देहदान( एक प्रेम कथा )भाग 1

Written by

@अर्चना अनंत धवड ???✍️✍️

कॉलेज मध्ये कसलासा कार्यक्रम सुरू होता.डॉ. रोहित चा सत्कार करण्यात येत होता. त्यांच्या महान कार्याचा परिचय करून देण्यात येत होता… त्यांचे शिक्षण, त्यांनी घेतलेला विविध उपक्रमातील सहभाग हे सगळे सांगताना ते किती उदारमतवादी आहे हे सांगत होते… ते इतके मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत की त्यांनी आपल्या प्रिय पत्नी सुमनच्या पार्थिव शरीराची कुठलीही धार्मिक विधी न करता देहदान केले.तिची सगळी मालमत्ता अनाथालयाला दान केली.

सुजाता, सुमन ची मैत्रीण जी श्रोत्यांच्या मध्ये बसली होती. तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मनात म्हटले किती खोटा वागतो हा माणूस. किती मुखवटे लावतो चेहर्‍यावर. मेल्यावर सुद्धा तिचा वापर करण्याचे सोडत नाही .तिला सुमनची खूप आठवण आली. तिला सुमन चा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला..

सुमन अणि सुजाता एका सायन्स कॉलेज मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक होत्या.सुमन दिसायला सुंदर, साधी, मनमिळाऊ मुलगी होती. सुमन च पोस्टिंग केमेस्ट्री लॅब मध्ये होत. तीच काम म्हणजे केमिस्ट्री लैब मधे MSC च्या मुलांना साहित्य देणे.

बरेच दिवसापासून रोहित नावाचा मुलगा प्रैक्टिकल ला गैरहजर होता. रोहित एक अत्यंत हुशार अणि मनमिळाऊ मुलगा होता. दिसायला एकदम हैंडसम होता. तो बर्‍याच दिवसापासून गैरहजर असल्यामुळे तिला फार काळजी वाटत होती. परीक्षा जवळ आली असताना हा मुलगा का बर येत नसेल असा विचार तिच्या मनात आला. तिने त्याच्या मित्राकडे चौकशी केली. मित्रांना पण काही माहिती नव्हती.म्हणजे तो होस्टेलवर आहे पण कॉलेज मध्ये का येत नाही याची कुणालाही कल्पना नव्हती. तिने त्याच्या मित्रांकडून हॉस्टेलचा पत्ता घेतला.आणि अचानक ती त्याला भेटायला गेली… दार उघडताच तो म्हणाला…

मैडम तुम्ही…

अरे खूप दिवस झाले तू आला नाहीस. म्हंटल आजारी वगैरे पडलास की काय…

नाही मॅडम, आजारी वगैरे काही नाही. असच काही खाजगी प्रॉब्लेम आहे. तो खाली मान घालून बोलत होता….

मग कॉलेज मध्ये का बर येत नाही.बोल ना काय प्रॉब्लेम आहे. अरे आता फायनल प्रॅक्टिकल सुरु होईल आणि तू असा गैरहजर राहिलास तर तुझं वर्ष वाया जाईल. काय प्रॉब्लेम आहे सांग मला…..

जाऊ द्या मॅडम…

अरे, जाऊ द्या काय म्हणतोस. तुला कळतंय? तू काय करतोस. तू एक हुशार विद्यार्थी आहेस.तुझं वर्ष वाया जाईल. सांग मला काय अडचण आहे. मी नक्की मदत करेल…

मैडम माझी फी भरायची आहे म्हणुन कॉलेज चे पत्र आले. जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत कॉलेज ला यायचे नाही.माझी मागील काही महिन्याची fee थकीत आहे. मी प्रिन्सिपॉल शी बोललो पण ते म्हणाले की मी माझ्या अधिकारात तुला खुप वेळ दिला. आता जास्त वेळ देण शक्य नाही. घरी फोन करायची पण हिम्मत नाही कारण आलेल्या गारपिटीमुळे सगळं पीक उध्वस्त झालंय त्यामुळे घरून पैसे मिळणे शक्य नाही.
मी काहीतरी काम शोधतोय. काल एका ठिकाणी मुलाखत देऊन आलोय. सिलेक्शन झालंय. दुपारी कॉलेज सुटल्यावर 3ते 7 नोकरी करायची आहे.

अरे एवढेच ना.मी भरते तुझी फी. नंतर माझे पैसे परत करशील.आता परीक्षेच्या दिवसात नोकरी केली तर तुझ्या अभ्यासावर विपरीत परिणाम होईल.

अहो पण मैडम…..

पण नाही आणि परंतु नाही. उद्या पासून कॉलेज ला यायच…सुमन त्याला जवळ जवळ आदेशच देऊन गेली.

अशाप्रकारे ती आता रोहितला मदत करू लागली. सुमन अणि रोहित जवळपास सारख्याच वयाचे होते. सुमन BSC होऊन लगेच नोकरीवर लागली होती. आता सुमन त्याला जेव्हा लागेल तेव्हा पैशाची मदत करू लागली. तो ही तिच्याशी आपुलकीने वागायचा.ती नेहमी त्याच्या होस्टेलवर जायची. अस करता करता दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले कळलंच नाही. तो MSC चांगल्या मार्कांनी पास झाला.त्याच्या पेक्षा सुमनलाच खुप आनंद झाला. त्याच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. तो म्हणायचा आता नोकरी शोधावी लागेल.

नाही रोहित. तू सध्या नोकरी नाही करायची. तू खुप शिकायचं. तू प्राध्यापक हो. मला तुला खूप मोठ झालेल बघायचे आहे. तू PhD कर. पैशाची काळजी करू नकोस…

अग, माझ्या शिक्षणाचा खर्च तू करशील परंतु माझ्या आई बाबांचं काय. ते माझ्या नोकरीची आस लावून बसलेत. मला आई बाबांचे पण बघावे लागेल….

तु काही काळजी करू नको. तू फक्त अभ्यास कर. मी आई बाबांना पण मदत करेल.सुमन त्याला आश्वस्त करीत म्हणाली.

रोहित ने एका मोठ्या इंस्टीट्यूट मध्ये पीएचडी ला प्रवेश घेतला. त्याला विद्यावेतन मिळायच पण पुस्तके, राहणे, सगळा खर्च त्यात भागत नव्हता. मग सुमन त्याला मदत करायची. मुख्य म्हणजे त्याच्या घरीही ती मदत करायची.त्याचे आईवडील गरीब अणि साधी माणसे होती.त्यांना सुमनच्या मदतीची जाणीव होती आणि त्यांना त्यांचं प्रेम मान्यही होत. सुमनच्या आई वडिलांना मात्र त्यांचं प्रेम आणि कुण्या दुसऱ्या माणसांवर सुमनचे पैसे खर्च करणे पटत नव्हते. म्हणुन त्यांचा सुमनच्या लग्नाला विरोध होता.

रोहितचे phd सुरु होते आणि सुमनचे लग्नाचे वय झाले होते.

रोहित, आपण आता लग्न करायला हवं…..

अग, पण माझं phd व्हयला वेळ आहे…

अरे तू तुझं शिक्षण कर ना आरामात. मी कुठे मध्ये येते त्यांच्या. फक्त आपण लग्न करू या म्हणजे माझे आई वडील जे माझ्या लग्नाच्या मागे लागले त्यांची भुणभुण दूर होईल. रोहितला ही ते पटले. नाही म्हटलं तरी त्याला त्याच्या आईवडिलांची काळजी राहायची. एकदा लग्न झाले की एक सून म्हणुन त्यांच्या आईवडिलांची जबाबदारी आपोआप सुमनची होईल आणि आपण निर्धास्तपणे आपलं स्वप्न पूर्ण करू शकू.

दोघांनी लग्न केले. सुमनच्या आई आईवडिलांचा लग्नाला विरोध होता त्यामुळे सुमनच्या आईवडिलांनी सुमनशी संबंध तोडले. आता तर रोहित अणि त्याच्या आईवडीलांची जबाबदारी तिची झाली होती.तिच्या तुटपुंज्या पगारात ती सर्व आनंदाने करायची. आपल्या इच्छा बाजूला ठेवून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती झटत होती.

रोहित ची PhD पूर्ण झाली अणि मोठ्या यूनिवर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणुन रुजू झाला. सुमनला खूप आनंद झाला. सुमन अणि रोहित वेगवेगळ्या शहरात राहू लागले. कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुमन त्याच्या कडे जायची तर कधी रोहित सुमनकडे यायचा.दोघेही खूप आनंदी होते.दोन तीन वर्षे आनंदात गेली.

तीला आता असं वेगळं वेगळं राहायचा कंटाळा आला होता.

ती म्हणायची, रोहित तू इकडे नोकरीचे बघ ना.अरे मला आता एकट राहायचा कंटाळा आलाय.

हो… बघू या,पुढच्या वर्षी प्रयत्न करतो. अस म्हणुन टाळायचा…

ती म्हणायची की मी नोकरी सोडून तुझ्याकडे येते.तसाही तुझा भरपूर पगार आहे. अस किती दिवस आपण वेगळे रहायचे…..

अग, काही दिवस थांब. मी प्रयत्न करतो…..

अस करता करता दहा वर्ष झाली.पण त्यानी इकडे नोकरी शोधली नाही किंवा सुमनला नोकरी सोडायला सांगून सोबत नेले नाही.

आता रोहितचे येणे पण कमी झाले होते.ती म्हणायची,तुला नाही जमत तर मी येतेना या उन्हाळ्यात.

अग माझ दुसर्‍या शहरात लेक्चर आहे किंवा माझी कॉन्फरन्स आहे त्यामुळे मी बाहेरगावी जात आहे. तेव्हा तू येवून काय करशील.असं म्हणुन तो टाळायचा.

आता सुमन उदास राहत होती.त्याच्या आई वडलांची जबाबदारी तिच्यावर होती.त्याचे फोन येणे पण कमी झाले होते.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.ती फोन लावायची तर लागत नव्हता.आता तिनी ठरविले की आपणच जायचं आणि रोहितला सरप्राईज द्यायचं .

क्रमशः

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

**************

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा