देहदान( एक प्रेम कथा )भाग 2

Written by

 

@अर्चना अनंत धवड ???✍️✍

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या.ती फोन लावायची तर लागत नव्हता.आता तिनी ठरविले की आपणच जायचं आणि रोहितला सरप्राईज द्यायचं .
त्याला न कळविता ती त्याच्याकडे गेली.गेट उघडून आत मध्ये गेली. अंगणात तीन चार वर्षाच मूल खेळत होत. तिला ते एकदम ओळखीचे वाटू लागले.त्याचे डोळे एकदम रोहित सारखे दिसत होते. तिला तिच्या कल्पनेचे हसू आले.डोळे तर कुणाचे पण कुणा सारखे असू शकतात.ती आत आली.डोअर बेल वाजवली. एका स्त्री नी दरवाजा उघडला….

कोण पाहिजे…..

डॉ. रोहित. ईथेच राहतात ना?

हो.. .

तुम्ही कोण ?

मी त्यांची पत्नी. प्राध्यापक रुपाली…. तुम्ही कोण…

सुमन ला वाटले आपण चक्कर येऊन पडतो की काय.तिनी स्वतःला सांभाळले.

मी रोहित ची मैत्रीण सु…. सुषमा. तिने मुद्दामून आपले नाव सांगितले नाही. रोहित कुठे गेला….

कॉलेज मध्ये काही काम होत.बसा ना.येतीलच इतक्यात…..

नाही मला वेळ नाही. या रस्त्याने जायचे होते.. म्हंटल भेटून घ्यावे.सुमन माघारी फिरली…..

सुमन वापस आली. खुप रडली.आपण आपल सर्वस्व पणाला लावले अणि हा इतका कृतघ्न कसा निघाला. त्यानी इतके दिवस आपली फसवणूक केली.यानी आपला उपयोग घेतला. आपण काय केलं नाही याच्यासाठी. आपले आईवडील सोडले याच्या आईवडिलांना आपले आईवडील मानले. याच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या आपण निभावल्या आणि त्याची परतफेड यानी अशी केली….

शेवटी ती सुजाता ला भेटली . तिच्या कुशीत खूप रडली. सुजाता म्हणाली, अग तो येईपर्यंत थांबायचे ना. त्याला जाब विचारायला ना.अशी कशी तू त्याला न भेटता आली.

त्यांनी काय झाल असते. तो मला परत मिळाला असता.अग, त्याला बायको अणि मुलगा आहे. त्यानी नक्कीच तिला पण अंधारात ठेवले असणार.अज्ञानात पण सूख असतात म्हणतात ना. तिला सुखी राहू दे. मी त्याच्यावर निस्सीम प्रेम केल अणि करत राहील.तो माझ्यावर प्रेम करीत नाही.त्यानी केवळ माझा उपयोग केला. प्रेम तर जबरदस्तीने मिळवू शकत नाही.वाईट याचे वाटते की आपण ज्याला प्रेम समजत होतो ते प्रेम नव्हतेच ग. माणूस किती स्वार्थी असू शकतो याचं उदाहरणं असावा रोहित. रोहित.. रोहित माझं काय चुकलं रे… असं म्हणुन सुमन ओक्साबोक्सी रडू लागली.

त्यादिवसानंतर रोहितचा तिला फोन सुद्धा आला नाही.कदाचित त्याच्या बायकोने त्याला काही सांगितले नसावे किंवा सुमनने नाव न सांगितल्यामुळे त्याला कळले नसावे.

आता तिने त्याला विसरायचे ठरविले. स्वतःला विविध सामाजिक कार्यात गुंतवून घेऊ लागली.ती भयानक खचली होती.अशातच तिची प्रकृती ठीक राहत नव्हती. ती त्याकडे दुर्लक्ष करीत होती.

एकदा सुजाता तीला भेटायला गेली.ती भयंकर थकलेली आणि कृश दिसत होती. सुजाता तिला जबरदस्तीने दवाखान्यात घेऊन गेली. सगळ्या तपासण्या झाल्या.डॉक्टर नी कर्करोगाचे निदान केले.कुणी जवळचे नातेवाईक असेल तर बोलवा म्हणुन सांगितले. ती म्हणाली,डॉक्टर मला कुणीच नाही. फक्त ही माझी मैत्रिण आहे. तुम्ही मलाच काय ते सांगा…

डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप उशीर केला. आजार लास्ट स्टेज मध्ये आहे. सुजाता ला खूप रडायला येत होते. पण सुमन मात्र शांत होती.डॉक्टर म्हणाले, आजच भर्ती व्हावे लागेल. ती म्हणाली.डॉक्टर मला काही गोष्टींची विल्हेवाट लावायची आहे. मी उद्या येते भर्ती व्हायला .

सुजाता, चल आपल्याला वकिलांकडे जायचं आहे.

अग, सुमन, तुझी तब्बेत ठीक नाही आणि तुला हे काय सुचत ग. अग लवकरात लवकर भर्ती हो.

सुजाता, आज भर्ती झाली काय आणि उद्या काय. माझं मरण अटळ आहे. त्यामुळे मला काही गोष्टीची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

दोघी वकिलांकडे गेल्या. लगेच तिनी वकीलपत्र करून घेतले तिची सगळी मालमत्ता एका अनाथालयाला दान केली. काही रक्कम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी कॉलेजला देणगी दिली .ती म्हणाली, एखादा तरी मुलगा कृतज्ञ निघेल. ज्याला मी केलेल्या मदतीची जाणीव राहील.परत दोघी दवाखान्यात आल्या. तिने देहदानाची चौकशी केली अणि देहदानाचा फॉर्म भरून घेतला. ती म्हणाली जिवंतपणी त्यानी बायको म्हणुन कुठलीच जबाबदारी पार पाडली नाही. तेव्हा मेल्यावर माझ्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पण त्याच्यावर नको. माझ्या आजाराबद्दल त्याला कळवायचे नाही. त्याला पाहिले की कदाचित मी आजाराशी लढताना कमजोर पडेल.मी गेल्यावरच कळव.
सगळं आटोपून सुमन दवाखान्यात भर्ती झाली.
आजार इतका वाढला होता कि विशेष काही करण्यासारखे नव्हते.तिला खूप त्रास होत असावा. परंतु ती दाखवित नव्हती अणि एकदिवस शांतपणे ती गेली.

सुजातानी रोहितला फोन केला.त्याला धक्काच बसला.इतकं सगळं झालं आणि मला का नाही कळविले म्हणुन चिडला.

तू येतोस ना सुजाता शांतपणे म्हणाली..

हो, लगेच निघतो…..

दोन चार तासात रोहित पोहचला..

अग, सुजाता असं अचानक कस झालं…

अचानक नाही.. तीला कॅन्सर होता…

काय….. मग मला आधी कळवायचं ना…

सुमन नाही म्हणाली होती.तिने सांगितले होते की मी गेल्यावर कळवा

सुजाता नी विचारल, एकटाच आला?

तो आश्चर्यकारक रित्या पाहू लागला…

अरे तुझी बायको नाही आली……

तुला कस माहिती….. तो अडखळत बोलला.

सुजाता नी त्याला सुमन त्याच्याकडे आल्यापासून ची सगळी घटना सांगितली. दोन थेंब त्याच्या डोळ्यातून पडले.

चला, क्रियाकर्माच बघू या… रोहित म्हणाला .

त्याची काही गरज नाही. तिनी देहदान केले आहे. तू जिच्यामुळे या पदावर आहे तीच अंतिम दर्शन घ्यावं म्हणुन तुला कळविले.

सुजाताने तिचा देह हॉस्पिटल प्रशासनाच्या स्वाधीन केला. देहदानाच्या फार्म वर नातेवाईकाची सही हवी होती आणि नवरा म्हणुन रोहित ने सही केली.

टाळ्यांच्या गडगडाटाने सुजाता भानावर आली.
आज किती अभिमानाने तो देहदानाचे पण श्रेय घेतो. बेशरमपणाची अणि क्रुतघ्न पणाची हद्द झाली. सुमन एवढी हुशार ग तु… अशी कशी तुझी निवड चुकली ग. सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले…

©अर्चना अनंत धवड

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत