दिल दोस्ती आपली यारी…..

Written by

वर्षा माझी एकदम जवळची मैत्रीण.. आज बाजारात आम्ही असचं अचानक एकमेकींच्या समोर आलो….

खरचं आज आम्ही कितीतरी दिवसांनंतर एकमेकींसोबत बोलत होतो….

खरच आम्ही जम्ळपास 12 वर्षांनी भेटत होतो…

आम्ही बरंचं बदललो होतो…खरंचं काळ पुढे पुढे जातो पण आपल्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी मागे पडत जातात…अगदी आपल्याही नकळत..

आपल्या जबाबदाऱ्या जशा वाढत जातात तस आपोआपचं आपली आवडनिवड ही मागे पडत जाते…

पण आजही जर काही आजही अगदी आधीसारखं असेल तर ती होती आमची मैत्री…

खूप छान वाटत होतं…काही नात्यांना स्थळ,काळ आणि वेळेचंही बंधनच नसतं….त्यातलचं हे एक नातं… सोबत नसतानाही कायम सोबत करणारं….

पण दोघीही घाईत असल्यामुळे आम्ही एकमेकींचे नंबर घेतले आणि निघालो…आता जरा hi, good morning ,चे message रोज होऊ लागले….

एक दिवस आम्ही दोघींनीही भेटायचं ठरवलं… आणि ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलोही… खूप खूप छान वाटल..जुन्या आठवणी ताज्या झाल्या…

दोघींनाही शाळेतल्या इमारती, आमचे वर्ग, शिक्षक, इतर मैत्रीणी , सगळं जसंच्या तसं आठवत होत ….खूप सुंदर दिवस होते ते…सतत एकमेकींसोबत राहन्याची इतकी सवय झाली होती की शेवटच्या दिवशी शाळेतून आमचा पायच निघत नव्हता….एकमेकींच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो होतो आम्ही…

आजही त्या सर्व आठवणीनी गहिवरून येते…

बारा वर्षांचा गेलेला काळ जणू मध्ये गेलाचं नव्हता…

जुन्या आठवणी काढून आम्ही मनसोक्त हसलो…

मनात कोणताही किंतू न ठेवता अगदी मनात येईल तसे एकमेकींशी बोललो….

PNB
आणी खूप दिवसांनी एवढ खळखळून हसलो..

खरंचं त्या दिवशी समजल कि मी रोज अशा किती गोष्टी miss करत होते….आणि त्यामुळेचं की काय उगाचच चिडचिड होत होती…

आज समजल आपण कामाने शारीरिक तर थकतोच पण त्याहीपेक्षा मानसिकदृष्टीने थकतो ते रोजच्या त्याच त्याचं कामांनी…

या कामातला बदल ही पण आपली एक गरजचं असते परत जोमाने कामाला लागन्यासाठी…।

आपण केलेला बदल हा खूपच गरजेचा असतो….

आपल्यासाठी… आपल्या नात्यांना जपण्यासाठी…आणी आपण आनंदी राहण्यासाठी…

कसंय ना कोणतही नात म्हटले तर त्यामध्ये त्या नात्याची, जबाबदारीची, एक भिंत आपोआप येतेच….

मात्र मैत्रीचं नातं असं असतं जिथे कोणतीही अपेक्षा नसते… आपण जसं आहोत तसेच स्वीकारले जातो…

इथे बदल झालाचं पाहिजे अशी सक्ती नसते… मनात नसताना तडजोड करण्याचं बंधन नसते…

जे घरच्यांशी बोलताना specially (लग्न झाल्यावर) आपल्याला दहादा विचार करावा लागतो ते मैत्रीमध्ये आपण सहज बोलू शकतो…

म्हणूनच असं वाटते आपल्या रोजच्या गडबडीत आपण आपल्यासाठी वेळ हा priority ने दिलाच पाहिजे…कारण तो आपल्यालाही ताजतवानं करत असतो…

कितीही काम केलं तरी नवीन काहीतरी काम असतचं…. ही list न संपणारी असते…. म्हणूनचं मैत्रीणींंनो आपल्या मैत्रीणीला वेळात वेळ काढून भेटा…

लगेच भेट शक्य नसेल तर call करा… आणी भेट झाल्यावर कसे वाटल ते नक्की सांगा…..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा