक्त तू आणि तूच आहेस ग …फक्त तूच माझी आहेस …मला इतर कोणीही नको …
गौतमी अगदी तिच्याही नकळतपणे त्याच्या मिठीत गेली …दोघे असेच सोफ्यावर बसले होते …आतून उत्तम आणि उर्वशी हे सगळं पाहून खूप खुश झाले होते …उत्तमने उर्वशीला मिठीत घेतले आणि बोलला : खरच अशी बायको मोठ्या नशिबाने मिळते हं…थांक्यू …थांक्यू सो मच उर्वशी ..खरच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर .. आणि माझी सुध्दा फक्त तू आणि तूच आहेस बघ . .

समाप्त..

©पूनम पिंगळे

तळतीप : तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही माझी कथा अगदी मनापासून वाचलीत ..तुमचे बहुमूल्य कंमेंट्स करत राहिलात …प्रेम असच राहुद्यात …आता पुढची कथा पूर्ण लिहूनच पोस्ट करेन …तोपर्यंत …रजा असावी ..

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा