तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही …..(भाग १)

Written by

 

“काय म्हणालीस परत बोल“?…..काकुळतीला येऊन असहायतेने आशीष अर्पिताला तोच तो ….प्रश्न विचारत होता.

आरे! एकच प्रश्न सारखं विचारल्याने उत्तर बदलणार आहे का रे आशीष ? अर्पिता उत्तरादाखल बोल्ली

मला समजून घे ना प्लीज …. माझी मनाची परिस्थिती समजून घे….. आरे आपल्यात काहीच साम्य नाही….

“आपल्या दोघांच्या घरच्यांचे विचार खुप वेगळे आहेत ….राहणीमान वेगळं आहे…..आपल्यात खुपच मोठी तफावत आहे जी आपल्या ह्या प्रेमाचा गळा दाबत आहे …..आपल्या ह्या प्रेमाला कोणीच समजून घेत नाहीये बघ. आपल्या प्रेमाच्या विरोधातच आहेत सगळे …… अशावेळी काय करू मी तूच सांग?  आपलं हे नातं कसं टिकणार पुढे?  काहीच नाही होऊ शकत रे आपल्या ह्या प्रेमाच्या नात्याचं”….

“अग् शोना तू एवढी का टेन्स होतेस बाळा!  …..ये माझ्याजवळ, नको काळजी करूस म्हणत आशीष तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत होता पण काहीच न ऎकण्याच्या परिस्थितीत असणारी अर्पिता मात्र आशीषच्या मिठीपासून दूर पळत होती. अग् , आता आपण प्रेम केलय तर हा सगळा विरोध होणारच ना त्याची एवढी का काळजी करतेस तू”?  आता मला सांग?  कोणतीही गोष्ट समाजाने घालून दिलेल्या नियमाच्या विरूद्ध केली तर त्याबद्दल आपल्याला सगळे बोलणार हे आपण गृहीतच धरलं पाहिजे. मी सगळं काही छान करेन ग् शोना पण तू फक्त सोबत रहा,  मग बघ मी सगळ्या गोष्टीतून कसा चुटकीसरशी मार्ग काढतो. कशाला तू एवढा त्रास करून घेतेस ? …..अग् एक- दोनदा नाही म्हणाले म्हणून काय आपलं प्रेम आपण विसरून जायचं का? “थोडा तरी वेळ दे ना मला मी सगळंकाही निट करतो फक्त मला थोडासा वेळ दे प्लीज”! म्हणत आशीष परत काकुळतीला येऊन बोलत होता.

आरे कीती वेळ देऊ तुला? , तुला समजत का नाहीये आरे मुलगा शोधलाय घरच्यांनी माझ्यासाठी, कीती म्हणून मुलांना नकार देऊ मी ? तुला काहीच कसं कळत नाहीये,  “एक तर तू सेटल्ड नाहीयेस, इतक्यातच तुला जाॅब लागलाय आणि जम बसवायला कितीतरी दिवस जातील तोपर्यंत घरच्यांना मी कसं हँडल करू” …..आरे पाच वर्ष होत आली आपल्या प्रेमाला पण अजून कशातच काही नाही तुझं ……

अग् मी प्रयत्न करतोय ना ?  काॅलेजपासूनच मी छोटामोटा जाॅब करतोय हे तुला माहीत नाही का? काॅलेज संपून फक्त वर्ष होत आलय मला सेटल्ड व्हायला जरा तरी वेळ दे ना …..”मी करेन ना ग् सगळं निट पण तू अशी मला सोडून जाण्याची भाषा नको करूस ना बाळा” ..… आशीष आता पूर्ण रडकुंडीला आला होता.  अर्पिताला कशी समजूत घालावी हे त्याला कळतच नव्हतं.

कसं सांगू रे मी तुला?  म्हणत आता अर्पिताचे डोळेही भरून आले होते. मी समाजवतीये घरच्यांना पण ते काहीच समजून घेण्याच्या मनस्थीतीत नाहीये. मला पण तू हवा आहेस रे, पण आपल्यातली ही दरी खुप मोठी आहे. सगळंकाही आडवं येतय आपल्या प्रेमात ….एवढंच काय तर आपली ‘जात ‘ ही वेगळी आहे. आरे पप्पांना आपल्या प्रेमाचं समजलं आणि त्यांनी माझ्याशी बोलणंच टाकून दिलय. आई तर सरळ तोंड बघत पण नाही मला, म्हणते की,  “एवढं सगळं तुला दिल… लाडात वाढवलं अन् चांगले पांग फेडतीएस तू आमचे, एका दुस-या जातीच्या मुलाबरोबर लफडं करायला तुला लाज कशी वाटली नाही” ? आज समाजात तोंड काळं करायला निघालीस तू आमचं….. एवढं सांगून अर्पिता हमसाहमशी रडायला लागली .

आशीषने तीला मिठीत घेत कुरवाळायला सुरूवात केली. आणि म्हणाला फक्त ‘थोडेच दिवस शोना ‘ सगळंकाही छान होईल. मी परत तुझ्या घरी आपल्या लग्नाचं बोलतो,  मोठ्या भावाला पण गावावरून बोलवून घेतो म्हणजे तो पण बोलेल आणि आपल्याला मदत होईल. तुझे आई-वडील आता माझेही आई-वडील आहेत. मी त्यांना मनवायचा प्रयत्न करतो. पण तू आता शांत हो.

नाही रे आता वेळ हातातून निघून गेली आहे. माझ्याकडे आता हे सगळंकाही संपवण्याशीवाय पर्याय नाहीये. आईने आज मला शेवटचं विचारलय की, तुला आम्ही हवे आहोत का तुझा प्रियकर? ..

मग काय म्हणालीस तू शोना? …. म्हणाली नाहीस का की, मला तुम्ही दोघेही हवे आहात प्लीज मला समजून घ्या?

नाही ! अर्पिता म्हणाली, त्यांनी मला एकालाच निवडायला सांगितलय आणि अशावेळी मग त्यांना सोडून मी तुझा हात कसा धरू तूच सांग ना?त्यांनी मला लहानपणापासून एवढ्या लाडात वाढवलं, सगळंकाही दिलं आता त्यांना सोडून मी तुझ्याबरोबर कशी येऊ? घरच्यांशीवाय आपलं काय राहिल?  समाज काय म्हणेल …आपण एकट्याने आपला संसार तरी कसा उभा करणार ?…… खुप गोष्टी आहेत ज्याचा विचार सुद्धा आपण करु शकत नाही …..मला घरच्यांच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत येता येणार नाही हेच सांगायला मी आलीये तुला आणि आता आपली ही शेवटची भेट अाहे ….यानंतर तू मला परत भेटू नकोस … माझ्यामुळे माझ्या घरच्यांना झालेला त्रास मला चालणार नाही ….. आणि हो तुझ्याजवळचे माझे फोटोही डिलेट कर प्लीज ……. “तुझं माझ्यावर खुप प्रेम आहे हे मला माहीत आहे पण माझी मजबुरी समजून घेऊन तू मला यानंतर त्रास देणार नाहीस अशी अपेक्षा मी करते”.

अर्पिता भरभरून बोलत होती आणि बोलताना तिच्या डोळ्यांत आपण अाता तिच्यासाठी ‘परके’ झालो आहोत हे कळायला आशीषला जराही वेळ लागला नाही……तो आता पूर्ण हताश झाला होता. इतके दिवस ज्या प्रेमासाठी तो भरभरून जगत होता आता त्या सगळ्याच गोष्टींना काहीच अर्थ राहिला नव्हता. तो मटकन खाली बसला आणि म्हणाला …..”बरोबर बोल्लीस तू शोना …..घरच्यांना दुखावणार तरी कसं?  स्टेटस आला, समाजातले चार लोक काय म्हणतील आले , पाच वर्षात तुझ्यामाझ्यातली ही एवढी मोठी दरी तुला कधीच कशी दिसली नाही ग् ….आणि हो सगळ्यात मोठी ‘जात’ नाही का ? पण अफेअरच्या काळात मात्र तुला माझी ही वेगळी जात पण कधीच दिसली नाही “.  आपण सगळ्या गोष्टींना फेस करत आपला संसार थाटू म्हणायचीस तेंव्हा त्यात तुला तुझ्या घरच्यांचा विरोध कधीच दिसला नाही का? …..ह्या गोष्टी एकनाएक दिवस होणाऱ्याच होत्या पण तरी तू त्या गोष्टींचा बाऊ करत,  मला माहित असलेल्याच गोष्टी तू सांगतीएस …..आज तू घरच्यांसाठी मला सोडतीएस मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाहीये पण पाच वर्ष जिवापाड प्रेम करून मला सोडून जाताना तुला काहीच वाटत नाहीये का? ……इतके दिवस मी सगळंकाही निट करेन म्हणत असतानाही तुला माझ्यावर अजूनही विश्वास नाही तर मग आपलं नातं खरंच इथंच संपलेलं बरं……मला तू शेवटची भेटायला आलीस हेच माझ्यासाठी खुप आहे मग भले ते मला सांगायला का येईनास की, माझे फोटो डिलेट कर ….अग् तू मला ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची काहीच गरज नाही …. मला माझ्या प्रेमाचं पावित्र्य राखता येतं ….. आणि माझं प्रेम मी यापूर्वीही कधी बदनाम केलं नाही आणि यापुढेही कधी बदनाम करणार नाही ….   माझ्याकडून तू अगदी बिनधास्त रहा …. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी तुला खुप खुप शुभेच्छा …. काळजी घे ….म्हणत, आशीष उठला आणि मागे न बघता झपाझप चालायला लागला …. एव्हाना आभाळ भरून अालं होतं आणि पावसाच्या सरी कोसळायलाही सुरूवात झाली होती ….. पावसाच्या त्या सरींमधे आशीषचं मनही बेभान होऊन रडायला लागलं तो झपाझप चालत होता आणि त्याचं मनही तेवढ्याच दुपटीने रडायला लागलं होतं. त्याला राहून राहून हाच प्रश्न सतावत होता की, “ज्याला जिवापलीकडे एवढं जपावं, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकण्याइतकं प्रेम करावं तेच काळजातलं प्रेम आता बाहेर काढून जगायचं तरी कसं? ……जगायचं तरी कसं “…….कुठून तरी गाण्याचे बोल ऎकू येत होते ….

  • तेरे बिना ज़िन्दगी से कोई, शिकवा तो नहीं
  • शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं
  • तेरे बिना ज़िन्दगी भी लेकिन, ज़िन्दगी तो नहीं
  • ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं, ज़िन्दगी नहीं
  • तेरे बिना ज़िन्दगी से शिकवा तो नहीं

क्रमशः

©Sunita Choudhari. 

(मित्र-मैत्रीणींनो नमस्कार. प्रेम करताना जवळजवळ हाच सिन असतो ब-याच वेळा नाही का?  कधी आईवडिल मधे येतात तर कधी ‘जात’…..पण प्रेमात एकदा हार मिळाल्याने ‘आयुष्य ‘  तर संपत नाही ना?  त्रास होतच असतो म्हणून कधीकधी प्रेमी युगुल सगळं संपवण्याच्या नादात हे विसरतात की , आयुष्य फक्त एका, प्रेमासाठीच बनलेलं नसतं प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा असतात आणि त्यातूनच हे जग अधीक सुंदर बनतं नाही का?  आशीष ने काय केलं असावं?  त्याने आयुष्य संपवण्याचा तर निर्णय घेतला नसेल ना?  नक्की वाचा आपल्या पुढच्या आणि शेवटच्या भागात …..)

 

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा