देखा एक ख्वाब तो…..

Written by

देखा एक ख्वाब तो…..
©® : नीलिमा देशपांडे

“सर, सर.. प्लीज ….घ्या ना माझा गणिताचा पेपर…हे बघा मी दारातच आहे अजुनही ! वर्गाच्या बाहेर पण गेले नाही, फक्त चुकून पेपर जमा करण्याच विसरले आणि तो माझ्या हातात राहिला इथे दारा जवळ आले तरी !” परत अशी चुक होणार नाही पण पेपर घ्या सर… नाहीतर मी पास कशी होइल?” मी अगदी रडकुंडीला आले होते पण सर काही केल्या ऐकून घ्यायला तयार नव्हते.
सारा वर्ग माझ्याकडे बघून…”अशी कशी ग तू वेंधळी ! पेपर न देता कोणी कधी वर्गा बाहेर पडतं का?” असे प्रश्नार्थक कटाक्ष टाकत होता. तर काही समजावत होते, “कमी तर कमी मार्क पडले असते पण निदान पास झाली असतीस पेपर दिला असता तर ! असं घाबरुन पेपर स्वत: कडे ठेवून घेणं बरोबर नाही.” धीर देणारे दोन शब्द किंवा माझ्या सोबत सरांना पेपर घेण्याची विनवणी करणे, त्यांना मनवण्यात मला मदत करणे सोडून सगळे मलाच उपदेश करत होते. त्यांमुळे शेवटी मी हार मानली आणि ‘सार संपल आहे’ अशा थाटात रडायला आणि जमेल तेवढं परत “सर प्लीज माझा गणिताचा पेपर घ्या” म्हणून ओरडत त्यांच्या मागे पळायला सुरुवात केली.
पळता पळता मी सरांना दया यावी म्हणून मी काल त्यांच्या विषयाची, म्हणजे गणिताची वही कशी मेहनतीने पुर्ण केली सांगत होते. ” सर मी आठवडा भर सगळ्यांना वही मागितली. पण परीक्षा सुरू होणार असल्याने मला कुणी मदत केली नाही…मग रात्रभर मी धडपड़ करून कशी बशी वही पूर्ण केली त्यामुळे मला सकाळी उशीरा जाग आली… परिणामी मला शाळेत जायला उशीर झाला. मग शाळेत उशीरा आल्यामुळे शंभर उठाबशा काढून वर्गात येईपर्यंत पेपर सुरु झालेला होता. आधीच माझं गणित दिव्य! मग काय पास होऊत की नाही या भितीने प्रत्येक प्रश्न सोडवला की किती मार्क मिळतील याची टोटल मागच्या बाजूला पेपर वर चालू ठेवली. पास होण्या साठी लागणार्या मार्कां पेक्षा किमान दहा पंधरा मार्क जास्त टोटल होत नाही तो पर्यंत ! आणि ती टोटल जुळली की मग, ‘चला सुटले.. होऊत पास!’ असा विचार करत मी लिहीलेला पेपर तुम्हाला द्यायचा विसरुन वर्गाच्या दारा पर्यंत पोहचले आणि लक्षात आलं पेपर द्यायचा बाकी आहे आणि….आणि…पुढे तर तूम्हाला माहित आहे ना सर… मग घ्या ना पेपर…”
भीतीने दर-दरुन घाम फुटला आणि बोबडी वळायला लागली होती; स्टाफ रुम मधे सर आत शिरे पर्यंत मी तशीच त्यांच्या मागे धावत गेले. पण पेपर न घेता सर सरळ स्टाफ रुम मधे शिरले. याही वेळी मी गणिताचा लिहिलेला पेपर न देताच घरी गेले तर काय होईल ? या विचाराने हृदय धडधडत होते आणि हात पाय गार पडल्याचा भास होत होता !! मी भितीने थरथर कापत होते, तेव्हाच मला आजू बाजूला बरेच आवाज ऐकू आले आणि मी जरा सावध झाले. डोळे उघडून पाहते तर काय?….

घरातले सारे मला जोरात हालवत होते, झोपेतून उठवण्या साठी! मला काही नीट कळाले नाही काय झालं म्हणून ? पण ते सारे मला उठवताना म्हणत होते, “ए…अग उठ आता… किती वेळा तो गणितचा पेपर माघारी आणते? कधी तरी लक्षात ठेवून परीक्षेत लिहिलेला पेपर दे सरांना एकदाचा…. म्हणजे तूही सुटशील आणि आम्ही सुद्धा!
घरातील सगळयांना माझं हे आजवर अनेकदा पाहिलेले स्वप्नं ऐकून पाठ झालं होतं. माझी गणित विषयाची भिती पण जग जाहीर झाली ती याच स्वप्ना मुळे! खरं सांगायच तर शाळा सोडून आणि कॉलेजच्या बाहेर पडून आता बरीच वर्षे झाली आहेत. हे सगळं इतकं अंतरमनात कधी खोलवर दडून बसलं आणि का बसलं ते काही केल्या मला अजूनही कळालेल नाही.
गेले आठ दिवस हे स्वप्न मला नीट झोपू देत नव्हतं आणि झोप न झाल्याने मला थकवा जाणवत होता. ” आता तरी काळजी करणं सोडून दे अथर्वची. मोठा झालाय तो ! ” म्हणत सचिन मला समजावत होता आणि मी स्वतःला त्या मधून बाहेर काढण्या साठी मुळात हे का होतय ? याची कारणं शोधत होते चहा घेता घेता त्याच्या सोबत. तोच मला यातून बाहेर काढणार हे निश्चित होते. कारण त्याने माझ्या बर्याच करामती पहिल्या होत्या मेंटल कैलक्युलेशन करत असतांना घड़लेल्या !!
“दहावीत 138/150 मार्क होते गणितात मला आणि चक्रवाढ व्याज आणि त्रिग्नोमेंट्री सोडलं तर आजही सगळं लक्षात आहे गणित.”
“मग?……” या त्याच्या डोळ्यांत दिसलेल्या शंकेसाठी मी पुढे सांगणे सुरु केले…”शाळा – कॉलेज मध्ये असताना एक टॉपर आणि मेरिटच्या यादीत असणारी, वह्यां नेहमीच छान सुवाच्च अक्षरात पुर्ण आणि नीटनेटक्या ठेवणारी म्हणूनच ओळख होती माझी. मग तरी मी माझ्या स्वप्नात सगळया मैत्रिणींना का वही मागते हेच कळत नाही. मला हे अनेकदा पडलेल स्वप्नं कधी माझा पिच्छा सोडणार आहे कुणास ठाऊक?”
यावर सचिन गोड हसला आणि म्हणाला, ” हे तूला ठरवून कराव लागेल. ही फक्त भिती आहे तूझी, तुझ्या मंनात दडलेली. वास्तव नाही.”
तूला अजुनही कुठं इंटरव्हयू साठी जायचं असेल तर मी सोबतीला लागतो…कशाला?” माझं उत्तर तयारच होतं.. “निवड झाली की ते, सैलरी एकदम पैकेज मधे सांगतात आणि मला ती महिन्याला किती हे पट्कन मनात भागून काढता येत नाही. मी आधी जायचे ना एकटीच ? पण मागच्या वेळी पैकज सांगून त्यांनी, “मला नव्या शहरात साधारण किती पगार मिळावा अशी तुमची इच्छा आहे?” असं विचारलं तर मी लवकर उत्तर दिलं नाही कारण मला महिन्याला किती पगार मिळेल हे लवकर लक्षात आलं नाही. मी सरळ त्यानांच विनंती केली की “मला कमीत कमी 30,000 तरी दर महिन्याला मिळावेत”…. जे त्यांनी मला हसत हसत दिले त्यांनी कारण ते तर मला 4,32,000 पैकेज म्हणजे 36,000 महिना द्यायला तयार झाले होते पण मी बावळट पणा केला माझी अपेक्षा सांगून!” परत असं नुकसान नको ना व्हायला म्हणून आता यापुढे तूला नेईल सोबत असं ठरवलं आहे. पण हे जाऊ दे आता.
तुला मी मागच्या नोकरीत असताना असाच एकदा फ़ोन केला होता; आठवतेय का? माझा पगार वाढला होता आणि नेहमीप्रमाणे तूला आधी सांगव म्हणून मी तुला फ़ोन केला तर तू पण, “अरे वा…आता तुझं पैकेज 3 लाख रुपये झालं अभिनंदन!” अस म्हणत फोन ठेवला.
मी सुध्हा घरी निघाले फोन ठेवला की, पण मला काही केल्या 3 लाख कसे ? हे कळतच नव्हतं.
म्हणून मी रस्त्याच्या कडेला स्कूटी थांबवली. पैकेज बोटांवर मोजता येईल असा विचार करून. दर महिन्याला मिळणार्या पगाराला जोडत, एकेक बोट मी पुढे सरकत होते पण काही झाले तरी 3 लाख बेरीज होत नव्हती. मग लक्षात आलं की हाताला दहाच बोटं असतात आणि महीने मात्र बारा!
मग मी सरळ दोन्ही हात स्कूटी च्या हॅड़ल वर ठेवले आणि दोन्ही पाय थोडे पुढे; मला हाता सोबत दिसतील इतपत सरकवले आणि पुन्हा हात आणि पाय यांच्या बोटांवर मोजणे सुरु केलं. यावेळी बोटं जास्त झाली म्हणून माझा घोळ होतोय हे जरा लवकरच लक्षात आलं. मग हाताची दोन – दोन बोटं एकंमेकांना जोडली आणि दोन बोट मिळून ‘एकच’ मोजायच असं ठरवलं मनात.
बराच वेळ झाला तरी मी स्कूटी वर बसलेले होते आणि माझे हात हॅडलवर. मी कधी हाता कडे बघतं तर कधी उजवा पाय आणि मग डावा पाय बघत आणि एकिकडे मनात चाललेला हिशोब चुकीचा आहे लक्षात आलं की मान हालवत परत मोजायला सुरुवात करत होते !
हे बघून कदाचित काही लोकांना विचित्र वाटले असावे. “ मी नेमकं काय करते आहे किंवा काही शोधत आहे का?” असं त्यांनी मला विचारलं, तेंव्हा मी तिथून पळ काढला.
“हो पळ काढला पण मी घरी आलो तेव्हाही तू जे करत होतीस ते मला आजवर समजलं नाही. मी फोटो पण काढून घेतला होता तुझा. लैपटॉप वर एक्सेल शीट ओपेन केलेली…समोर कैलक्युलेटर आणि तरी तू बोटांवर काहीतरी मोजताना ! खर तर मी तुझा तो फोटो पाठवायला हवा होता, मायक्रोसॉफ्टला आणि कैलक्युलेटर बनवनार्या कंपन्यांना”……
मी काय बोलणार यावर? इतकंच म्हटलं, “ ठीक आहे रे, मला बाकी अनेक विषयाचे आहे ना नॉलेज. MBA सुद्धा केलं ना? जॉब, घर आणि तुमचं सगळं सांभाळून. अकौंटंस विषय सुद्धा एकटीने तयारी करून पास झाले की नाही?”
“Account विषय कसा पास झाली तू आठवत का? ” असं सचिनने विचारल्यावर मला खदखदून हसू आलं. कारण ‘ तारे जमीन पर ‘ या सिनेमा मधल्या ईशान अवस्थी पेक्षाही भयंकर लॉजिक होते माझे परिक्षेत उत्तरं देताना …
दोन तासांत 120 उत्तरं द्यायला वेळ किती मिळणार मला ? एक मिनिट…त्यात गणित वाचू की सोडवू? थेरी प्रश्न सोडवले आणि सम सोडवायला कोरा पेपर मागितला तर म्हणे “ही परीक्षा ऑनलाईन आहे. तुम्ही तुमचे हॉल तिकिट वापरा !” असं उत्तर मिळाल्यावर आणि माझा कॉमर्स बैकग्राउंड अजिबात नसताना, MBA Accounts मधे एकदम पीचडी लेव्हलचे फ्युचरिस्टीक सम सोडवण्याचा प्रयत्न करणे तेही पेपर शिवाय, मला शक्य नव्हते मग ? मग काय …मी मला योग्य वाटली त्या उत्तरा वर टीक करत गेले शेवटच्या पाच मिनीटात. दोन – चार मोठे सम स होते ते…तसेही मला आले नसते…..
भारताने ईतर देशाला दिलेल्या कर्जांना व्याजदर आज हा आहे. पाच वर्ष व्याज रकमेच्या सह किती रक्कम भारताला परत मिळावी ? …..चक्रवाढ व्याज! कोणी सोडवाव? त्यापेक्षा सगळ्यात मोठा रकमेचा आकडा असलेल्या उत्तराला बरोबर च टीक केलं कारण ते आपल्या देशाला मिळणार होतं.
मग एक असाच तो जमाल चा प्रश्न आम्हाला का विचारला परिक्षेत? माहित नाही. जमालचा मुलगा आज अमुक वर्षांचा आहे आणि या वर्गात शिकतो. आज व्याजदर हा आहे. अजून दहा वर्षानी जमालला मुलाला शिकवण्या साठी किती पैसे लागतील? आज तो इतकी फी भरतो. त्या वेळी तेवढया पैशाचं किती मुल्य असेल? आज किती रक्कम जमाल ने गुंतवावी त्यासाठी म्हणजे त्याला त्यावेळी पैसे पुरतील ?” बापरे एकात एक किती प्रश्न!
मी साधा विचार केला, जमाल ची सदद्द्या ची आर्थिक परिस्थितीतच मला माहित नाही मग मी काय ढेकळ ठरवंणार, त्याने आज किती पैसे गुंतवायचे ते? मी लिहीलेल्या उत्तरा इतके नसले बिचर्या कडे पैसे मग? कसा गुंतवेल तो? आणि मी काय म्हणते…. मुळात त्याच्या मुलाची आणि त्याच्या शिक्षणाची काळजी तो जमाल घेईल ना ? मला कुठे वेळ आहे असा मल्टीफोल्ड क्वेश्चन सोडवायला ! त्या पेक्षा मी आज कमीत कमी पैसे भरूनही त्याला, जास्त पैसे मिळतील अशा रकमेच्या उत्तराला बरोबर उत्तर म्हणून टीक करते… आणि केल पण मी तसचं!
नशीब चांगले म्हणून सगळी थेअरी आणि काही सोपी गणित सोडवून मी पास झाले एकदाची! नाहीतर जमाल कडून आणि भारता कडूनच घ्यावे लागले असते आजवर पैसे जेंव्हा आणि जसे लागतील तेव्हा !!
थोडक्यात काय तर शाळेच्या गेट बाहेर शरीराने नाही तर मनाने पडायला हवं आहे मला ! आणि ते काही अथर्व च शिक्षण पूर्ण होईपर्यंत शक्य नाही. तेंव्हा आता उठून कामाला लागाते. लवकर झोपून बाकी विषयांच्या वह्या पण एकदाच्या पुर्ण च करून टाकते !
या सगळ्या गणिता च्या आठवणी जाग्या झाल्या आहेत त्या अथर्वला रात्र रात्र जागून त्याची मैथ्स प्रोजेक्ट फाईल पूर्ण करताना पाहून. मलाच धास्ती वाटत होती….पुर्ण होईपर्यंत. त्याच्या सोबत जागं रहायचं ठरवलं आणि आम्ही या गोष्टी बोलता बोलता मी गाढ झोपी गेले मग काय…
“एक मै और एक मैथ्स…दोनो मिले इस तरह…और जो सपने में हुआ….वो तो होना ही था!”………

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.