“तू आमचा अभिमान आहेस…”

Written by

कार्तिक नाराजीतच घरी आला आणि रडतच म्हणाला,”मी कोणालाच आवडत नाही?? माझं कोणीच कौतुक करत नाही..
मी सकाळीच उठतो, प्रॅक्टिस करतो मग बाबांना मदतही करतो… पण विनायकने एक puzzle solve केलं तर सगळ्यांनी त्याचे किती कौतुक केले.”

“मला आलं असतं तर माझे पण लाड झाले असते ना!!!”

उमा:- “हे बघ बाळा, तो त्याच्या जागी.. तू तुझ्या जागी…

प्रत्येकजण एकाच कामात कसा हुशार असेल?? कोणी खेळण्यात, कोणी अभ्यासात, तर कोणी आणखी कशात..

कोणाशीही आपलं comparision करून स्वतःचं खच्चीकरण करू नकोस…

प्रत्येकाच्या आयुष्याचं एक विशिष्ट ध्येय,उद्देश असतो.
भरपूर मेहनत कर… तुझं ध्येय गाठ…

मुष्टियोद्धा म्हणून तुझी ओळख करून दे…

तू आमचा अभिमान आहेस…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा