दिपावली शुभेच्छा ….!!

Written by

🔴 दिपावली शुभेच्छा ….!!

ज्या सणाची आतुरतेने वाट पहातो तो आनंददायी क्षण घेऊन आला आहे ..लक्ष लक्ष दिव्याची दिपमाळ…जीवनातील अंधकार नाहीसा होऊन एक लखलखाट आयुष्यात पडावा व सारे कुटुंब या आनंदपर्वाचा भाग व्हावे… असे चित्र दिपावलीचा सण साजरा करताना दिसत आहे.पावसाने तर अशा आनंददायी सणावर विरजण घालण्याचे काम चालुच आहे..पण पावसाला हुलकावणी देत दिपावली धुमधड्याक्यात साजरी करायला सुरुच केले
ज्या तळृमळीने वाचकवर्ग ईरावरील साहित्य वाचत आहे त्यामुळे लेखक अधिकाधिक उत्कंठावर्धक प्रेरणेने लिहीत आहे… वेगवेगळ्या विषयावर लिहताना नविन विषय हाताळताना दिसत आहेत त्यातुन परिपूर्णतेकडे जाताना शब्दांची ओंजळ कायम भरलेली आहे.अशीच सुखद परिस्थिती सर्वांना यावी …यासाठी याचना करणे मनाला आल्हादायक वाटते.
शब्दांची दिवाळी करताना एक एक शब्द दिपज्योतीतुन तेजाळतो आहे…वाचकांना तो अमर्याद आनंद देत आहे..शब्दांच्या बरसणार्या कृतीतुन पहिले साहित्य वाचताना प्रफुल्लीत झालेला आहे.. तोच जोश कायम रहावा… ही दिपावली ” ईरा ” ला व तमाम वाचकांना , लेखक , लेखिकांना रोमहर्षक क्षणांनी उजळुन निघावी ही ईश्वरचरणी प्रार्थना…

लोभ सदा वृद्धींगत रहावा…!!

🌹HAPPY DIPAVALI.

© नामदेवपाटील ✍

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा