“तूझी वाट बघेन मी ! येशील ना ग्”?(भाग२अंतीम)

Written by

अभीला आपण वेळ मागून घरी परतलो पण, अभीने जसं प्रपोज केलं आणि लग्नाला मागणी घातली त्यामुळे आपण क्षणभर शहारलो होतो ह्या त्यावेळच्या विचारानेच अनू आजही लाजली होती.

लहानपणीचा ‘दोस्त ‘ जर आयुष्यभराचा साथीदार होत असेल तर त्याहून मोठं सुख काय असेल म्हणत आपण कीती आनंदलो होतो पण हा विचार जेंव्हा आई- वडिलांना बोलून दाखवला तेंव्हा मात्र सगळंच गणित बिघडलं.

“काय म्हणालीस?……  अभी आणि तुझं लग्न? ….डोकं ठिकाणावर आहे का अनू तुझं? …. कुठे तो अन् कुठे आपण शिवाय त्याची जात? … आयुष्यभर त्याचं असलं नाव लावून फिरू शकशील का तू “?…..म्हणत बाबांनी उलट प्रश्न केला तेंव्हा आपण माहेरच्या सुखांना आठवत त्यात भुलून गेलो.

“अग् मित्र एकीकडे पण आयुष्याचा जोडीदार हा निदान आपल्या लायकीचा तरी हवा, ह्याचा तरी विचार कर अनू”? …. म्हणत आईनेही बाबांच्या बोलण्यात भर घातली होती. ‘तुला आम्ही एवढं शिकवलंय, ते ह्या दिवसासाठीच का’? …..तुच विचार कर सगळ्या गोष्टीचा आणि मग तुला समजेल सगळं म्हणत आई- बाबा निघून गेले अन् आपण आतापर्यंतचं सगळं आठवत लहानपणापासूनचं मिळालेलं सुख मोठं का अभीचं प्रेम मोठं ह्यात गुंतून गेलो अन् अखेर, भौतीक सुखासमोर मानसिक सुखाला डावलत अभीच्या प्रेमाला नकार दिलं ते ही त्याला कधी सांगितलंच नाही. 

हीच होती का आपली मैत्री? आपण इतके स्वार्थी कसे काय झालो त्यावेळी म्हणत अनूला भरून आलं होतं.

अभीला विसरत एका श्रीमंत मुलाशी लग्न करत आपण आपला संसार थाटला खरा पण पैशाच्या सुखापेक्षा अजून कुठलंच सुख आपल्याला त्या संसारात मिळालं नाही. नव-याचे रोज एक लफडे स्टेटसपाई नजरेआड करावे लागत होते.

शाररीक सुख तो ओरबडून घ्यायचा आणि मानसिक सुख द्यायला आणि माझ्या भावना समजून घ्यायला त्याला वेळच नसायचा. अशातच एक दिवस दारू पिऊन गाडी चालवताना त्याचा अॅक्सिडेंट झाला अन् त्यातच तो गेला. आपल्या नव-याने हवं तसं वागत त्याचं अायुष्य त्याच्या मनाने जगलं आणि मला मात्र लोकांच्या नजरेत अपशकुनी ठरवलं. नवरा असतानाही सासरी कधी मान मिळाला नव्हता. होता तो फक्त श्रीमंतीचा देखावा.  त्या दिवसात कितीतरी वेळा अभीची आठवण यायची पण हे जे पुढ्यात वाढलं गेलं होतं ती माझीच निवड होती म्हणत गप्पच बसले. 

आज आई- बाबा मला नव्याने सुरूवात करायला सांगतायेत पण परत आता तोच मुखवटा मिरवत सुखी रहावं का खरंच आपल्या सुखाजवळ जावं? आज अभी आपल्याला आहे तसं स्वीकारतोय ते ही विनवणी करत …. तो आजही मला त्याच भावनेने प्रेम करतोय जसं तो आधी करायचा. “करावं का आता ह्या बुरसटलेल्या समजाशी शेवटचं बंड? …..करावी का सुरूवात अापल्याच घरापासून ” ?….

तिनं बाहेर डोकाऊन पाहिलं तर आभाळ भरून आलं होतं. तिला तिने कुठेतरी वाचलेली तीची आवडती चारोळी आठवली.

“छोट्याशा ह्या आयुष्यामध्ये खुप काही हवं असतं,
असंख्य चांदण्या भरुन सुद्धा आपलं आभाळ रिकामं असतं”…..

आज सगळंकाही असूनही अनू एकटीच होती. अनूचं डोकं एव्हाना सगळा विचार करून थकून गेलं होतं. तिने आज परत रात्रीच्या झोपेसाठी गोळी घेतली आणि गमावलेल्या सुखांची गोळाबेरीज करत रडतच झोपी गेली.

सकाळ झाली ऊन्हं डोक्यावर आली होती. खिडकीतून ऊन अनूच्या डोळ्यांवर आली आणि तशी अनू खडबडून जागी झाली. तीला आता काय करायचंय ते समजलं होतं. इतके दिवस अभीशीवाय सुख उपभोगत नक्की दु:ख काय असतं ते तीला चांगलंच समजलं होतं. 

ती आज मनापासून तयार झाली. तिने तिचा निर्णय तिच्या घरच्यांना सांगितला आणि ती तडक बाहेर आली.

आज तीला अभीला वेळेवर गाठायचं होतं. तीला आज कसलंच भान उरलं नव्हतं. वा-याचा वेग पकडायचा प्रयत्न करत ती अभीच्या घरी पोहोचली. त्याच्या घराचा दरवाजा उघडाच होता अन् अभी खिन्न मनाने निघायच्या तयारीत होता. जराही उशीर न करता अनूने अभीला मिठी मारली. अभीच्या तोंडून अनूला पाहत शब्द फुटत नव्हते.

दोघं एकमेकांना पहात मधेच हसत तर मधेच रडत होते. त्यांची मिठी घट्ट होत गेली आणि इतक्या दिवसांचं भरलेलं आभाळ आज मोकळं झालं होतं. 

समाप्त.

©Sunita Choudhari.

(मित्र-मैत्रीणींनो आणि माझ्या वाचकांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली हे मला लाईक ,कमेंट आणि शेअर करून नक्की सांगाल. धन्यवाद. )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत