देवा ! केवळ एकदाचं तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दे..

Written by

देवा ! रागावू नको, पण एक विचारू ? मन फार खचलय..थोडा विसावा घ्यावा वाटतोय..तू एकदा तरी तुझ्या कुशीत घेऊन मला कुरवाळशील का रे ?? बघ हं ! पटलं तरचं तुझ्या कुशीत घे ..नाहीतर मग आहे रोजचंच..तू माझ्याशी नाही बोलला तरीही ..तुझ्याकडे रटाळ आयुष्याची तक्रार करत राहायचं..आणि तू बहिरेपणाचे सोंग घेऊन माझ्याकडे हसत बघायचस..तेही अगदी निर्धास्त!! माझी परीक्षा घेत! कारण तुलाही ठाऊक आहे..मला तुझ्या आधाराची गरज नाही..मी माझी समर्थ आहे..पण तरीही एकदा म्हण , योगिता बाळ ! दमलीस का ग फार ?? पण तू काळजी करू नकोस हं .. मी आहे तुझ्या पाठीशी.. एवढंच बोलला ना देवा तू माझ्याशी ?तर तेही पुरेसे आहे..मी असेल मग तुझ्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी तयार …?पण देवा.. केवळ , एकदाचं तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून दे..

योगिता विजय टवलारे ✍️
२५/७/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा