त्याग भाग (१ ते ५)

Written by

भाग १

 

अनिकेत बस  स्टॉप वर उभा होता त्याच  ऑफिस सुटायल आणखीन वेळ होता पन त्याला ऑफिस च्या कामा निमित्त एके ठिकाणी जायचे होते. म्हणून तो बस स्टॉप  वर आला होता. पन तो मनगटावरील घड्याळात सारख- सारख पाहत होता आणि रस्त्याकड पाहत उभा होता. कदाचित तो कोणाची तरी वाट पाहत असावा. तेवढ्यात बस आली आणि तो बस मध्ये चढणार एवढ्यात मागून कोणी तरी त्याला आवाज दिला.

 

” अनिकेत अरे थांब”

 

अनिकेत ने मागे वळून पाहिले ती अविका होती जीची अनिकेत इतका वेळ वाट पाहत होता तीच ती . अनिकेत थोडा नाराजीनेच तीला पाहत तसाच उभा राहिला आता अविका त्याच्या जवळ आली होती आणि ती बोलू लागली,

 

” sorry अनिकेत मला यायला उशीर झाला पन काय करनार आज काम खूप होते ऑफिस  मध्ये आणि ते टाळता ही येणे शक्य नव्हते I am sorry ”

 

आता अनिकेत थोडा नाराजीच्या सूरातच बोलू लागला,

 

” काय करनार तुलाच काम असतात, ऑफिस  असते मी काय रिकामटेकडा मला कुठे काम असतात.”

 

अनिकेत च्या अशा बोलन्याने अविकाचा गोरा चेहरा पार उतरला व ती बोलू लागली.

 

“sorry म्हणाले ना मी किती कुचक बोलशील आणि आता भांडनार आहेस का तू ? मला सांग भांडनार असशील तर मी निघते .”

 

अविकाच्या अशा बोलण्याने अनिकेत थोडा वरमला आणि घड्याळ पाहून तीला म्हणाला,

 

” थांब तुझ नेहमीचेच आहे हे ; मला ऑफिसच्या कामा निमित्त एके ठिकाणी जायचाय पन अजून आर्धा तास आहे आपन समोर coffee shop तेथे जावून बोलू चल , ” तशी अविका ची कळी खुलली आणि तीने नुसती मान हलवून होकार दर्शवला आणि त्याचा हात हातात घेउन ती आणि अनिकेत coffee shop कडे निघाले तेथे गेल्यावर अनिकेत ने दोन coffee order केल्या आणि ते गप्पा मारत coffee घेऊन निघाले . अनिकेत ने घड्याळ पाहिले आणि अविका ला बस स्टॉप वर सोडले आणि तो बस ने त्याच्या कामासाठी निघाला अविका ने बस ची वाट न पाहता रिक्षा ने घरी गेली.

 

ईकडे अनिकेत बस मध्ये बसला आणि त्याचे विचार चक्र सुरू झाले तो दोन वर्षे माग गेला. त्याला सगळे आठवू लागले.

 

अनिकेत आणि अविका ची भेट अशीच एका बस मध्ये झाली होती. बस मध्ये खूप गर्दी होती आणि दोघे ही बसण्यासाठी जागा शोधत होते. दोघांची ही नजर एकाच रिकाम्या सीटकडे गेली आणि दोघे ही एकदाच त्या सीटकडे धावले पन तेथे कोण बसनार ह्या कारणावरून दोघांन मध्ये भांडण लागले. अनिकेत म्हणाला , ” मी आधी सीट पाहिली म्हणून मीच सीटवर बसणार”

 

अविका ,” पन मी पहिल्यांदा सीटपाशी आले ही सीट माझी आहे”

 

यातच दोघांचा वाद लागला आणि तेव्हढ्यात एक आजी येवून सीटवर बसल्या मग काय दोघांना ही आपला प्रवास उभ राहूनच करावा लागला.

 

अविका पंचवीशीतली तरुणी होती आणि अनिकेत आठ्ठवीस वर्षांचा होता तेव्हा

 

दोघांच्या ही ऑफिस ची वेळ एकच होती आणि ते दोघे एकाच बस ने जात असत . भांडनानी झालेली ओळख मैत्रीत कधी बदलली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही कळले नाही आणि आता ते दोघे दोन वर्षांपासून रिलेशनशिप मधे होते.

 

ईतक्यात कंडक्टर ने  बेल वाजवली आणि अनिकेत तंद्रीतून जागा झाला . त्याचा स्टॉप  आला होता तो बस मधून स्वतःशीच हसत बाहेर पडला.

 

अविका दिसायला सालस होती . गोरीपान केसांचा स्टेप कट आणि गोल चेहर्याची ,गुंडगुळ्या आंगाची थोडी स्थूल तरी ती स्थूलता तीला शोभून दिसायची. अनिकेत सावळ्या रंगाचा नाकी -डोळे नीटस उंचापुरा चरचौघात उठून दिसनारा तरुण होता. अविका उच्च मध्यम वर्गीय घरातली होती. तीच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि ती स्वतः आता चांगले कमावत होती घरात तीचे आई -बाबा व एक भाऊ होता. तोही एका कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर होता. बाबा रिटायर्ड ऑफिसर  एकूण काय तीला कोणत्याही गोष्टी ची  कमी नव्हती ती सूखवस्तू कुटूंबातली मुलगी होती.

 

अनिकेत ची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती त्याला चार बहीनी व तो एकटाच मुलगा होता . वडील शेती करत चार ही बहीनींची लग्न झालेली . अनिकेत इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी निमित्त नागपूरला आला होता. त्याला चांगला job मिळाला होता .त्याला नागपूरात येउन चार वर्षे झाली होती. आता तो नागपूर ला चांगला स्थिरावला होता . तो त्याच्या आई -बाबांना नागपूरात घेउन येण्याचा व अविकाशी लग्न करण्याच्या विचारात होता.

 

अनिकेत आणि अविकाची अशी धावती भेट आठोड्यातून चार – पाच वेळा ठरलेली असायची. रविवारी मात्र ते दोघे मिळून फिरायला जायचे.

 

एकूण काय अविका आणि अनिकेतच्या आयुष्यात सगळ अलबेल होत .त्यांचे छान चालले होते पन नियतीच्या मनात काही वेगळच होते…………

 

(क्रमशः)

 

 

 

 

 

भाग२

 

अन्विकाच्या आई बाबांनी आता अन्विका साठी स्थळे पाहूयच ठरवलं आणि त्यांनी त्यांचा निर्णय अन्विका ला ऑफिस मधून गेल्या गेल्या सांगितलं.

 

 

 

अन्विका चे बाबा ,”अन्विका आम्ही दोघांनी तुझ्या लग्नासाठी स्थळें पहायचे ठरवले आहे . असं ही तू आता अठ्ठावीस वर्षांची झालीस .खर तर हा निर्णhttps://www.swamini85.tk/2019/12/blog-post.html

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.