तो.. तिचा ‘तो ‘

Written by

‘तो’.. कसा..?
तो.. म्हणजे..’तिचा तो’… कसा आहे…?
जसा आहे तसा.. पण तो तिचा आहे…
जास्त काही लिस्ट वगैरे नव्हती… पण बस त्याला बघितलं कि मनात क्लिक झालं पाहजे ही अट होती… मग नंतर च बघता येईल..
जेंव्हा तो आला समोर आला आणि नजरभेट होताक्षणी च ती त्याच्या प्रेमात पडली . त्याची ती बेधडक नजर… आत्मविश्वास… रोख ठोक बोलणं.. मनावर ठसे उमटवत होत..
तेंव्हा तिला वाटलं हाच तो… त्याचा बोलणं फारसे आवडण्यासारखं नव्हतं.. पण त्याचा आवाज मनाला भिडत होता… तो बिन्दास्त नजरेला नजर देऊन स्पष्ट निखळ बोलत होता… त्याचे प्रश्न चुकीचे hote…पण त्याच्या प्रश्नामध्ये प्रामाणिकपणा होता. त्याचा प्रामाणिक पणा च तिला जास्त आवडला होता..
तो तिला आवडला अगदी मनापासून आणि त्याच्या नजरेतून हे पण स्पष्ट झालं कि त्यालापण ती आवडलीय… दोघांना अजून बोलायचं होत भेटायचं होत.. पण वेळ संपलेली होती…
तो हवा होता तिला आणि त्याला पण ती हवी होती… अडचणींना सामोरं जाऊन दोघे लग्नाच्या गाठी मध्ये बांधले गेले..
दोघे एक झाले.. संसार चालू झाला… ती त्याच्यवर तशीच प्रेम करत होती.. त्याला समजून घेत होती.. त्याला साथ देत होती प्रत्येक परिस्तिथी मध्ये.. तो पण सदैव तिला जपत होता.. तिला समजून घेत होता.. दोघात मतभेद होते पण कोणी अडून बसत नव्हतं.. त्याच्या साठी ती ने स्वत्व पूर्णपणे समर्पण केल होत… ती जगतच होती त्याच्यासाठी..
तो रागीट आहे.. अबोल आहे.. व्यक्त नाही होता येत.. मनातलं सगळं बोलून नाही दाखवता येत.. ती समजून घेत होती… ती मात्र त्याच्या विरुद्ध बडबड करणारी.. मनात काही न ठेवणारी… खळखळून वाहणारी…. तो मात्र दगड…
बरेच प्रसंग वाईट आले दोघांनी साथ नाही सोडली…
बऱयाच वेळेला त्याने तिचा हात सोडला… ती मात्र ठाम आहे त्याच्यासोबत कारण तिला जाणीव आहे कि ती नसेल तर तो विखुरला जाईल… त्याला समजून घेते.. त्याच्या सुखासाठी धडपडते… तो मात्र निराळ्यचा जगातला प्रवासी…
ती मात्र त्याची सोबती… सतत त्याच्या सोबत असणारी…
तो एक साथीदार म्हणून कधी कधी हरतो.. कारण त्याला बाकीच्या नात्या मध्ये जिंकायचं असत… ती मात्र स्वतःला सतत त्याच्यासाठी हरवत राहते… आणि तो मात्र नेहमी जिंकतो….
तो तिचा आहे… ती नाही तर तो पण उरणार नाही याची जाणीव आहे तीला.
स्वतःसाठी कधीच जगला नाही तो… आणि ती त्याचाच आत्मा आहे म्हणून तिच्यासाठी पण त्याला जगता नाही येत त्याला.. . ती मात्र फक्त त्याच्यासाठी जगते… कदाचित म्हणूनच देवाने तिला आणि त्याला ‘एक’केल…
तो आहे येडा.. pn तो तिचा आहे…
तो आहे कठोर.. पण तो तिचा आहे..
तो कठोर… ती खंबीर…
तो अबोल.. ती बोलकी..
तो स्तब्ध.. ती सतत वाहणारी…
तो शांत… ती चंचल…
तो पर्वत… ती त्यातून वाहणारी नदी..
तो समुद्र…. ती त्यातच स्वतःच अस्तित्व संपवणारी नदी….
तो…. माझा तो ..

सौ प्रिया महेश पुरी.

'तो'.. कसा..? तो.. म्हणजे..'तिचा तो'... कसा आहे...? जसा आहे तसा.. पण तो तिचा आहे... जास्त काही लिस्ट वगैरे नव्हती... पण बस त्याला बघितलं कि मनात क्लिक झालं पाहजे ही अट होती... मग नंतर च बघता येईल.. जेंव्हा तो आला समोर आला आणि नजरभेट होताक्षणी च ती त्याच्या प्रेमात पडली . त्याची ती बेधडक नजर... आत्मविश्वास... रोख ठोक बोलणं.. मनावर ठसे उमटवत होत.. तेंव्हा तिला वाटलं हाच तो... त्याचा बोलणं फारसे आवडण्यासारखं नव्हतं.. पण त्याचा आवाज मनाला भिडत होता... तो बिन्दास्त नजरेला नजर देऊन स्पष्ट निखळ बोलत होता... त्याचे प्रश्न चुकीचे hote...पण त्याच्या प्रश्नामध्ये प्रामाणिकपणा होता. त्याचा प्रामाणिक पणा च तिला जास्त आवडला होता.. तो तिला आवडला अगदी मनापासून आणि त्याच्या नजरेतून हे पण स्पष्ट झालं कि त्यालापण ती आवडलीय... दोघांना अजून बोलायचं होत भेटायचं होत.. पण वेळ संपलेली होती... तो हवा होता तिला आणि त्याला पण ती हवी होती... अडचणींना सामोरं जाऊन दोघे लग्नाच्या गाठी मध्ये बांधले गेले.. दोघे एक झाले.. संसार चालू झाला... ती त्याच्यवर तशीच प्रेम करत होती.. त्याला समजून घेत होती.. त्याला साथ देत होती प्रत्येक परिस्तिथी मध्ये.. तो पण सदैव तिला जपत होता.. तिला समजून घेत होता.. दोघात मतभेद होते पण कोणी अडून बसत नव्हतं.. त्याच्या साठी ती ने स्वत्व पूर्णपणे समर्पण केल होत... ती जगतच होती त्याच्यासाठी.. तो रागीट आहे.. अबोल आहे.. व्यक्त नाही होता येत.. मनातलं सगळं बोलून नाही दाखवता येत.. ती समजून घेत होती... ती मात्र त्याच्या विरुद्ध बडबड करणारी.. मनात काही न ठेवणारी... खळखळून वाहणारी.... तो मात्र दगड... बरेच प्रसंग वाईट आले दोघांनी साथ नाही सोडली... बऱयाच वेळेला त्याने तिचा हात सोडला... ती मात्र ठाम आहे त्याच्यासोबत कारण तिला जाणीव आहे कि ती नसेल तर तो विखुरला जाईल... त्याला समजून घेते.. त्याच्या सुखासाठी धडपडते... तो मात्र निराळ्यचा जगातला प्रवासी... ती मात्र त्याची सोबती... सतत त्याच्या सोबत असणारी... तो एक साथीदार म्हणून कधी कधी हरतो.. कारण त्याला बाकीच्या नात्या मध्ये जिंकायचं असत... ती मात्र स्वतःला सतत त्याच्यासाठी हरवत राहते... आणि तो मात्र नेहमी जिंकतो.... तो तिचा आहे... ती नाही तर तो पण उरणार नाही याची जाणीव आहे तीला. स्वतःसाठी कधीच जगला नाही तो... आणि ती त्याचाच आत्मा आहे म्हणून तिच्यासाठी पण त्याला जगता नाही येत त्याला.. . ती मात्र फक्त त्याच्यासाठी जगते... कदाचित म्हणूनच देवाने तिला आणि त्याला 'एक'केल... तो आहे येडा.. pn तो तिचा आहे... तो आहे कठोर.. पण तो तिचा आहे.. तो कठोर... ती खंबीर... तो अबोल.. ती बोलकी.. तो स्तब्ध.. ती सतत वाहणारी... तो शांत... ती चंचल... तो पर्वत... ती त्यातून वाहणारी नदी.. तो समुद्र.... ती त्यातच स्वतःच अस्तित्व संपवणारी नदी.... तो.... माझा तो .. सौ प्रिया महेश पुरी.

User Rating: Be the first one !
0
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.