तेथे कर माझे जुळती

Written by

तेथे कर माझे जुळती

रेणुका तिचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. तिच्या आईवडिलांना ती लग्नाच्या आठ वर्षानी झाली होती. अगदी नवसाने झाली असे तिचे आई वडील बोलत असायचे. आई वडील एकदम देव भक्त होते. घरातले वातवरण देखील भक्तीमय असायचे. व्रत वैकल्य उपास वैगरे असे सर्व करायचे. पण रेणुका मात्र जस जशी मोठी होत गेली तस तशी ती मात्र एकदम उलट निघाली होती. देवावर श्रध्दा अजिबात नव्हती. तिला कितिही संगितले तरिही देवासमोर हात जोडण वैगरे ती काहीच करत नव्हती. सायन्स विषय तिचा आवडीचा होता. लहानपणी ती एकदा खुप आजारी पडलेली तिचा ताप उतरत नव्हता. डॉक्टरांनी खुप औषध केले. तिला हॉस्पिटल मध्ये भरती केले. तिथली डॉक्टर तिला खुप आवडू लागली. 15 दिवसांनंतर तिचा ताप उतरला. आईवडिल सगळ्या नी देवाचे आभार मानले. पण ही सांगायची डॉक्टर मुळेच मी बरी झाली. ती देवाला मानायला तयार नव्हती. पुढे जाऊन तिने सायन्स विषय घेतला. 12 वी नंतर रेणुका ने एमबीबीएस साठी प्रवेश घेतला. कॉलेज ला जाण्यासाठी आता ती रोज बस ने जाऊ लागली. कॉलेज सुटल्यावर रोज बस स्टॉप थांबायची. जिथे बस स्टॉप होता तिथे एक घर होते त्या घरात रोज समर्थांची बैठक चालू असायची. त्यात मनाचे श्लोक चालू असायचे त्याचा आवज तिला ऐकू येत होता. पण ही मात्र एकदम नस्तिक त्यामुळे तिने कधिच मन लाऊन ऐकले नाही. पण आवज मात्र कानावर पडत असे. एक दिवस तिची बस 15 मिनिटे लेट झाली. तेव्हा तिथे मनाचे श्लोक संपून छान दासबोध ग्रंथावर निरुपण सुरू झाले. सहज कानावर पडत असल्यामुळे ती ऐकत होती. आणि बस स्टॉप वर बसायला जागा नसल्यामुळे ती त्या घरच्या पायरीवर जाऊन बसत असे. आणि बस आली का निघुन जात असे. कधी कधी बस लेट आल्यामुळे तर कधी बस मध्ये गर्दी असल्यामुळे तिला लेट होत असे. आणि तिला तेवढा वेळ बैठकी मधले निरूपण श्रवण करायला मिळत असे. ते ही ती निव्वळ वेळ घालवण्या साठी ऐकत असे. तेव्हापासून तिच्या आयुष्यात एक चांगली सकारात्म उर्जा निर्माण झाली होती. हे तिला मधे मधे जाणवत असायचे. पण देवावर श्रध्दा मात्र अजुनही नव्हती. अशीच वर्षे संपली आणि आता ती स्वत: एक स्रीरोगतज्ञ झाली. तिला अजुनही हेच वाटायचे का डॉक्टर मुळेच सगळे बरे होतात देव वैगरे काहीच नसते. खरतर जेव्हा पासुन ती समर्थांच्या बैठकीच श्रवण करू लागली होती तेव्हापासून तिला अशा अनेक प्रचीती आल्या होत्या. पण तिचा अहंकार देव मानायलाच तयार नसायचा. आता तर काय ती स्वत:च डॉक्टर झाली होती. त्यामुळे ती पेशंटला ट्रिट करताना तिचा नेहमी एका वेगळा च तोरा असायचा. आज अशीच एक केस आली होती. पेशंटची दुसरी डिलिव्हरी होती. पहिली 6 वर्षाची मुलगी होती आणि आता दुसरी डिलीव्हरी होती. त्या पेशंटची नॉर्मल डिलीव्हरी झाली बाळ जरा मोठ असल्यामुळे (एपिज़ोटोमी) टाके जास्त आले होते. आणि रक्तस्राव ही जरा जास्त झाला होता. डिलिव्हरी होउन तास भर झाला असेल तरी त्या पेशंटचा रक्तस्राव मात्र थांबत नव्ह्ता. रक्त थांबवण्यासाठी सगळी इंजेक्शने दिली होती. पण काहीच परिणाम होत नव्ह्ता. शेवटी तिला ब्लड लावण्यात आले. कारण हिमोग्लोबींन कमी झाले होते. इथं रेणुका मात्र काळजीत पडली होती. तिला काही सुचत नव्हते आणि काही समजत नव्हते. कारण तिचा मते bleeding थांबायला पाहीजे होते कारण तशी सगळी इंजेक्शन दिली होती. पेशंट ची (uterus) गर्भ पिशवी आकुंचन होत नव्हती. जी नॉर्मली डिलिव्हरी नंतर आकुंचन होऊन रक्त थांबायला मदत करते पण ईथे तेच होत नव्हते त्यामुळे रक्तस्राव थांबत नव्ह्ता. 1 बॉटल blood लाऊन देखील काहीच फरक पडत नव्हता. म्हनुन 2 bottle रक्त लावण्यात आले. तरिही पेशंट ची परिस्थीतीत काही फरक पडत नव्ह्ता. उलट हळूहळू पेशंट च blood presure (b p ) कमी होत गेले. आता रेणुका घबरयला लागली होती एक डॉक्टर म्हणुन तिचे सगळे उपाय आज निरर्थक दिसत होते. कोणतेच medicine iffect करत नव्हते. बाहेर पेशंट चे सगळे नातेवाईक घाबरले होते. रेणुकाच्या जोडीला अजून 2 स्पेशालिस्ट डॉक्टर पेशंट ला ट्रिट करत होते. त्यानी बाहेर येउन सगळ्या नातेवाईकांना संगितले होते का देवाला प्रार्थना करा. तोच फक्त पेशंटला वाचवू शकतो. आणि त्यनिही रेणुका ला संगितले का तुम्ही ही देवा लाच प्रार्थना करा. पण ही मात्र एकदम नास्तिक होती. पण आता मात्र खुप घाबरुन गेली होती. आजपर्यंत डॉक्टर म्हणजेच देव वाटणारी तिला आज समजत होते का डॉक्टर चा हातात ही प्रयत्नांशिवाय काहीच नसते. पेशंट ची परिस्थिती अजून खालावते. Bp पण 80/60 होते. रेणुका बाहेर पेशंटचा नातेवाईकांना पेशंट ची परिस्थिती सांगायला बाहेर लेबर रुम मधून येते. सगळे नातेवाईक देवाची प्रार्थना करत असतात. पेशंटची 6 वर्षाची मुलगी पण तिथे असते. ती मुलगी अचानक रेणुका ला सांगते का,” डॉक्टर तुम्ही देवबाप्पा ला सांगा ना, माझ्या आईला लवकर बरें करायला. तुम्ही डॉक्टर आहेत ना देवबाप्पा तुमच नक्की ऐकेल.” छोट्या त्या मुलीचे ते शब्द ऐकुन ती एकदम स्तब्ध झाली. कारण त्या लहान मुलीला काय बोलवे ते मात्र रेणुका ला समजत नव्हते. तिला काही कळायचा आत ती मुलगी रेणुका चा हात धरुन जरा अंतरावर बाजुलाच असलेल्या देवाच्या मुर्ती जवळ आणून उभी करते. आज प्रथमच ती देवाच्या मुर्ती समोर उभी होती. ती लहान मुलगी रेणुका ला सांगते,” डॉक्टर हात जोडून ,डोळे बंद करुन माझ्या आई साठी प्रार्थना करा ना”. त्या निरागस मुलीची आई बरी होण्यासाठी असलेली धडपड तिला समजत होती. म्हणूनच कदचित देवाला न मानणारी ती आज चक्क त्या मुलिसाठी देवासमोर हात जोडून डोळे बंद करुन उभी होती.
आज प्रथमच ति तिचे हात जोडून देवासमोर उभी होती. डोळे बंद केल्यावर अचानक तिला मनाचे श्लोक आठवू लागले जे तिने बस स्टॉप असलेल्या बाजूचा घरात ऐकले होते. त्यामधला एक श्लोक अचानक तिला आठवला.
सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।
मना सज्जना सत्य शोधून पाहे ॥ अखंडीत भेटी रघूराजयोगू ।
मना सांडि रे मीपणाचा वियोगू ॥ ॥

तिला ही खुप अहंकार होता. आज तिला सत्याची प्रचीती येत होती. डॉक्टर चा वरती सुद्धा एक अशी शक्ती आहे जिचा हातात सर्व काही असते. तारण आणि मारण सर्व काही त्या एकाच देवाच्या हातात असते.कर्ता करविता तो एक परमेश्वर आहे या सत्याची तिला हळूहळू जाणीव होत होती. अचानक तिचात एक सकारात्म उर्जा देखील निर्माण झाली. आणि पहिल्यांदाच त्या पेशंटला पुर्ण बरे होण्यासाठी ती प्रार्थना करत होती. इतक्यात नर्स आली आणि रेणुका ला सांगायला लागली डॉक्टर पेशंट च bleeding control मध्ये आले. Bp देखील 110/70 म्हणजे नॉर्मल झाले. पेशंट चांगली शुदधी वर येते. लगेच रेणुका पेशंट जवळ जाते तिला चेक करते खरच रक्तस्राव थांबला होता. पेशंट ची परिस्थिती आता चांगली control मध्ये आली होती. रेणुका ला मात्र आता चांगलीच प्रचीती आली होती. पेशंटला आता तिचा नातेवाईकांना भेटायला दिले होते. पेशंट ची लहान मुलगी लगेच तिचा आईला बोलली का,”आई या डॉक्टर मावशी ने तुझ्यासाठी देवबाप्पा कडे प्रार्थना केली आणि देवबाप्पा ने ऐकल. तु लवकर बरी झाली”. हे ऐकुन खरच रेणुका विचार करायला लागली. आज तिला जाणवले होते का या जगात देव आहे. मनापासून आज तिने हे मान्य केले होते. तिला आज जाणवले

‘दवा के साथ साथ दुवा भी जरुरी होती है’

हो आज तिने मान्य केले होते. हॉस्पिटल मधल्या त्या देवाच्या मुर्ती समोर ती परत गेली आज मात्र एक विश्वास ,श्रध्दा मनात निर्माण झाली होती. डोळे बंद करुन मनापासून देवाचे माफी ,आभार सगळ काही हात जोडून करत होती.. .
आज तिचा अहंकार सगळ काहीबाजुला झाले होते. आज तिला खुप हलके आणि प्रसन्न वाटत होते. पेशंट medicine मुळे बरी होतात अशा भावनेच्या रेणुकाला आज पहिल्यादा जाणवले होते आणि मनापासून तिने देवासमोर हात जोडले होते. मनात तिला एक ओळ आठवली
” दिव्यत्वाची जेथे प्रचीती
तेथे कर माझे जुळती “.🙏🏻🙏🏻🙏🏻

सौ . राजेश्री पाटील..

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा