तोच दिवस नी तीच रात्र…🦋

Written by

तोच दिवस नी तीच रात्र
नवीन असे काहीच नाही…
तुटलेल्या स्वप्नांना
कुणी सावरणार नाही..
कंटाळा येतो कधी कधी
उबगलेल्या जीवनाचा…
पण समजून घेणारं सुध्दा कुणी नाही…
चार भिंती पलिकडेही जग आहे..
हे कुणाला सांगण्याच धाडसही नाही..
मन आसुसलय मोकळा श्वास घ्यायला..
पण..कुणाला पटवून
देण्याची आता हिंमतही नाही..
हिंमतही नाही..
हिंमतही नाही…😒

चार भिंतींच्या आत बंदिस्त असणाऱ्या प्रत्येक गृहिणीला समर्पित..

सौ.योगिता विजय टवलारे ✍️

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत