“तेजोमय सोंदर्य “

Written by

रुपाली नावाप्रमाणेच सुंदर होती.तिच्या रुपाकडे पाहिलं की पाहतच रहावं वाटत होतं.दिसायला सुंदर होतीच ती पण तीचे राहणीमान अगदीच नीट नेटके होते.तिचे राहणे अगदी ट्रेंडी होते. कुठलीही नवीन फॅशन आली की तिच्याकडे त्याच फॅशनचे कपडे, पर्स आणि चप्पल सगळ्यात पहिले असायचं.अगदीच लेटेस्ट फॅशनचं.रुपालीला स्वतःच्या सोन्दार्याचा अभिमान होता. जितकी दिसायला ती सुंदर होती तितकीच ती मनाने पण खूप छान होती.कधीच कुणाचे मन ती दुखवायचे नाही.सगळ्यांना तत्परतेने मदत करायची.रुपाली सर्वगुणसंपन्न असल्याने तिच्या आईवडिलांना देखील तीचा खूप अभिमान होता.

रुपालीचे एक स्वप्न होते शहरातील ब्युटी कॉन्टेस्ट जिंकण्याचे.त्यासाठी आता ती प्रयत्न करू लागली.रोज सकस आहार घेऊ लागली.स्पर्धेच्या अटी व नियमुनासार असलेल्या राऊंडचा आणि टास्क चा अभ्यास करू लागली. तिने नुकतेच वयाचे अठरा वर्ष पूर्ण केले होते.त्यामुळे ती अर्ज भरण्यासाठी पात्र झाली होती.रुपालीच्या आईवडलांनाही रुपाली काहीतरी वेगळे करेल याची खात्री होती म्हणून ते तिला सपोर्ट करत होते.

रुपाली ने स्पर्धेसाठी अर्ज केला.आणि अगदी त्यात समरस होऊन ती तयारीला लागली.सकाळी पाच वाजता उठण्यापासून तीचा दिनक्रम सुरु होत असे. नंतर व्यायाम आणि सकस आहार याकडे ती खूप लक्ष देत होती. ताठ मानेने जिमला जायची,  ब्युटी कॉन्टेस्टच्या सरावाच्या क्लासला पण ती जात असे.रुपाली सगळीकडेच हसून खेळून रहात असे. तिच्या अश्याच मोकळ्या वागण्याचा गैरअर्थ तिच्या क्लास मधील अजय ने काढला.तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला.

एक दिवस अजय ने रुपालीला प्रपोज केलं. पण रुपालीच्या मनात अजय बद्दल एक सहकारी मित्र इतकंच होतं.तिने त्याला स्पष्ट नकार दिला.अजयला मात्र रुपालीचा नकार म्हणजे  अपमान वाटला. त्याने त्या अपमानाचा बदला म्हणून संधी साधून रुपालीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले.त्या हल्ल्याने रुपाली एकदम बेशुद्ध झाली.

हा हल्ला केल्यावर अजय स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला होता.

हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्यावर तिला कळाले की आपल्या चेहऱ्याची एक बाजू खूप जळाली आहे.रुपालीच्या स्वप्नाची सगळी राखरांगोळी झाली होती.तिने खूप मेहनत घेतली होती आणि ती सगळी वाया जाणार होती.ब्युटी कॉन्टेस्ट अगदीच आठ दिवसावर येऊन ठेपली होती.पण आता ती हॉस्पिटल मध्ये किती दिवस राहणार हे देखील तिला माहिती नव्हते.

उपचार चालूच होते रोज ड्रेसिंग करावी लागत होती फरक इतकाच की रुपाली आता घरी होती.रोज सरावाच्या आठवणीने ती धाय मोकलून रडायची.देवाला म्हणायची की मी काय पाप केलं? माझ्यासोबत का असं झालं?

बसल्या बसल्या रुपालीची नजर घरी असलेल्या एका फॅशन मॅगझीन कडे गेली.ती ते चाळत असताना खास ऍसिड हल्ला झालेल्या मुलींसाठी एक लंडनला स्पर्धा होणार आहे असे तिला समजले व त्यासाठी भारतातून एक स्पर्धक पाठवायचा आहे.हे तिला कळाले.तिने वेळ न दवडता त्यांचा फोन नंबर फिरवला आणि भारताकडून लंडनला जाण्यासाठी तिने अर्ज केला.त्या स्पर्धेसाठी तीथे दिसण्यापेक्षा तुमचे नॉलेज किती हे आधी बघितले गेले.त्या नंतर तुमचे वागणे बोलणे सगळेच राऊंड झाले.ते करत असताना रुपालीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच सकारात्मक तेज होतेआणि सगळ्या राऊंड मध्ये रुपाली प्रथम आली.

अनुभवाने रुपाली म्हणत होती माझे सोंदर्य हे फक्त  माझ्या चेहऱ्यात नाही, तर माझ्या वागण्या बोलण्यात आणि नॉलेजवर आवलंबून आहे. तसेच सगळ्या स्त्रिया खूप सुंदर असतात पण आपले सोंदर्य कशात आहे हे जाणून घेता आले पाहीजे.

रुपाली आता लंडन मध्ये होणाऱ्या ब्युटी कॉन्टेस्ट साठी भारताला रेप्रेझेन्ट करणार होती.

लेख आवडल्यास like करा, share करायचा असल्यास नावासहित share करा

©® डॉ सुजाता कुटे

 

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा