त्यांच्याही जीवनाला उद्देश आहेच!!!

Written by

एकदा बसमधून प्रवास करत होते..अचानक बससमोर काही तृतीयपंथी आडवे आले..त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने टाळ्या वाजवत बसमधे शिरले आणि पैसे मागू लागले..सगळ्यांच्या किळसवाण्या नजरा झेलत ते पुढे पुढे सरकत होते, काही लोक भीतीने पैसे देत होते तर काही लोक हिनवत होते. “यांना काय मेल्याना आयतं जगायचं असतं, काही ध्येय नाही काही उपयोग नाही जीवनाचा,बस अडवून ठेवलीये उगाच..धरतीला ओझं”एक बाई मागून बोलल्या.त्यातला एक तृतीयपंथी म्हणाला”अम्मा तुझी मेरी भी उमर लगे,खुश रह”आणि ते उतरून गेले. थोडं पुढे जाऊन बघते तर ट्रॅफिक जाम, चौकशी करता समजले पुढे पूल वाहून गेलाय आणि त्यासोबत भरलेली बस सुद्धा..मी अम्माकडे वळून म्हंटल..”त्यांच्याही जीवनाचा काहीतरी उद्देश आहेच अम्मा!!!! “

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा