तू तुलसी मेरे आंगण की

Written by

मैं तुलसी तेरे आंगण की

 

मनु”….विषय वाचला ,नि तुझी आठवण आली.

खरंच किती लवकर मोठया हातात ह्या मुली….

आपल्या तोतरया भाषेत बोलणारी, कुरळ्या केसांच्या बटा सावरणारी, सावळीशी छटा असणारी, बाहुला-बाहुलीच लग्न लावणारी…..

माझा पदर पकडून स्वयंपाक घरात लुडबुड करणारी…

घुंगरुच्या तोरड्या घालून ,

ठुमकून ठुमकून घर, आंगण फिरणारी….

छोट्या छोट्या गोष्टीसाठी घर अंगावर घेणारी….

माहीत होतं मला ही परक्याचं धन आहे….

उद्या मला सोडून जाणारच आहे….

पण माझ्यापेक्षा जास्त समजूतदार तीच निघालीय….

काग….काळजी करतेस…

अगं ……आता परिस्थिती बद्दललीय, मी दोन्ही घर संभाळीन….

तुझा जावइ पण लाख मोलाचा हं…..

नाही अडवणार तो मला…..

अग, मुलगा घराचा “दीपक”

तर मुली “त्या दिव्याच्या वातीच”न…

“दिवा-बाती ” बनून करू ग दोन्ही घर रोशन…..💞

मनुच हे बोलणं ऐकून वाटलं….

छोटीशी “परी” आज मोठी झालीय…..🙎

आठवतोय तो दिवस….

तुझं लग्न जुळलं…नि

माझ्या मनाची कालवाकालव….

तुझ्या बाबांना म्हटलं,” कशी करेल हो ही पोरं”….

तू ऐकलस, 

माझ्या गळ्यात हात टाकून म्हणालीस, ”  विसरलीस”!!

       तूच म्हणायचीस ना, “सृष्टीच्या उत्पत्तीच प्रथम बीज म्हणजे “स्त्री”….

नवीन नाती बनविण्यासाठीच तर हा स्त्री जन्म….

अगं……

कुटुंबाचा सन्मान मी…..

तुम्हा दोघांचा अभिमान मी….

का!!! अशी हळवी होतेस…

तुझीच लेक मी…..

तुझेच संस्कार माझ्यावर….

जीवनात येणाऱ्या सारे हसरे-रडवे सुख-दुःख करीन गं मी पार….

अगं  नोकरी, घर सांभाळून तू मला मोठं केलंस, तुझी तारेवरची कसरत मी बघीतलीय, कधी काही कमी पडू दिल नाहीस….

कसं विसरेन ग मी सगळं…

आई, तू मला छोट्या छोट्या गोष्टीतून बरंच कशी शिकवलंय

आपलं कोणी कितीही वाईट केलं,तरी आपण त्यांच्याशी वैर ठेवू नये…ही तुझीच शिकवण ना गं….

स्वतःआपण आपली ओळख बनवावी,त्यासाठी तुला कधी दुर्गा, तर कधी काली बनावं लागेल, ही तुझीच शिकवण ना गं…..

 

तुझ्या अंगणातल

 हिरवी तुळस🎍 ना मी….

कधीच नाहीं कोमेजनार….

रडू नकोस😘

आशीर्वाद दे…. …

सदा मी अशीच  बहरणार🎍

✒लता राठी

प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव

( मुलीच्या लग्नाच्या काळजीने व्याकुळ आई, पण मुलगी जीच लग्न ठरलय, पण आईचे संस्कार तीने जपलेय,आई तू निश्चित रहा, मी सगळं संभाळेन….)

आयानो नका काळजी करू मुलींची, खूप समजूतदार आहेत आपल्या मुली😊

 

आवडल्यास नक्कीच like, कंमेंट्स करा….share सुद्धा करू शकता पण नावासकटच🙏 मला follow करायला विसरु नका….😊

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत