#तेथे कर माझे जुळती

Written by

सौ.लता जुगल राठी

#तेथे कर माझे जुळती🙏

अविनाशला लहानपणापासून समाजसेवेच खूप वेड….
तो इंजिनिर झाला, पण नोकरी न करता काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटायचं…..घरी खूप शेती-वाडी, संत्र्याचे बगीचे , नोकर-चाकर, ट्रॅक्टर, गडी-माणस असा राबता वाडाचं होता त्यांचा.
नोकरी करन गरजेचं नव्हतं त्याला.
एक दिवस तो त्याच्या बाबांना म्हणाला,” बाबा , जगात रोज किती अश्या घटना घडतात, रोज अपघात होतात, कित्ती तरी मुलं अनाथ होत असतील, हो ना?
बाबा- हो रे बाळा, हे खरंय रे,
अवि- बाबा, एक माझ्या मनातलं सांगू का!
बाबा- सांग ना बेटा, मी कधी अडवलंय का तुला?
अवि- बाबा मला ना, अश्या अनाथ मुलांचा आधार बनायचं.
बाबा- बेटा इतकं सोपं नाही ते काम….
तो विषय इथेच संपला….
आठ दिवसानंतरची गोष्ट….
रोज सकाळी उठल्यानंतर फिरायला जाणे, ही अवीची सवय, ठरल्याप्रमाणे तो आजही गेला, पुढल्या चौकातून जात असताना एका छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला, त्याने कानोसा घेतला, कुठून आवाज येतोय म्हणून….
बाजूच्या झुडपात एका कापडात एक नवजात शिशु गुंडाळून ठेवलेलं होत, त्याने आजूबाजूला बघितलं, त्या बाळाचे पालक कुठे दिसतात काय ते….
पण दुर्दैव…..मुलगी जन्माला आली म्हणून टाकून दिल होत तिला😢
किती कठोर मन असेल त्या मातेचं, एक स्त्री असून ती असं कसं करू शकते…
अवि ने तिला आपल्या घरी आणलं, त्याच्या आईने तिला न्हाऊ घातलं, दूध पाजलं….भुकेली पोर ती दूध पिऊन झोपी गेलीं.
पोलीस स्टेशन ला कॅम्पलेंट केली होतीच, कुणी तरी येईल घ्यायला म्हणून तो वाट बघत होता…..
पण एक महिना झाला तरी कुणीच आलं नाही….
हे मात्र नक्की कळलं की मुलगी झाली म्हणून, किंवा वासनेतून निर्माण झालेल एका निष्पाप जीवाचा बळी घेण्याचा तो प्रयत्न होता….
पण म्हणतात ना ,” देव तारी त्याला कोण मारी”😊
अवि लाडाने तिला “परी” म्हणायचा.
इथून त्याची सुरवात झाली होती,कदाचित अनाथांचा नाथ बनण्यासाठीच त्याचा जन्म झाला असावा….
आता तर त्याने रस्त्यावरच्या अनाथ मुलांनाही घरी आणलं, आता बरिच मुलं, मुली जमली होती. तिथेच तो त्यांना त्यांच्या अनुरूप काम शिकवायचा, जेनेकरून ती इथून बाहेर पडल्यावर काहीतरी उद्योगधंदा करू शकेल…
त्याची सुरवात जिथून झाली ती “परी”आज पाच वर्षाची झाली होती….
————————————-
आज अवि आपल्या कार्याचा पाचवा वाढदिवस म्हणून
मुलांना घेऊन बाबा आमटेंच्या “आनंदवनात” आला होता. मुलं खूप खुश होती, कारण तिथे त्यांच्यासारखीच बरीच मुलं होती. त्यांच्या आधीच तिथे आणखी एक ट्रिप आली होती… माधवी…..तीच नावं ,ती मूक-बधिर विद्यालयात
शिक्षिका होती, त्या मुलांना घेऊन ती आली होती.
अवि आणि माधव ची तिथेच वभेट झाली,बरेचदा ते फोनवर बोलायचे, दोघांचे विचार सुद्धा जुळायचे. ती अविकडे सुद्धा येऊन गेली,अवीच्या आईला सुध्दा ती आवडायची, पण दोघे मित्र म्हणून वावरत असत, पण मनातून मात्र, आपल्या अविसाठी ही मुलगी पत्नी म्हनून उत्तम असं त्यांना वाटायचं.
आजही माधवी अवि कडे आली, अवि कुठेतरी बाहेर गेलेला, हीच संधी साधून त्यांनी मधविला विचारलं, माधवी ,एक विचारू का ग!
राग तर नाहीं येणार ना…
माधवी- नाही हो काकू, विचारा ना!
राग कसला हो त्यात….
तुम्ही माझ्या आईसारख्या…
आई- ,””तुला अवि कसा वाटतो ग???
आवडतो तुला तो???
लग्न करशील त्याच्याशी???
एकदम इतके प्रश्न???
माधवी खूप गोंधळली….
तशी ती त्याच्यावर प्रेम करायला लागली होतीच, पण अवीच्या मनात काय आहे, हे नव्हतं माहीत …
माधवी- आई, हो आज मी तुम्हाला आईच म्हणेन…
मला ना, तुम्हाला काही सांगायचंय….हो, मला अवि आवडतो, पण मी तसा कधी विचार केलाच नाही हो….
कारण…कारण…..ती रडायला लागलीं….
मी सून नाही होऊ शकत हो तुमची!😢
आई- अवि तुला आवडतो ना….
मग , का नाही म्हणतेस?
माधवी- काकू, अहो मी अनाथ आहे, अनाथाश्रमात वाढलेली…
माझे आई बाबा कोण? मी कुठली…. माझी जात कुठली काहीच नाही माहीत हो मला…
जेव्हा समज आली तेव्हा कळलं, मी अनाथाश्रमात आहे म्हणून…
योग्य शिक्षण घेतलं, आणि आता मूक- बधिर विद्यालयात मुलांना शिकवते.
आणि ती रडायला लागली…
आई- अगं, रडतेस कशाला आम्ही आहोत ना! तू मघाशी आई म्हणालीस ना मला!
अवि हे सर्व दाराच्या आडून ऐकत होता…
आई बाबांच्या सहमतीने अवि आणि माधवी च लग्न अगदीं साध्या पद्धतीने झालं..
लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने मधविकडून एक वचन घेतलं…
माधवी ….मला एक वचन हवंय…पण मी तुला जबरदस्ती नाही करणार की ते वचन तू पाळायचंच…
माधवी- अरे, आधी, तुझं वचन तर सांग?
अवि-माधवी, अविणे तिचा हात आपल्या हातात घेतला, मला कळतंय, की लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला वाटतं आपण आई व्हावं….
पण मी तुझी ही इच्छा नाहीं पूर्ण करू शकणार….
कारण मला आपलं स्वतःच मुलं नकोय! आपलं प्रेम वाटलं जाऊ नये असं मला वाटतं!
तुला माझ्या भावना कळतायत ना!please मला समजून घे….
????…
मी माझा निर्णय सागीताला?
तू तुझा निर्णय सांग?
माधवी-अवि, खर सांगू, माझ्या पण मनात हेच होत रे….
मी अनाथ असून सुद्धा तू माझा स्वीकार केलास ..
अवि- तिच्या तोंडावर बोट ठेवून, परत अनाथ नाहीं म्हनायचं स्वतःला…
आणि त्याच रात्री त्यांनी एक निर्णय घेतला, आपल्याला स्वतःच मुलं नकोय, ही अनाथ मुलंच आपली स्वताची मूलं.
———————————
आज पंचवीस वर्षे झाली …
त्यांचा व्याप खूप वाढलाय.
💐💐💐💐💐💐
“मधुर-,कुंज”आज खूप सजलय ….
अहो , आज अवि- माधवी च्या लाडक्या “परी”च लग्न आहे…
आज त्यांनी कन्यादान केल.
———————————–आता ते आजी आजोबा झालेत, अनेक जावई आलेत, सून आल्या, नातवंडे आली…
त्याची त्यागाची मूर्ती पाहिली आणि नकळत माझे हात जोडले गेले🙏🙏
स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं काय काय करतात, पण…..
काही अशीही असतात
अविनाश-माधवी सारखी…
आणि नकळत माझ्या मनात आलं…”दिव्यत्वावची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती”
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लता जुगल राठी
अर्जुनी/मोर
गोंदिया
(आवडल्यास नक्कीच like, कंमेंट करा.
Share करा पण नावा सहित ही नम्र विनंती,🙏🌹😊)

प्रतिक्रिया व्यक्त करा