दुरावत चाललेला मैत्रीचा सहवास…!!

Written by

सध्या धावपळीचे जीवन आपण सारे जगत आहोत .प्रत्येकजन आपआपल्या कामात व्यग्र असतात , कोणीही कुणाची चौकशीसुद्धा करत नाहीत.प्रेमाच्या परिभाषेचे सारे सुत्रच बदलेले आहे.भुगर्भातला जसा ओलावा आटत चाललेला आहे नेमका त्याचपद्धतीने माणसा – माणसातील , नात्यातील जिव्हाळा पार आटत चाललाय .याला मैत्रीचे नातेही अपवाद राहिलेले नाही. माध्यमांच्या शिरकावाने केवळ संदेश व आवाज याचीच देवाणघेवाण सुरु असते एकमेकांचे भेटणेही दुरापास्त झाले आहे. मैत्रीचे नाते किती अजोड असते…!त्याची किंमत जवळ असल्यावर अजिबात समजत नाही… याच मैत्रीचा दुरावत चाललेला वीरह काव्यात टिपण्याचा केलेला प्रयत्न …..!!

?

दुरावत चाललेला मैत्रीचा सहवास…!!

प्रसन्न पहाट बहरली

दवबिंदूची पखरण झाली

जीवलग मैत्रीला जाग आली

सोनेरी क्षणांची आठवण निघाली

सारी मैत्री ही संसारात गुंतली

साधी भेटसुद्धा दुरापास्त झाली

व्हाटस्अप फेसबुकवर झाली दिवाळी

त्यालाही मनाजोगी दाद नाही मिळाली

वाढदिवसाची वर्षातुन एकदाच घाई

शुभेच्छा देताना जीव खाली – वर होई

केंव्हातरी व्हावा मैत्रीचा गेटटुगेदर

तेथे सुखदुःखाचा असावा आदर

मागील आठवणींचा क्षणांक्षणांला येतो उमाळा

काय करणार नियतिने ठरवलाय प्रत्येकाचा मार्ग वेगळा

आत्ता फक्त होते नेट भेट

वाढदिवसाला शुभेच्छा मिळतात थेट

आज शब्दांनी घेतला मैत्रीचा श्वास

खंत हीच की दुरावत चाललाय मैत्रीचा सहवास

✍

नामदेव पाटील.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा