बंध प्रेमाचे (भाग 9)

Written by

आज निखिलची सकाळ जरा लवकरच झाली.खरंतर त्याला रात्रभर झोपच नव्हती लागली.उद्या काय करायचं याचं प्लॅंनिंग मध्ये रात्र संपली.सकाळी ड्रेस सिलेक्ट करण्यात त्याने 1 तास घालवला☺️.सगळे ड्रेस बेडवर मांडून ठेवले होते.रोहन डोळे विस्फारुन त्याच्याकडे पाहत होता🙄.
“आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?राजे चक्क spl तयार होतायेत”…………..रोहन
“गप रे आधीच कोणता घालू ते सुचत नाहीये,तु हेल्प कर ना जरा”………….निखील
“हं🙄,बरा आहेस ना बाबा,का डॉक्टर कडे जायचं?नाही,ड्रेस चॉईस वगैरे करायला संगतोयएस म्हणून म्हंटल😀😂………….रोहन
“रोहन उगाच सकाळी सकाळी सुरू नको होऊ,ऑलरेडी मला late होतोय,तुला नसेल हेल्प करायची तर ok मी बघेन माझं माझं😡………..निखील
“ok sorry, चिडू नको थांब बघू दे🤔………हां…… तु हा घाल black shirt भारी दिसतो तुला☺️”…………..रोहन
“ये नक्की ना?”………….निखील
“हो रे बाबा नक्की,पण सर एवढे तयार होऊन चाललाय कुठं ते तरी सांगा?”………….रोहन
“आल्यावर सांगतो “………..निखील
“आताच सांग,नाहीतर एक काम करूया मी पण येतो तुझ्यासोबत,कस?”……….रोहन
“ये नको,केलीत तेवढी हेल्प पुरे झाली🙏…………निखील
“दाल मैं कुछ तो काला है दया पता लगाणा पडेगा🤔😂”……….रोहन
“तु ना एक नंबर नौटंकी आहेस😀”………….निखील
“तो तर मी आहेच,आता सांग पटकन”………..रोहन
“ते……मी……इराला प्रपोज करणारे आज😊”………निखील
“काय?हे कधी ठरलं आणि एक मिनिट तु यातलं मला काहीच सांगितलं नाहीस”रोहन आश्चर्याने म्हणाला.
“अरे कालपर्येंत सांगण्यासारखं काहीच नव्हतं,मग काय सांगु तुला”…………..निखील
“हो का?कालपर्येंत नव्हतं आणि मग एका दिवसात असा काय चमत्कार झाला?”………..रोहन
“परवा इराने सांगितलं की तीच माझ्यावर प्रेम आहे”निखील शांतपणे म्हणाला.
“what?इराने तुला?काय चाललंय काय नेमकं?एकदा तु म्हणतो मी तिला प्रपोज करणारे आता म्हणतो इराने प्रपोज केलं,तुमच्या दोघांच तर भांडण असत रोज आम्हालाच टेन्शन येत त्याच आणि आता हे काय?या hate story ची love story कशी झाली?”……………रोहन
“रोहन मी तुला आल्यावर सगळं सांगतो,हवंतर एक इंटरव्ह्यू घे माझा डिटेल मध्ये पण आता जाऊदे ऑलरेडी खूप late झालाय😑”…………..निखील
“oooo प्रेमवीर……….जा जा जिले अपनी जिंदगी, तु भी क्या याद रखेगा😁😁😜”……………रोहन
“नौटंकी”😊😊म्हणत निखील बाहेर पडला तो सरळ कॅफे मध्ये गेला.गिफ्ट तर त्याने आधीच घेतलं होतं.कॅफेतल्या सुरेशला काय करायचं ते सांगून त्याने अवनीला कॉल केला,
“hallo अवनी, कुठे आहेस?”…………निखील
“आता इराच्या घरी पोहचतेय,dont worry शार्प 11am ला ती तिथे असेल☺️”………..अवनी
“बरं ऐक ना तु ही येतेस का? actully मी खूप नर्व्हस आहे ग😓”…………निखील
“ooo The great Nikhil आणी नर्व्हस😀”…………..अवनी
“अवनी मी अजीबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये”………निखील
“ok sorry, मी तिला कॅफेपर्येंत घेऊन येऊ शकते तिथून पुढे तुझं तु बघ,तुझ्यापेक्षा ज्यास्त टेन्शन मला आलाय,खोट बोलून मी तिला तिथे घेऊन गेलीये समजल्यावर माझं काय होईल😌”…………..अवनी
“काही नाही होत,तु फक्त ये घेऊन तिला बाय”☺️………….निखील
“ok by”…………अवनी
अवनी इराच्या घरी पोहचली तेंव्हा इरा रेडी च होऊन बसली होती.
“काय अवनी किती उशीर?आणि आज चक्क माझ्यासोबत येतीयेस?”………..इरा
“अगं अस काही नाही म्हंटल जाऊ जरा तुझ्यासोबत,बरं इरा ऐक ना एक काम होत”………अवनी
“आता काय?बरं जाता जाता सांग ना ऑलरेडी late झालाय”………….इरा
“तेच सांगतीये, जरा सुरेशच्या कॅफेत जायचं होतं”………..अवनी
“आता अवनी?seriously?आपण clg सुटल्यावर जाऊ ना,अगं lecture बुडेल”……………इरा
“अगं plz plz माझी एक frnd येणार होती तिला भेटूया आणि निघुया लगेच”………..अवनी
“काय चाललंय काय तुझं?काल एका frnd ला भेटायला गेलेलीस आज एक frnd?”…………इरा
“अगं काल ती भेटलीच नाही काहीतरी काम निघालं तिचं अचानक म्हणून आज भेटातीये चल ना plz plz plz”…………अवनी
“तु ना कहर आहेस,बरं चल आता”………….इरा
“thank you dear☺️”…………..अवनी
“हं, मस्का नको लाऊ आता”…………इरा
इरा आणि अवनी कॅफे च्या पार्कींग मध्ये पोहचल्या तसं अवणीने निखील ला मेसेज करून सांगितलं.
“अवनी तु एक काम कर मी इथेच थांबते तु जाऊन भेटून ये ना तिला”………इरा
“ये काहीही काय इरा,कसं दिसत ते चल तु ही”……….अवनी
“अगं पण”…………इरा
“पण वगैरे काही नाही चल, बरं इरा तु जरा पुढे हो मी आलेच तिला कॉल करून कुठे पोहचली बघते “………अवनी
“अगं आली असेल ती बघू तरी चल आत जाऊन”………इरा
“नाही पोहचली अजून आधी पोहचेल त्यानं कॉल करायचा ठरलं होतं आमचं तु पुढं हो टेबल पकड ना, आलेच मी”………….अवनी
“काय ग तु,बर ये लवकर मी जाते “म्हणत इरा आतमधे गेली.
टेबलं शोधण्यासाठी इकडे तिकडे पाहत असता तिची नजर निखीलवर पडली.तो तिच्याकडेच पाहत होता .
“कसला handsome दिसतो हा😊,पण इथे काय करतोय?नेहाची वाट पाहत असेल😡,जाऊदे आपल्याला काय करायचं”म्हणत दुसऱ्या टेबलं कडं वळली इतक्यात निखिलने तिला हाक मारली,
“इरा,ये ना”…………निखील
“अरे नाही…….नको…..अवनी पण येतीये आम्ही बसतो तिकडे”………..इरा
“अगं बस ना ती आल्यावर बघू आपण☺️”………….निखील
“ok, तु इथे?म्हणजे कुणाची वाट पाहत होतास का?”……….इरा
“हो☺️”………..निखील
“त्या नेहासाठीच बसला असेल इथे,मग मला कशाला सांगतोय बसायला,मी काय यांची तोंड पाहत बसु का इथे कुजका कुठला😏😏😏”………..इरा मनातच म्हणाली
निखील कधीपासून तीच निरीक्षणं करत होता,तिचे बदलणारे एक्सप्रेशन बघून हसायला येत होतं त्याला.
“मी बसते तिकडे,u carry on, ही अवनी पण ना कुठं राहिली काय माहीत “म्हणत इरा तिथून उठली,इतक्यात निखिलने तिचा हात पकडला.
इराने चमकुन निखीलकडे पाहिलं.
“अवनी येणार नाहीये”………….निखील
“काय”?तुला कसं माहीत?आणि हात सोड माझा आजुबाजुला लोक आहेत आपल्या”………….इरा
“असुदेत मला नाही फरक पडत,तु विचारत होतीस ना कुणाची वाट पाहतोयस का म्हणून?तुझीच वाट पाहत होतो मी☺️”……………निखील
“माझी?पण मी इथे येणारे हे तुला कसं माहीत?1 मिनीट म्हणजे अवनी?अवणीने खोट सांगून मला इथं आणलं ना?बघतेच तिला😡”………………..इरा
“तिची यात काही चूक नाहीये,तिनं माझ्या सांगण्यावरून असं केलं,त्यादिवशी सगळं बोलून सरळ निघून गेलीस माझं काही ऐकायला ही थांबली नाहीस”………….निखील
“ते मी भावनेच्या भरात बोलून गेले ,sorry तु आणि नेहा एकत्र असताना मी असं बोलायला नको होतं😞”…………इरा
“काय मी आणि नेहा लावलयेस?आमच्यात असं काहीच नाहीये,मुळात नव्हतंच कधी तुला कुणी सांगितलं काय माहित”……………निखील
“कुणी सांगायला कशाला पाहिजे मी स्वतःच्या कानांनी ऐकल होत traditional day दिवशी तु रोहनला सांगत होतास नेहाने तुला प्रपोज केलेलं😡”………….इरा
“अरे हो मान्य आहे मला नेहाने मला प्रपोस केलेलं पण मी तिला नाही बोललो हे नाही ऐकलस बहुतेक तु?कधी एकत्र फिरताना पाहिलेस का तु आम्हाला?couple असं असतं का?”…………….निखील
“म्हणजे तु आणि नेहा”…………….इरा
“नाहींयोत रेलशनशीप मध्ये”…………..निखील
“इरा ऐक ना मला तुला काही सांगायचंय”…………निखील
“अजून काही आहे का?”……………इरा
“हो,actully खूप प्रॅक्टिस केली होती हे बोलींन ते बोलींन पण आता काहीच सुचत नाहीये,माझी पहिलीच वेळ आहे ना सो तरी पण ,Era i love you, I Love you infinte☺️,प्रेम काय असत हे जेंव्हा मला समजलं ना तेंव्हा फक्त आणि फक्त तुझाच चेहरा समोर आला,माझी पूर्ण life मला तुझ्यासोबत घालवायचिये,will you marry मी?☺️तुझ्याबरोबर म्हातारं व्हायचंय मला,आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस तुझ्याबरोबर जगायचाय,
तो चंद्र नकोय ग मला……..
फक्त तुझी शीतल सावली दे………..
हे जग नकोय ग मला…………
फक्त तुझ्यातलं माझं जग दे……….
स्वप्न माझी नाहीत ग मोठी……….
पण तुझ्या स्वप्नात………….
थोडी जागा दे…………
नदीला या काठ दे………..
वाटेला माझ्या वाट दे……….
अडकलाय ग तुझ्यात जीव………….
आता फक्त आयुष्यभराची साथ दे……………..
इराला तर काही सुचतच नव्हतं. ती फक्त आणि फक्त तो क्षण जगत होती.निखील तिला कधीतरी असं काही बोलेल अस तिला अजिबात वाटलं नव्हतं. ती भान हरपून निखीलकडे पाहत होती.
“इरा”……निखिलच्या आवाजाने ती भानावर आली.
“हं”……………इरा
“अगं बोल ना काहीतरी”…………..निखील
“I Love You Nikhil, I Love You very Much😊”…….इरा
निखिलच्या डोळ्यात नकळत पाणी आलं तिला जाऊन घट्ट मिठी मारावी असं त्याला वाटत होतं पण त्याने स्वतःला control केलं आणि वेटरला हाक दिली,
वेटर तिथे पाणीपुरी घेऊन आला.
“कॅफे मध्ये पाणीपुरी”इरा निखीलकडे पाहत बोलली.
“तुला आवडते ना “म्हणत निखिलने एक गिफ्ट इरासमोर धरलं,”हे तुझ्यासाठी”…
“याची काही गरज नव्हती निखील ऑलरेडी खूप दिलयेस आज तु मला”……….इरा
“इरा plz घे आजचा दिवस खूप spl आहे माझ्यासाठी मुलींना काय देतात हे माहीत नव्हतं मला सो मला जे आवडत ते घेऊन आलोय☺️”………….निखील
इराने गिफ्ट खोलल तर त्यात पेन होत😀.
“पेन😀😀”……….इरा
“नाहीत देत का,🤔”…………..निखील
“सगळया गोष्टीत the great निखील या बाबतीत अगदीच कच्चा आहे वाटत😜,I love You Stupid”.. ……इरा
“अशीच कायम हसत रहा, आणि एक प्रॉमिस हवय आज मला तुझ्याकडून”……….निखील
“काय”…………इरा
“तु कधीच माझ्याशी भांडणार नाहीस😊” निखील मिश्कीलपणे म्हणाला.
“मी तर प्रॉमिस देतेच पण मला ही तुझ्याकडून हेच प्रॉमिस हवय😊”……….इरा
“चला निघुया आता clg ला जाऊन तर काय उपयोग नाही”……….इरा
“बस ना अजून थोडा वेळ”………निखील
“निखील ऑलरेडी खुप late झालाय”……….इरा
“ok चल,मी सोडतो तुला”…………निखील
“मी माझी गाडी घेऊन आलीये☺️”………..इरा
“तुला काय वाटत तुझी गाडी अजून बाहेर आहे”……..निखील
“म्हणजे?अवनी?तिला तर ना सोडणारच नाहीये मी”………इरा
“बरं आता तरी याल ना मॅडम माझ्यासोबत”…………..निखील
“चल”म्हणत ते दोघे बाहेर पडले.
“आज पहिल्यांदाच इरा निखीलच्या बाईकवर बसली होती खूप खुश होती ती निखिलची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती.
गाडीवर दोघे ही शांतच होते आता काय बोलावं हे दोघांनाही सुचत नव्हतं तसेच ते इराच्या घरासमोर येऊन थांबले.
“इरा घर आलं तुझं”……….निखील
“oooo आलं पण,1 मिनिटं तुला माझ्या घरचा अड्रेस कसा माहीत?मी तर सांगितला नव्हता”……..इरा
“हमे सब पता होता है जानी,😂😂”………निखील
“हे ही गुण आहेत वाटत आपल्यात☺️”……….इरा
“गुण?अजून पाहिलेस कुठं तु😊”………….निखील
“बरं निघा आता,आणि पोहचल्यावर कॉल कर,1 मिनिट तुझा नंबर तरी दे”………..इरा
“dont worry मी पोहचलो की कॉल करतो तुला तुझा नंबर आहे माझ्याकडे☺️”………..निखील
“पण माझा नंबर तुझ्याकडे?मी तर नाही दिला?”…………इरा
“किती प्रश्न पडतात ग तुला by निघतो मी”इरा अजून काही बोलायच्या आधी तो तिथुन गेला.
इरा काहीश्या आश्चर्याने आणि आनंदाने तो गेला तिकडे पाहत होती भानावर येताच ती घरात पळाली.
(एका अतूट नात्याला सुरवात तर झाली, आता यावर त्यांच्या frnd ची reaction पाहुया पुढच्या भागात)
**********************************************
(

Article Categories:
प्रेम

Comments are closed.