त्याग भाग 2

Written by

अन्विकाच्या आई बाबांनी आता अन्विका साठी स्थळे पाहूयच ठरवलं आणि त्यांनी त्यांचा निर्णय अन्विका ला ऑफिस मधून गेल्या गेल्या सांगितलं.

अन्विका चे बाबा ,”अन्विका आम्ही दोघांनी तुझ्या लग्नासाठी स्थळें पहायचे ठरवले आहे . असं ही तू आता अठ्ठावीस वर्षांची झालीस .खर तर हा निर्णय घ्यायला जरा उशीरच झाला पण कही हरकत नाही.येत्या वर्ष भरात तुझं लग्न होईल. आम्ही उद्याच एका म्यारेग ब्युरो मध्ये तुझं नाव नोंद करून येवू ,पाहू त्यांच्या कडे चांगली स्थळे आहेत का ते,ऐकतेस ना ?कधी पासून मी एकटाच बडबडतोय ”

अन्विका इतका वेळ तिच्या बाबांचं बोलणं शांतपणे ऐकत होती . ती आता बोलू लागली ,

“ऐकतेय तुमचं मी बाबा ,पण एव्हढी काय घाई आहे ?थांबा थोडे दिवस मग लग्ना बद्दल विचार करू”

इतका वेळ दोघा बाप- लेकीचं बोलणं ऐकत असलेली अन्विका ची आई आता मधे पडली.

आई ” काय बोलतेस अन्विका तुझं वय अठ्ठावीस झालं आणि घाई काय विचारतेस ?चांगला मुलगा मिळू पर्यंत दोन वर्षे अशी निघून जातील आणि तू तीस वर्षांची होशील ; काय घाई झाली म्हणतेस”

pudhil katha khalil link var

https://www.swamini08.ml/2019/11/2.html

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा