दवबिंदूची चादर🇨🇮

Written by

नागपूरच्या प्लॅटफॉर्म वर गाडी थांबली. ….🚉
प्रवाशांची चढण्या-उतरण्याची गर्दी……
त्यात ही बोचरी थंडी……
त्या गर्दीतही ‘ती’ तीच नाव “अबोली”…….
फुलांची टोपली डोईवर घेऊन
गाडीत चढली……
निळ्या रंगाचा फुलांचा फ्रॉक…
कुरळ्या कुरळ्या केसांची…..
सावळ्याश्या रंगाची…..
पण…..
अबोलीच्या चेहऱ्यावरची हास्याची लकेर मात्र
खूप खूप आत्मविश्वासाची….
नुकतीच पाण्याची शिंपडन तिने फुलांवर केली होती….
जणू फुलांवर दवबिंदूची चादरच पसरली होती….
फुल ही आपण आता कुठे विराजणार होणार म्हणुन हितगुज करीत होती….
कुणी देवाच्या पायथ्याशी…
कुणी शहीदांच्या चक्रात…
तर कुणी काळ्याभोर केशसंभरात गुंफली जाणार होती…
“अबोलीच्या” टोपलीतल्या केशरी गुलाबाच्या कळ्या खूप छान दिसत होत्या…..
मोगरा पण गुलाबासोबत ठाण मांडून बसला होता…..
केशरी आणि पांढऱ्या रंगाचं छान combination जमलं होत…..सोबत पळसाच्या हिरव्या पानांच त्यांना आच्छादन होत…..
केशरी-पांढरा- हिरवा रंगानी मिळून जणु झेंड्याच्या 🇨🇮 रूपात भारताचं प्रतिनिधींत्वच
तिच्या डोईवरच्या टोपलीत साकारलं होत….
—-हळूच केशरी गुलाबाच्या कळ्या टोपलीतून बाहेर डोकावल्या…..
स्वतःला जप ह “अबोली”
कलयुगातली ही राक्षसी वृत्ती…
नाही जगु द्यायची तुम्हा सुखाने…
काल ” निर्भया”
आज “प्रियंका”
उद्या अजून कोणीतरी होईल यांच्या वासनेचा शिकार…
नको ठेवूस विश्वास कोणावर…
स्वतःला जप पोरी तु जरा….
जप पोरी तु जरा….
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

@©️लता जुगल राठी
आवडल्यास नक्की like, comment करा..😊
Share करण्यास हरकत नाही पण मात्र नावासह ही नम्र विनंती🙏🙏

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा