दुबई चा प्रवास आणि अनुभव

Written by

गेल्या २-३ वर्षांमध्ये दुबई ला जाण्याचा ३-४ वेळा योग आला, जो कुणीही दुबई किंवा अबुधाबी ला फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत आहे त्यांच्या साठी काही महत्वपूर्ण माहिती या लेखा मध्ये माझ्या स्वतःच्या अनुभव नुसार share करण्याचा प्रयत्न करत आहे.

चला तर जाणून घेऊया दुबई बद्दल…….

संयुक्त अरब एमिरेट्स हा देश ७ वेग वेगळे एमिरेट्स एकत्र येऊन बनलेला देश, त्या ७ एमिरेट्स पैकी दुबई , अबुधाबी, अल ऐन , शारजाह हे काही महत्वाचे एमिरेट्स आहेत, इथले स्थानिक नागरिक हे मुख्यतः मुस्लिम आहेत आणि या देशामध्ये राहत असलेल्या लोकांमध्ये स्थानिक नागरिक फक्त २५% आहेत, बाकी सर्व लोक हे बाहेरून business साठी किंवा जॉब साठी इथे स्थायिक झाले आहेत.
या देशात बाहेर च्या लोकांना पर्मनंट रेसिडेन्सी मिळत नाही, त्यांना २-३ वर्षांनी रेसिडेन्सी व्हिसा रिन्यूअल करावा लागतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे बाहेर च्या लोकांना इथे नारिकत्व मिळत नाही.

दुबई मध्ये राहत असलेल्या लोकांचा जर विचार केला तर त्यामध्ये इंडियन , पाकिस्तानी, बांगलादेश, फिलिफिन्स, आफ्रिका , सीरिया, जॉर्डन, ब्रिटिश , अमेरिकन ह्या सर्व देशांमधील लोक राहतात , त्यामुळे इथे खूप विविधता आढळते, मुख्यता इथे फिलिफिन्स , पाकिस्तानी आणि भारतातून केरळ राज्यामधून आलेली लोक भरपूर प्रमाणात आहेत.
व्यवसाय बद्दल विचार केला तर केरळ मधून आलेल्या लोकांचे छोटे छोटे रेस्टारेंट आणि जनरल स्टोअर्स ची दुकाने, छोटे शॉपिंग सेंटर्स आहेत, आणि या व्यवसायात केरळ मधील लोक मोठ्या प्रमाणात आहेत, ट्रान्सपोर्ट आणि ड्रायविंग मध्ये पाकिस्तानी लोक मोठ्या प्रमाणात आहेत, फिलिफिन्स लोक हि मॉल मध्ये किंवा शो रूम मध्ये, हॉटेल मध्ये , हौसेकीपिंग, नर्सिंग या क्षेत्रात जास्त आहेत
इथे मुख्यतः इंग्लिश, अरेबिक आणि हिंदी भाषाचा वापर केला जातो, रेस्टारेंट मध्ये किंवा टॅक्सी ड्राइवर  हिंदी बोलणारे हमखास भेटतात. जॉब साठी आलेली मराठी लोक सुद्धा खूप प्रमाणात आहेत.

दुबई आणि अबुधाबी मध्ये वयक्तिक आणि सामाजिक बंधने खूप कमी आहेत , इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकता , मौज मजा करू शकता, इथे फिरण्यासाठी पण खूप काही आहे, थोडक्यात सांगायचं तर दुबई मध्ये एक ओपन minded आणि मिक्स culture आहे कि जे सर्व देशातल्या लोकांना सामावून घेऊ शकतो, पण काही सार्वजनिक नियम आहेत जे सर्वाना पाळावे लागतात आणि ते सुद्धा फक्त तुमच्या वयक्तिक आणि सामाजिक सुरक्षा च्या हेतूने बनवलेले आहेत.

संयुक्त अरब एमिरेट्स हा देश जगातील काही अत्यंत सुरक्षित देशांपैकी आहे, इथली सुरक्षा व्यवस्था खूप आधुनिक आणि तत्पर सेवा देणारी आहे, त्यामुळं या देशामध्ये महिला , वृद्ध आणि मुलं खूप सुरक्षित आहेत आणि चिंता करण्या सारखं काहीही नाही.

या सर्व गोष्टीं मुळॆ इथे परदेशी नागरिक खूप मोठ्या प्रमाणात फिरायला येतात, त्यामुळे दुबई आणि अबूधाबी हे एक टुरिस्ट ठिकाण म्हणून खूप फेमस आहे. सर्व गोष्टींचा विचार केला तर इथे सर्व धर्मांच्या लोकांचा आदर केला जातो आणि खूप तुम्हाला जास्त इंग्लिश येत नसेल तरीही तुम्ही इथे अगदी व्यवस्तीत फिरू शकता. सर्व लोक खूप मदत करणारे आहेत.

काही लोकांना आखाती देशांच्या हवामाना बद्दल खूप गैरसमज आहेत, चला जाणून घेऊया हवामाना बद्दल..
इथे जवळपास ५ महिने हिवाळा असतो आणि बाकीचे महिने उन्हाळा असतो , नोव्हेंबर ते एप्रिल इथे तापमान २०-३० डिग्री असते आणि मे ते ऑक्टोबर म्हणजे उन्हाळा तापमान ४०-५० डिग्री पर्यंत असते.

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 4 महिने visit करण्यासाठी अत्यंत योग्य वेळ, याला टुरिस्ट season असेही म्हणतात कारण या ४ महिन्यात खूप टुरिस्ट लोक दुबई ला visit करतात.
उन्हाळ्यात visit करणं शक्यतो टाळावे.

जाणून घेऊया फिरण्यासाठी असलेली ठिकाणे……

दुबई मध्ये अत्यंत फेमस ठिकाण म्हणजे भूर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत, या मध्ये १६५ फ्लोर आहेत आणि तुम्ही १४५ फ्लोर पर्यंत जाऊ शकता, १४५ फ्लोर वरून तुम्ही ढगांच्या पण वर असाल आणि पूर्ण दुबई शहर तुम्ही पाहू शकता, भूर्ज खलिफा वरून सूर्यास्त पाहण्याची मजा काही औरच …संध्याकाळी ७ नंतर भूर्ज खलिफा आणि दुबई मॉल च्या मध्य ठिकाणी musical वॉटर फॉऊंटन्स एन्जॉय करू शकता, भूर्ज खलिफा च्या बाजूलाच दुबई मॉल आहे तिथे पण आतमध्ये दुबई aquarium आहे तिथे विविध प्रकारचे सागरी प्राणी तुम्ही पाहू शकता, दुबई मॉल हा जगातील खूप मोठ्या मॉल पैकी एक आहे , इथे तुम्हाला सगळे इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स दिसतील आणि ३ -४ तास जवळ पास लागतील मॉल मध्ये फिरायला.
दुबई मध्ये अजून खूप काही जागा आहेत , त्यामध्ये दुबई फेरी मध्ये तुम्ही समुद्रात बोटीमध्ये फिरण्याचा आनंद घेऊ शकता , जुमेराह बीच वर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करू शकता ,भूर्ज अल अरब हे फेमस हॉटेल आहे , दुबई museum , दुबई हेरिटेज, दुबई फ्रेम , adventures पार्क, दुबई miracle गार्डन, मॉल ऑफ the एमिरेट्स मध्ये खूप काही एन्जॉय करण्या सारख आहे.

पूर्ण दुबई फिरायला कमीत कमी २-३ दिवस तरी जातील , दुबई मध्ये फिरायला दुबई मेट्रो ही अत्यंत अल्प दारात असलेली मेट्रो सुविधा, जास्तीत जास्त मेट्रो चा वापर केल्यास तुम्ही टॅक्सी साठी लागणारा खर्च बचत करू शकता.
दुबई ते अबू धाबी इंटरसिटी बस सुद्धा आहेत, प्रत्येकी १५ मिनिटाला ही बस सुविधा उपलबध आहे.

अबुधाबी ला आल्यावर इथे सगळ्यात फेमस ठिकाण मध्ये ग्रँड mosque (मशीद), संगमरवर मध्ये बनवलेली ही मशीद आकाराने खूप मोठी आहे , जणू काही ताजमहाल सारखी इमारत बनवायचा प्रयन्त केला आहे, इस्लामिक कला कुसरीचा एक अत्यंत देखणं असं उत्तम उदाहरण आहे, ही मशीद इतकी मोठी आहे कि २-३ तास लागतात पूर्व फिरायला आणि अत्यंत देखणं असं कलाकुसरी चा काम आणि सोबत असलेली मोठी मोठी झुंबर खूप आकर्षित आहेत,
सर्व धर्माचे लोक या मशिदीत येऊ शकतात , महिलांना सुद्धा या मशिदीत प्रवेश दिला जातो..इथे तुम्ही इस्लामिक culture आणि ज्यांनी कुणी अजून मशीद आतमधून पहिली नसेल ते नक्कीच अनुभव घेऊ शकता.

अबुधाबी मधील दुसरं वर्ल्ड फेमस आकर्षण म्हणजे फरारी वर्ल्ड आणि यास वॉटर वर्ल्ड , इथे तुम्ही फॉर्मुला वन या रेसिंग साठी वापरल्या जाणाऱ्या विविध कार्स आणि सर्किट पाहू शकता, मुख्य आकर्षण म्हणजे जगातील सर्वात फास्ट आणि मोठा रोलर कोस्टर, या मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्की घ्यावा.
वॉटर वर्ल्ड म्हणजे जगातील सर्व मोठ्या वॉटर राईड्स इथे अनुभवायला मिळतील , जगातील सर्वात मोठ्या वॉटर पार्क पैकी हा एक वॉटर पार्क आहे, तुम्ही १ दिवसाचा पास घेऊ शकता फरारी वर्ल्ड अँड वॉटर पार्क साठी आणि जेवण सुद्धा तिथेच करू शकता.
अबूधाबी मध्ये अजून खूप काही आहे , एमिरेट्स palace , sadiyat बीच, cornich ….

अबू धाबी मध्ये सर्व ठिकाणी फिरायला 2-३ दिवस तरी वेळ लागेल.

आता सर्वात महत्वाचं म्हणजे desert सफारी , हा कधीही लक्ष्यात राहावा असा अनुभव , desert सफारी arrange करणारे खूप ट्रॅव्हल एजन्ट अबू धाबी मध्ये आहेत , डायरेक्ट हॉटेल मधून pickup सुविधा उपलब्ध आहे , वाळवंटात एका विशिष्ट ठिकाणी हे desert सफारी कॅम्प असतात , हॉटेल pickup पासून ते डिनर आणि परत हॉटेल ड्रॉप ची पूर्ण टूर ही व्यवस्तीत प्लॅन केलेली असते, land cruiser सारख्या अत्यंत पॉवरफुल गाडी मध्ये बसवून वाळवंटात असलेल्या वाळू च्या डोंगरावर विविध स्टंट केले जातात , हे ड्राइवर खूप skilled आणि trained असतात , जवळपास ३० मिनिटे वाळवंटात थ्रिल्लिंग करणारा अनुभव असतो , भीतीही वाटते पण खूप मजा येते, त्यानंतर तुम्ही desert bike वर स्वतः वाळवंटात वाळूच्या डोंगरावर इकडे तिकडे bike चालवूं शकता , उंटावर बसून rides करू शकता , समुद्र सारखं पसरलेलं वाळवंट संध्याकाळी अतिशय थंड असत आणि तुम्ही इथे चांगल्या प्रकारे फोटोग्राफी देखील करू शकता , desert सफारी मध्ये डिनर म्हणजे एक वेगळाच अनुभव , अरेबिक barbeque आणि खूप काही चांगल्या डिशेश असतात , रात्री ८ ते ९ च्या दरम्यान बेल्ली डान्स चा शो तुम्ही एन्जॉय करू शकता आणि शेवटी रात्री १० च्या आसपास परतीचा प्रवास सुरु होतो, हे सगळं arrange करणारी लोक अत्यंत प्रोफेशनल असतात आणि सगळं काही सुरक्षित आणि व्यवस्थित प्लॅन करतात …
अबुधाबी नंतर तुम्ही AL AIN या शहराला visit देऊ शकता , तिथे वाळू आणि खडक मिळून तयार झालेलं मोठी पर्वत रांग आहे, हिल स्टेशन म्हणून हे प्रसिद्ध आहे, सफेद रंगाचे डोंगर आणि त्या मधून जाणारा रास्ता हे देखील मनाला शांती देणारा आहे..वरती रिसॉटर्स आहेत आधी बुकिंग करून जाणे योग्य ठरेल..AL AIN मध्ये zoo , AL AIN Museum आणि AL AIN वॉटर fountain देखील फिरण्यासाठी चांगलं आहे …

याशिवाय अजूनही खूप काही छोटी छोटी ठिकाण दुबई , अबुधाबी अँड AL AIN मध्ये आहे, तुमचा ट्रिप चा कालावधी जितका मोठा तितका तुम्ही व्यवस्तिथ प्लॅन करू शकता..

जाणून घेऊया किती दिवस लागतील मुख्य स्पॉट पाहायला ….

कमीत कमी एक आठवडयाचा ट्रॅव्हल प्लॅन असायला हवा, कारण फक्त ट्रॅव्हल करून थकवाही येतो , थोडा एक दिवस मध्ये अराम करण्या साठी द्यावा

Visa आणि टिकेट्स……………..

१५ दिवस, १ महिना आणि ३ महिन्याचा व्हिसिटर व्हिसा असे पर्याय आहेत.
प्रत्येक व्यक्ती साठी ६००० ते ७००० रुपये १५ दिवसयाच्या व्हिसा साठी लागतात
व्हिसा अँप्लिकेशन कोणताही चांगल्या ट्रॅव्हल agency मध्ये करू शकता , १ फोटो, पासपोर्ट ची कॉपी आणि रिटर्न तिकीट हे document व्हिसा साठी लागतात.
५ दिवसात पेपर व्हिसा मिळतो , त्याची २ कलर प्रिंट काढून तो आपल्या सोबत ठेवा.
व्हिसा ची मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला रिटर्न येन गरजेचं आहे, तुम्ही तिकीट अँड व्हिसा एक्सटेन्ड देखील करू शकता पण व्हिसा ची व्हॅलिडिटी संपली आणि तुम्ही तरीही दुबई मध्ये राहिला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाही होईल आणि दंड देखील भरावा लागेल, अगदी लहान मुलांचा देखील व्हिसा काढावा लागतो

टिकेट्स साठी भरपूर पर्याय आहेत , पुणे ते दुबई किंवा मुंबई ते दुबई daily direct flights सुविधा उपलबध आहे..तिकीट बुक करताना २-३ महिने अगोदर बुकिंग केलं तर थोडा फायदा होतो , साधारण प्रत्येकी १८००० ते २४००० च्या दरम्यान return तिकीट देखील मिळू शकते. २ वर्ष पेक्षा लहान मुलांना तिकीट कमी लागतो , पण २ वर्षां पेक्षा मोठ्या मुलांना फुल तिकीट लागतो
तुम्ही स्वतः online तिकीट बुक करू शकता किंवा ट्रॅव्हल agency करून बुक करू शकता
पुणे ते दुबई हा प्रवास २ तास आणि ४५ मिनिटे आहे..

यूएई च्या टुरिस्ट व्हिसा वर तुम्ही दुबई, अबुधाबी आणि शारजाह या पैकी कोणताही एअरपोर्ट वर लँडिंग करू शकता.

हॉटेल आणि लोकल ट्रॅव्हल
३००० ते ५००० per night मध्ये चांगलं हॉटेल मिळू शकतो , online search करून आणि feedback वाचून हॉटेल बुक करा , सकाळचा नास्ता included असावा, लंच अँड डिनर बाहेर कुठेही करू शकता.

ट्रॅव्हल करताना शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर करावा , टॅक्सी सर्विस थोडी महाग आहे, दुबई मध्ये मेट्रो सर्विस आहे, अबू धाबी मध्ये पब्लिक बस पण खूप चांगल्या आहेत. अपार्टमेंट हॉटेल असेल तर अधिक चांगले कारण त्यामध्ये kitchen आणि जेवण बनवायला लागणारे सर्व वस्तू असतात , फक्त तुम्हाला बाहेरून दूध किंवा जे काही बनवायचं आहे ते मटेरियल घेऊन यावं लागेल .. मुलं लहान असतील तर हा पर्याय खूप चांगला, कारण हॉटेल मधेच तुम्ही नास्ता किंवा जेवण बनवू शकता.

food ऑपशन्स…..
अबुधाबी आणि दुबई मध्ये खाण्यासाठी खूप वारीइट्स आहेत , विविध देशांचे रेस्टारेंट आहेत , इंडियन फूड ते कॉटिनेंटल सगळे option आहेत, south इंडियन आणि पाकिस्तानी रेस्टारेंट मध्ये स्वस्त आणि चांगलं जेवण मिळत, अपार्टमेंट हॉटेल असेल तर तुम्ही स्वतः पण हॉटेल मध्ये जेवण बनवू शकता.

ट्रॅव्हल करताना घेण्याची काळजी ……….
–दुसऱ्या देशां मध्ये आपला पासपोर्ट हेच एक valid आयडेंटिटी प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाते , त्यामुळे इमिग्रेशन करताना आणि झाल्यावर आपला आणि फॅमिली चा पासपोर्ट व्यवस्थित ठेवावा, पासपोर्ट हरवल्यास ते परत नवीन काढायला वेळ आणि पैसे दोन्हीही जातात आणि फिरण्याची मज्जा राहत नाही

–जरी यूएई हा एक सुरक्षित देश आहे तरीही इथे सुद्धा काही फसवणूक करणारी लोक भेटतात , एअरपोर्ट वरून हॉटेल ला जाताना किंवा इतर ठिकाणी प्रवास करताना नेहमी govt ऑथोराइज्ड टॅक्सी चा वापर करावा , काही लोक तुम्हाला कमी पैश्यात सोडत म्हणून तुमचा गैर फायदा घेऊ शकतात यामध्ये पाकिस्तानी लोक जास्त प्रमाणात आहेत कि जे एअरपोर्ट किंवा बस स्टॉप वर उभी असतात आणि तुम्हाला कमी पैश्यात घेऊन जाण्याची ऑफर देतात , या लोकांना मुळीच प्रतिसाद देऊ नका , कारण ही लोक तुम्हाला लुबाडायलाच बसलेली असतात

–प्रत्येक देशाचे स्वतःचे काही रूल्स अँड रेगुलेशन असतात , त्या देशात तुम्हाला ते follow करणे खूप गरजेचं आहे , दुबई अँड अबुधाबी जरीही जास्त स्ट्रिक्टस रूल्स नाहीत पण ये काही रूल्स आहेत ते ब्रेक करणे म्हणजे खूप मोठा दंड भरावा लागतो आणि पोलीस case पण होऊ शकते.
मुख्यतः, गव्हर्मेंट बिल्डिंग चे चित्रीकरण करणे, रस्त्यावर किंवा पब्लिक प्लेस वर थुंकणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह, restricted एरिया मध्ये प्रवेश करणे , पब्लिक प्लेस मध्ये मोठ्याने ओरडणे किंवा भांडण करणे, ट्रॅफिक सिग्नल ब्रेक करणे, मुलींची छेड काढणे, महिलांचा अपमान करणे, चोरी करणे , देशाच्या राजकीय व्यक्तींबद्दल टीका करणे , धर्म आणि जाती वर चर्चा करणे , विना तिकीट बस मध्ये ट्रॅव्हल करणे..इत्यादी

रास्ता क्रॉस करताना फक्त झेब्रा क्रोससिंग चा च वापर करणे हे खूप गरजेचं आहे, इतर ठिकाण वरून क्रॉस करणे खूप धोकादायक आहे आणि दंड पण होऊ शकतो

—रमजान महिन्या मध्ये शक्यतो ट्रॅव्हल करू नका , पब्लिक प्लेस मध्ये पाणी पिणे आणि जेवण करणे हे हे रमजान महिन्यात allowed नाही , तुम्ही घरात किंवा हॉटेल मध्ये जेवण करू शकता पण बाहेर नाही

—प्रॉस्टिट्यूशन चा व्यवसाय दुबई मध्ये खूप चालतो , डान्स बार ही पूर्ण रात्र चालू असतात , अश्या ठिकाणी तुम्ही बाहेरून आला आहेत म्हणून तुमची फसवणूक सुद्द्धा होऊ शकते.

conclusion
ट्रॅव्हल duration ६-७ दिवस
तिकीट – १८००० ते २०००० प्रत्येकी रिटर्न
व्हिसा – ६००० ते ७००० प्रत्येकी, १५ दिवस साठी valid
हॉटेल – ३००० ते ५००० per night , एक फॅमिली राहू शकते एका रूम मध्ये
लोकल ट्रॅव्हल – अंदाजे ७ ते ८ हजार रुपये – टॅक्सी ने सर्व प्रवास केला तर
लोकल डेस्टिनेशन फीस – भूर्ज खलिफा २५०० रुपयच्या जवळपास एन्ट्री फी , फरारी वर्ल्ड अँड वॉटर वर्ल्ड ६००० ते ८००० per पर्सन (online पास ऑफर मध्ये स्वस्तात मिळू शकते) , desert सफारी १५०० ते २००० per person (negotiate करू शकता , बस मध्ये pickup अँड ड्रॉप)
बाकी ठिकाणी एन्ट्री फीस नाही , पब्लिक बीच फ्री आहेत

वरची सगळी माहिती ही माझ्या एक्सपेरियन्स नुसार दिलेली आहे, एन्ट्री फीस मध्ये कधी ऑफर्स असतात तर कधी नसतात, हे फक्त एक अंदाजे खर्च म्हणून रेफेरेंस घेऊ शकता, अजून डिटेल्स हवे असतील तर online search करू शकता…

Article Categories:
प्रवास

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा