तो

Written by

तो येतोच सोबत तुझ्या आठवणींना घेऊन

मग मन मात्र थाऱ्यावर राहत नाही

हास्याची बहर आसवांची लहर

दोन्हींचा मिलाप काही थांबत  नाही

तो येतो सोबत तुला मला चिंब भिजवतो

जवळ नसू तरी दुराव्यात आपण बिलगतो

बेभान झालेलं मन आणि तुझ्यावर खिळलेले

नयन काही आवरता आवरत नाही

तो येतो मातीचा सुगंध घेऊन

सोबत तुझा सहवास पांघरून

वेडावलेला जीव गुंतल्याशिवाय मात्र राहत नाही

दाटून आलेल्या भावना आणि अनामिक ओढ

बरसल्याशिवाय काही राहत नाही.

 

 

 

 

 

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा