“तू आणि मी”

Written by

चिंब पावसाच्या ओल्या रात्री
असावा चिंब-चिंब तू,
आणि तुझ्या मिठीत अलगद न्हाणारी मी…

भिजलेल्या वाटेवर
असावा प्रेमगीत गाणारा तू,
आणि तुझ्या मधु-शब्दात हरवणारी मी…

तळ्याकाठी असावा
मोहरलेला तू,
आणि तुझ्या गंधात विरणारी मी…

आयुष्यात माझ्या असावा
फक्त तू,
आणि तुझ्या ओठांवर चे हसू मी…

भरजरी स्वप्नात
असावा प्रेमवेडा तू,
आणि तुला खट्याळ छेडणारी मी…

जन्मांतरीच्या अवकाशात
असावा चंद्र नशीला तू,
आणि तुझ्यात चमचमणारी मदमस्त चांदणी मी…

……………..

  • दिप्ती
Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत