देवमाणूस

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#देवमाणूस

माझा बारावीचा वेकेशन क्लास ठाण्याला.
रोज सकाळी सहाच्या गाडीने जायचे.
बाबा स्टेशनपर्यंत सोडायला यायचे.
वाटेत अंधार असायचा.
बाबा विजेरी दाखवायचे.
एकदा बाबांना कायतरी शेणाच्या पोसारखं दिसलं.
विजेरी मारली तर नागराज थंडाव्याला बसलेले.?
मला काहीच कळलं नाही.
बाबा म्हणाले घरी जाऊया.
आम्ही पाठी फिरलो.
दोन मिनटांनी मागे पाहिलं,
तो संथ गतीने गर्द झाडीत लुप्त.
आम्हाला जायला वाट करुन दिली त्या सर्पराजानं.☺️
असेच काही दिवस गेले.
एकदा क्लासमध्ये परीक्षा चालू.
प्रत्येकाची डोकी पेपरात.
पाठीमागून कर्नावट सर आले.
ट्रेनने कोण येतं?
सगळ्यांची तोंडं माझ्याकडे.
सर म्हणाले.
पेपर राहूदे. निघ.
मी प्रश्नार्थक.
बाळा, दंगल सुरू होईल थोड्या वेळात,
हिंदू मुस्लीमांची.
मी ठोंब्यासारखी उभी.
सर म्हणाले,”माझ्या घरी येशील?”
मी प्युअर अनसोशल अँनिमल.
थरथरत म्हंटलं, “सर स्टेशनला जाऊन बघते.”
सर म्हणाले,”गाडी नाही मिळाली तर परत ये.”
मी झपझप निघाले.
सगळे इंडिकेटर बंद. दुपारची वेळ.
एक गोरखपूर एक्स्प्रेस आली.
कल्याणपर्यंत जाऊ शकत होतो.
सगळी गर्दी मेंढरासारखी आत घुसली.
हिला लेडीज डबा असतो का मला काही माहित नव्हतं.
शोधत बसले नी गाडी चालू झाली तर?
मी समोरच्या डब्यात शिरले.
रिझर्वेशनची माणसं झोपलेली.
त्यांचा लांबचा प्रवास होता.
पेसेजमधे जागा होती.
मी हळूहळू तिथे सरकले.?
सुटकेचा निश्वास सोडला.
तोच एक तांबड्या करड्या केसांचा,
शर्टाची दोन बटणं उघडी,
गळ्यात जाड साखळी असा मवाली
माझ्याबाजूला येऊन उभा राहिला.?
बायकांना जात्याच सिक्स्थ सेन्स असतो.
मी अंग चोरुन उभी. माझी स्थिती पाहून
त्याचा धीर चेपला. तो आत्ता अधिक अंगलटीला
येऊ लागला.
मला खेटून उभा राहिला.
माझी सगळी दादागिरी घरात
इथे मी टरकले, अगदीच हतबल.
एवढ्यात मागून एक आजोबा आले.
त्यांनी त्या मवाल्याला झापले.
तो उलट उत्तरं देऊ लागला.?
तसे आजोबांच्या अंगात जमदग्नी शिरला.
म्हणाले मी पहातोय मघापासून तुझे चाळे.
तो मवाली वरमला. तिथून दूर सटकला.
आजोबांनी आजूबाजूच्या माणसांचीही तासली.
तुमचं कोण असतं, तर असेच बघे राहाल का म्हणाले.
मग त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी गोल केला
व मला त्यात उभे केले.
गाडी कासवाच्या गतीने चालू होती.
कल्याण यायला दिड तास लागला.
त्यांनी मला उतरायला मदत केली व टाटा केला.
मी जाम सदम्यात.
त्यांचे आभारही नाही मानले.
थोड्याच वेळात बदलापूर गाडी आली?
हक्काच्या लेडीज डब्यात चढले.
घरी येऊन आईबाबांना सांगितले.
बाबा म्हणाले, त्यांना कोणाच्या ना
कोणाच्या रुपात देव भेटतो.
त्यांच्या लेकीला त्या देवमाणसाने
संरक्षण दिले होते.?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा