ते चार लोक

Written by

ते चार लोक काय म्हणतील??

कोण ते चार लोक

आजपर्यंत कळले नाही

कधी नजरेस पडलेही नाही

माझ्या जगण्याच्या सीमा

ते का ठरवतील

आज पर्यंत उमजले नाही

जगावं आपल्या तत्वांवर,आपल्या अटींवर

हसावं आपल्या आनंदात

रडावं आपल्या दुःखात

का घुसमटवावं जीवाला

चार लोकांच्या बोलण्यावर

आपणच झेलायची असतात आपली संकट

आपणच सावरायची असतात आपली वादळं

का अश्रू गाळावे

चार लोकांच्या टिकांवर

घ्यावी भरारी उंच उडून स्वपंखांवर

मनमौजी होऊन प्रेम करावं स्वतःवर

खुशाल जगावं स्वच्छंदी

सोडून त्या चार लोकांचा विचार

        ©सरिता सावंत भोसले

 

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.