दृष्टिकोन

Written by

प्रत्येक वेळी होणाऱ्या त्याच त्या कांद्यापोह्यांच्या कार्यक्रमाला सीमा आता पुरती कंटाळलेली होती…… आज तिला पहायला पाचवा मुलगा येणार होता….. आधीच्या चार मुलांनी काहीतरी सटर फटर कारण सांगून तिला नाकारले होते…… त्यामुळे तिला आता हे नको वाटत होते….. पण आईच्या इच्छेसाठी ती तयार झाली होती…… तयार होऊन मुलाच्या येण्याची वाट बघत असताना निरोप आला की… मुलगा आताच लग्न नाही करायचे असे म्हणत आहे…. त्यामुळे आज आम्ही येऊ शकत नाही…
सीमा आणि तिच्या आईवडिलांना कळतच नव्हते असे का होत आहे….. कारण सीमा मध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं…. दिसायला ती खूप सुंदर होती…. गोरीपान,उंच,मध्यम बांधा निळे डोळे, स्टेप कट अगदी एखादी नायिका शोभेल अशी होती….. सीमाने कायद्याचे शिक्षण घेतले होते….आणि नुकतीच एका अनुभवी वकिलाकडे प्रॅक्टिस करत होती….. घरकामातही तिचा हात कूणी धरत नव्हतं……  ती सर्वगुणसंपन्न होती….
सीमाची आई प्रतीक्षा तर खूप परेशान झाली होती…. सगळीकडे वाजणारी नकारघंटा तिला काही उमगत नव्हतं…..

एके दिवशी प्रतीक्षाची नणंद गरबडीत घरी आली….. आणि प्रतीक्षाला म्हणायला लागली… वहिनी भोगा आपल्या कर्माची फळं…. लोकं नुसते नाव ठेवत आहेत….. कजाग बाईच्या मुलीसोबत कोन लग्न लावणार….. आई कजाग, भांडकुदळ असेल तर लेक ही तशीच असणार….

काय?? मी आणि भांडकुदळ, कजाग…. अहो वन्सं काही काय म्हणताय…. मी कधी कुणाशी भांडले?? तुम्हाला तर माहिती आहे आता तर घरामध्ये साधा छोटा वाद ही होत नाही… मग अशी कशी अफवा पसरली आहे??

अफवा नाही वहिनी….. सुरुवातीला तूम्ही जे माझ्या भावाशी वागलात…. माझ्या आईवडिलांशी वागलात ते लोकं विसरले नाहीत अजून…

मी….. असं म्हणत प्रतीक्षा एकदम भूतकाळात गेली…. तिला आठवलं लग्नानंतरचे अगदी सुरुवातीचे दिवस….. तिचं जेव्हा अमोल शी लग्न झालं होतं अगदी महिनाभरातच तिच्या सासरच्यांनी रंग दाखवायला सुरु केले होते…..अमोलही कधी कधी दारू पिऊन तिला मारहाण करत असे….. सासू खूप काम करायला लावत असे….. तिला जेवण देखील व्यवस्थित करू देत नसे….. ती जेवताना नुसती भुणभुण लावत असे….. सासरा शांत असे पण तोही काही अडवत नसे….. प्रतीक्षाने graduation पूर्ण केलेले होते पण लग्नानंतर ती नौकरी करणार नाही असे ठरले होते….

त्यातच सीमा चा जन्म झाला….. सीमाला जेव्हा शाळेत घालायची वेळ आली तेव्हा तिच्या ऍडमिशनचे पैसे देखील घरी नव्हते….. लग्न झाल्यापासून प्रतीक्षा तेच ते अठरा विश्व दारिद्र्य घरी पहात होती…. घर सगळं कर्जात डुबलं होतं…. अमोल च्या वागण्याने परिस्थिती काही सुधारत नव्हती….

आता मात्र प्रतिक्षाचे मातृत्व जागे झाले होते….. ती सासूच्या, नवऱ्याच्या वागण्याला प्रतिकार करायला लागली होती…. प्रतिक्षाला तेव्हा समजले की आपण परावलंबी आहोत म्हणून हे घरात वातावरण आहे….. जर आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलो तरच काही खरं आहे….. आपली सीमा शिकेल…. म्हणून प्रतिक्षाने नौकरी करण्याचा निर्णय घेतला…. आणि तिला तिच्या टायपिंग कौशल्यामुळे क्लार्क म्हणून नौकरी मिळाली देखील….

प्रतीक्षाच्या या नौकरी मुळे लवकरच घरातील आर्थिक स्थिती सुधारली….. अमोल, आणि तिचे सासू सासरे आता तिला चांगली वागणूक देऊ लागले होते…. एकंदर घरातील वातावरण आता खूप सुधारलं होतं….

हा भूतकाळ आठवून प्रतीक्षा तिच्या नणंदेला म्हणाली…. वन्सं तूम्ही तर माझा लढा स्वतःच्या डोळ्यांनी बघितला ना मग तुम्हालाही असं वाटतं का मी अज्यात आहे, भांडकुदळ आहे??
नाही हो वहिनी… पण लोकांचा दृष्टिकोन तुम्हाला सांगते आहे….

लोकांचा दृष्टिकोन कसाही असो… मला माझ्या आईवर गर्व आहे…. आणि जो मुलगा आणि त्याच्या घरातील मंडळी माझ्या आईचा मान ठेवेल त्याच्याशीच मी लग्न करेन… असं सीमा म्हणाली

तितक्यात त्यांच्या घराची बेल वाजली…. प्रतिक्षाने दार उघडले.. बघते तर काय तिच्या माहेरी राहणारे शेजारी जोडपे होते… ते… त्यांचा मुलगा दीपक याच्या साठी सीमाचा हात मागण्यासाठी आले होते…. त्यानी प्रतीक्षाला अगदी जवळून पाहीले होते… त्यांच्यासाठी प्रतीक्षा म्हणजे एक ideal उदाहरण होते….

दीपक ने ही सीमाला ती तिच्या मामाकडे आली असताना पाहीले होते…. त्यामुळे त्याने आधीच तिची निवड केलेली होती….

सीमा आणि दीपकचे लग्न अगदी थाटामाटात आणि निर्विघ्न पणे पार पडले….

गोष्ट एकच पण केवळ दृष्टीकोन वेगळा असल्याने त्याचा काय परिणाम होतो हे यावरून दिसून येते.
कथा आवडल्यास like करा, share करायची असल्यास नावासहित share करा
©® डॉ सुजाता कुटे

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा