तेरे माही जैसा कोई हार्डीच नहीं हैं

Written by

अनेक मात्तबर माणसांना मैदाने गाजवताना TV वर पाहिले… शेंबुड पुसायच्या वयात TV समोर चिटकून बसायचो… असा एक एक क्षण भारी वाटायचा… ब्लॅक अँड व्हाईट TV , त्यात दूरदर्शन वर दिसणारे सामने कमी , जोडीला भारनियमन पण होतंच…त्यामुळे जोही क्षण मिळेल त्याचा सोनं करावाच लागायचा … हायलाईट्स नावाचा प्रकार अस्तित्वात नव्हता… जन्माच्या आधीपासून खेळणारे खेळाडू पाहिलं कि मन असं तृप्त होऊन जायचं…हळूहळू कलर TV सर्वांकडे येऊ लागल्यात… संघामध्ये असलेल्या बऱ्याच लोकांची नावं माहिती असायची.. पण नवीन खेळाडू त्याला अपवाद होते … (त्यांची नावं माहिती असायला त्या काळात IPL आणि देशांतर्गत स्पर्धेला ग्लॅमर नव्हतं)… अश्या त्या अनोळखी नावांमध्ये तो देखील आला…२००४ च्या सुमारास पदार्पण झालं…अनेक खेळाडूंची होते तशीच याचीही अवस्था डगमळीत झाली … पण पाकिस्तान विरुद्धचा तो सामना आला आणि माझ (माझ्यासहित अनेकांचं ) जग हललं… एकतर अनोळखी नाव , त्यात गावठी वाटणारा खेळाडू त्यापेक्षा जास्त म्हणजे पाकिस्तान ची वाट लावली याचा आनंद…. सगळं कसं जुळून आल होता…स्वप्नवत … शतकं पहिली नव्हती अश्यातला काही भाग नाही पण अस धुलाई करून होणारी शतकं खूप कमी होती… षटकार काही वेगळ्या पद्धतीने मारले जाऊ शकतात हे हि कळलं… त्यातल्या त्यात बॅट च्या साहाय्याने बंदुकीतून गोळी सुटण्याची ऍक्शन… या पेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही…. तेव्हा माझ्या कर्कश आवाजामध्ये गावभर ” धोनी ने धो डाला ” अशी दवंडी देण्याचा प्रसंग असूनही तसाच्या तास डोळ्यासमोर उभा राहतो…नंतर पुन्हा टेस्ट मध्ये १४८ ची खेळी झाली… जोडीला लंकेविरुद्ध १८३ करून पुन्हा बरसला…. नंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे… हा खेळाडू आवडता खेळाडू आहे वैगेरे वैगेरे मी अजिबात म्हणणार नाही… पण लहानपणापासून आतापर्यंत त्याचा खेळ बघता बघता कधी तो एक अविभाज्य भाग झाला हे कळलंच नाही… एक फीलिंग , इमोशन असा काहीतरी असता ना तोच हा प्रकार … एखाद्या खेळाडूची संपूर्ण कारकीर्द याची देही याच डोळा पाहिली कि अश्या भावनाप्रधान गोष्टी सुचतात … दरम्यान च्या काळात अनेक आरोप झाले… त्यात खरं काय खोटं काय याच्या खोलात जाण्यात काही अर्थच नाही… मागे वळून बघताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गांगुलीने जर संघाला लढायला शिकवलं असेल तर धोनीने संघाला जिंकायला शिकवलं..(दोघांची तुलना मी अजिबात करत नाहीये )…कारकीर्दीच्या अखेरीच्या टप्प्यात तो उभा आहे… कधी तो मैदान सोडेल हे केवळ त्यालाच माहिती आहे… धक्कातंत्र हा त्याचा स्वभावच आहे म्हणा… येणाऱ्या काळात भारताला एक चांगला कर्णधार मिळेल (मिळाला आहेच म्हणा ) , एका दर्जेदार किपर-बॅट्समन मिळेल…प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच… पण ज्या प्रकारे आमचं बालपण आणि आतापर्यँतचं तारुण्य धोनी ने समृद्ध केलं आहे त्या गोष्टीची सर कधीच येणार नाही… म्हणून तो जरा हटके वाटतो…हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल… त्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा…धोनीचा उत्तरार्थ अजून बहारदार असेल हीच अपेक्षा …

Article Tags:
· · · ·
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत