“दाता” (100 शब्दांची कथा)

Written by

100 शब्दांची कथा

“दाता ”

 

आत्ता पर्यंतचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. कळा सूरू झाल्या आणि काही क्षणात गोंडस बाळ जन्माला आल. पण नियतीच्या मनात काही वेगळच होत…

डॉक्टरांनी सांगितले बाळ जास्त काळ जगणार नाही.. फारफार तर दोनच दिवस आहेत त्याचे..

तिथे अजून एक बाळ अडमिट होत त्याला हार्ट ट्रांसप्लांटची गरज होती.. दोन्ही आईवडीलांच मुलाविषयीच दुःख सारखच होत. त्याचवेळेस अवयवदानाचा विचार मनात आला ..

आपल बाळ पुढिल दोन दिवसांनी आपल्यात नसेल पण तरीही आपण त्याला कायम जीवीत ठेऊ शकतो.. त्याचे अवयव दान करून..एक जीव जरी संपला तरी अजून चार जीव आपल आयुष्य जगू शकणार.. याच उद्देशाने आपल्या बाळाचा जन्म झाला असावा..

© शुभांगी शिंदे

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा